AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बाबा वेंगा यांचं आणखी एक मोठं भाकीत समोर, 2043 मध्ये घडणार मोठी घटना, भारतामध्ये काय होणार?

बाबा वेंगा यांचं खरं नाव वेंगोलिया पांडेवा दिमित्रोवा असं होतं. त्यांचा जन्म बल्गेरियामध्ये झाला. त्या आपल्या भाकीतांसाठी जगप्रसिद्ध होत्या, आजही त्यांंच्या भविष्यवाणींची चर्चा होते.

बाबा वेंगा यांचं आणखी एक मोठं भाकीत समोर, 2043 मध्ये घडणार मोठी घटना, भारतामध्ये काय होणार?
Image Credit source: गुगल
| Updated on: Apr 18, 2025 | 9:33 PM
Share

बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीनुसार 2043 पर्यंत संपूर्ण युरोप खंडामध्ये मुस्लीम समाज आपलं राजकीय वर्चस्व निर्माण करेल. बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीमध्ये असंही म्हटलं आहे की, 2025 मध्ये युरोपात एका मोठ्या संघर्षला सुरुवात होणार आहे, तीच जगाच्या अंताची सुरुवात असेल. या संघर्षाचा परिणाम असा होईल की 2043 पर्यंत संपूर्ण युरोपमध्ये मुस्लिमांची राजवट स्थापन होईल. मात्र बाबा वेंगा यांनी हे जे भाकीत वर्तवलं आहे, ते केवळ युरोपीयन देशांसंदर्भात आहे. युरोपमधील 44 देशांमध्ये मुस्लीम समाजाची राजवट येईल असं बाबा वेंगा यांनी म्हटलं आहे. यामध्ये एकाही आशिया खंडातील देशाचा समावेश नाही. ही भविष्यवाणी किती खरी ठरणार हे कोणीही सांगू शकत नाही, मात्र तरी देखील बाबा वेंगा आणि त्यांनी वर्तवलेल्या भाकीतांबाबत लोकांमध्ये मोठी उत्सुकता दिसून येते. भाराताबाबत या भाकीतामध्ये कोणताही उल्लेख करण्यात आलेला नाहीये.

बाबा वेंगा कोण होत्या?

बाबा वेंगा यांचं खरं नाव वेंगोलिया पांडेवा दिमित्रोवा असं होतं. त्यांचा जन्म बल्गेरियामध्ये झाला. त्यांचा जन्म 31 जेनेवारी 1911 रोजी झाला. तर मृत्यू 11 ऑगस्ट 1996 साली बल्गेरियामधील सोफिया नावाच्या गावात झाला.असं मानलं जातं की एका वादळात सापडल्यामुळे त्यांनी आपल्या दोन्ही डोळ्यांची दृष्टी गमावली, मात्र त्यानंतर त्यांना दिव्य ज्ञानाची प्राप्ती झाली. त्यानंतर त्यांनी भविष्यवाणी वर्तवण्यास सुरुवात केली.त्यांनी आपल्या हयातीमध्ये अनेक भाकीतं वर्तवली. त्यातील अनेक भविष्यवाणी खऱ्या ठरल्याचा दावा केला जातो. दुसरं महायुद्ध, अमेरिकेवर झालेला हल्ला, चेरनोबिलचा अपघात, इंग्लंडच्या राणीचा मृत्यू त्यांनी सांगितलेल्या अशा अनेक घटना खऱ्या ठरल्याचा दावा केला जातो.

दरम्यान 2025 संदर्भात देखील त्यांनी मोठी भविष्यवाणी केली आहे. 2025 पासून जगाच्या अंताला सुरुवात होईल. 2025 मध्ये विनाशकारी आणि भयानक भूकंप होतील. ज्याचा मोठा फटका हा मानव जातीला बसेल प्रचंड प्रमाणात वित्तहानी आणि जीवितहानी होईल. जगावर महापुराचं संकट येईल. युरोपीयन राष्ट्रांमध्ये मोठा संघर्ष निर्माण होईल. युद्ध सुरू होईल, या युद्धाचा मोठा फटका हा पश्चिमेकडील राष्ट्रांना बसेल असं बाबा वेंगा यांनी म्हटलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.