AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या 4 राशींच्या लोकांना नेहमी वाटतं ‘माझ्याविरोधात कुणीतरी कट रचतंय’, अशा लोकांपासून सावधान!

असे काही लोक आहेत ज्यांना बर्‍याचदा किंबहुना सतत असं वाटते की आजूबाजूचे लोक त्यांच्याविरूद्ध कट रचत आहे. त्यांना नेहमी असुरक्षित, एकटं आणि आजूबाजूला घडणाऱ्या घटनाही अत्यंत संशयास्पद वाटतात. (4 Zodiac Signs most Confused Very difficult to trust them)

या 4 राशींच्या लोकांना नेहमी वाटतं 'माझ्याविरोधात कुणीतरी कट रचतंय', अशा लोकांपासून सावधान!
Horoscope
| Edited By: | Updated on: Jun 05, 2021 | 7:07 AM
Share

मुंबई :  जेव्हा खरंच कुणीतरी आपल्याविषयी कट रचतंय, आपल्याला एखाद्या जाळ्यात अडकवण्यासाठी कुणातरी प्रयत्न करतंय, तेव्हा आपल्या मनात कट रचण्याची किंवा भीतीची भावना साहजिक आहे. परंतु असे काही लोक आहेत ज्यांना बर्‍याचदा किंबहुना सतत असं वाटते की आजूबाजूचे लोक त्यांच्याविरूद्ध कट रचत आहे. त्यांना नेहमी असुरक्षित, एकटं आणि आजूबाजूला घडणाऱ्या घटनाही अत्यंत संशयास्पद वाटतात. या राशीच्या लोकांपासून जरा सावधगिरी बाळगून राहिलं पाहिजे, म्हणजे त्याचा त्रास आपल्याला होणार नाही. (4 Zodiac Signs most Confused Very difficult to trust them)

अशा राशीचे लोक गरजेपेक्षा अधिक सावधगिरी बाळगतात, त्यांच्या मनात इतर लोकांबद्दल सतत विचार सुरु असतो. ज्योतिषशास्त्रानुसार, या 4 राशीच्या लोकांवर जरा विश्वास ठेवताना जपून ठेवावा लागतो. अशा लोकांवर लगोलग विश्वास ठेवणं, घाईचं ठरतं.

मेष राषी

मेष राशीच्या लोकांना नेहमी असं वाटतं ती बहुतांशी त्यांच्याशी खोटं बोलतात. त्यांना यामुळए असं वाटतं की लोकं खोटं बोलण्याचं कारण म्हणजे त्यांना आपल्याला धोका द्यायचाय. त्यामुळे ते कोणावर विश्वास ठेवत नाहीत आणि त्यांना भेटलेल्या प्रत्येकावर ते छोटासा का होईना पण संशय घेतात.

कन्या राशी

कन्या राशीचे लोक नेहमीच सावध असतात आणि त्यांच्या सभोवतालच्या वातावरणाबद्दल, लोकांबद्दल ते अधिक जागरूक असतात. ते लोकांना संशयाच्या नजरेने बघतात आणि बहुतेक वेळा त्यांच्या डोक्यात नको त्या गोष्टींबद्दल विचार सुरु असतो जो त्यांनी करायला नको. ज्या गोष्टींची त्यांना भीती वाटते अशा गोष्टी ते दूर लोटण्यासाठी प्रयत्नात असतात.

वृश्चिक राशी

वृश्चिक राशीचे लोक खूप संवेदनशील आणि भावनिक असतात, त्याचमुळे ते इतरांविषयी प्रेमाने का होईना पण शंका घेतात, भेटलेल्या प्रत्येक व्यक्तीबद्दल थोडा वेळ विचार करतात. ते बहुतेक वेळेस विनाकारण घाबरतात त्यामुळे ते तणावाखाली किंवा चिंताग्रस्त वाटतात.

मकर राशी

मकर राशीचे लोक प्रतिभावान असतात. पण त्यांना सतत असं वाटत असतं की आपल्याला आपल्या कामाचं श्रेय दिलं जात नाही. त्यांना सारखं वाटतं की लोकं आपल्याकडे दुर्लक्ष करतात. साहजिक त्यामुळे त्यांचं त्यांच्या प्रतिभेकडे दुर्लक्ष होतं आणि नुकसानीला सामोरं जावं लागतं.

(4 Zodiac Signs most Confused Very difficult to trust them)

हे ही वाचा :

Horoscope 4th June 2021 | वृषभ राशीला अनपेक्षित फायदा होणार, कन्या राशीने आपल्या कामाशी काम ठेवावे, जाणून घ्या संपूर्ण राशीभविष्य

या 5 राशींची लोकं बोलताना किंवा कोणतंही पाऊल उचलताना एक क्षणही विचार करत नाही!

फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.