21 व्या शतकातील बाबा वेंगा; जे सांगितलं ते खरं ठरलं, तरुणाचं भारताशी आहे खास कनेक्शन
आता आणखी एक भविष्यवेत्ता चर्चेत आला आहे, ज्याचं नाव हेमिल्टन -पार्कर आहे. तो ब्रिटनचा रहिवासी आहे. हेमिल्टन -पार्कर याची देखील भाकीतं खरी ठरत असल्याचा दावा अनेकांकडून करण्यात आला आहे.

आपल्या आयुष्यात काय घटना घडणार आहेत? आपलं भविष्य कसं असणार आहे? हे जाणून घेण्याची प्रत्येकालाच इच्छा असते. ते जाणून घेण्यासाठी आपण अनेकदा भविष्यवेत्त्याकडे जातो. तो त्याच्या आकलनानुसार आपलं भविष्य सांगतो. जेव्हा -जेव्हा भविष्यवेत्त्यांची चर्चा होते, त्यामध्ये एक नाव हे असतंच ते म्हणजे बाबा वेंगा यांचं. बाबा वेंगा या एक प्रसिद्ध भविष्यवेत्त्या होत्या, त्यांचा जन्म बल्गेरियामधे झाला. असं मानलं जातं की एका वादळात सापडल्यामुळे त्यांनी आपल्या दोन्ही डोळ्यांची दृष्टी गमावली, मात्र त्यानंतर त्यांना दिव्य दृष्टी प्राप्त झाली. बाबा वेंगा यांनी आपल्या हयातीमध्ये अनेक महत्त्वाच्या जागतिक घटनांसंदर्भात भाकीतं वर्तवली होती, त्यातील अनेक भाकीतं खरी ठरल्याचा दावा केला जातो. ज्यामध्ये अमेरिकेवर झालेला हल्ला, हिटलरचा मृत्यू अशी काही उदाहरणं दिली जातात.
दरम्यान आता आणखी एक भविष्यवेत्ता चर्चेत आला आहे, ज्याचं नाव हेमिल्टन -पार्कर आहे. तो ब्रिटनचा रहिवासी आहे. हेमिल्टन -पार्कर याची देखील भाकीत खरी ठरत असल्याचा दावा अनेकांकडून करण्यात आला आहे. त्यामुळे त्याला आता “न्यू नास्त्रेदमस” आणि “प्रॉफ़ेट ऑफ डूम” नावानं ओळखलं जातं. काही दिवसांपूर्वीच त्याने एका समुद्रातील दुर्घटनेसंदर्भात भविष्यवाणी केली होती, आणि योगायोग ती खरी देखील ठरल्याचं पाहायला मिळालं.
काय होती ती भविष्यवाणी?
4 मार्च रोजी हेमिल्टन -पार्कर याने आपल्या एका युट्यूबच्या व्हिडीओमध्ये म्हटलं होतं की, मला वाटतं एखादं मोठं जहाज लवकरच संकटात सापडणार आहे, त्याचा मोठा अपघात होऊ शकतो. ते एखादं तेलाची वाहतूक करणारं जहाज असू शकतं. मला तसा संकेत मिळत आहे. दरम्यान हेमिल्टनने केलेल्या भविष्यवाणीनंतर अवघ्या काही आठवड्यातच ही घटना खरी ठरली आहे.
11 मार्चला हा अपघात झाला, इंग्लंडच्या समुद्र किनाऱ्यावर MV Solong नावाचं मोठं जहाज अमेरिकन तेल वाहतूक करणाऱ्या जहाजाला धडकलं. या अपघातानंतर जहाजाला आग लागली. त्यानंतर घटनास्थळी तातडीनं बचाव कार्य सुरू केल्यामुळे जहाजावरील 13 कर्मचाऱ्यांचा जीव वाचवण्यात यश आलं. मात्र एकजण बेपत्ता झाला, शोधमोहिमेनंतर त्याला मृत घोषित करण्यात आलं. तर दुसर्या जहाजावर असलेल्या 23 क्रू मेंबर्सला देखील सुखरूप वाचवण्यात आलं.
दरम्यान यापूर्वी देखील त्याने अनेक भविष्यवाणी केल्या आहेत, त्या खऱ्या ठरल्याचा दावा केला जात आहे, जुलै 2024 मध्ये त्याने म्हटलं होतं की डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर हल्ला होऊ शकतो, ट्रम्प यांच्यावर दोनदा हल्ला झाला. त्याने ब्रिटनची महारानी एलिझाबेथ द्वितीय यांच्या मृत्यूची देखील भविष्यवाणी केली होती, मी वीस वर्षांचा असताना भारताचा दौरा केला होता. तेव्हा मी येथील प्राचीन भविष्यवाणी शास्त्राचा अभ्यास केला, त्यावर आधारीतच आपण भविष्य सांगत असल्याचा दावा देखील त्याने केला आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)