Astrology 2025 : 26 मे रोजी शनि अमावस्येला दुर्लभ योग, 30 वर्षानंतर या राशींचं नशिब चमकणार
Shani Transit 2025 : 26 मे रोजी शनि अमावस्या आहे. या दिवशी शनि महाराज मीन राशीत असणार आहे. त्यामुळे 30 वर्षानंतर असा योग जुळून आला आहे. त्यामुळे तीन राशीच्या जातकांना लाभ मिळणार आहे.

ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहमंडळात ठरावीक कालावधीनंतर काही ना काही घडत असतं. त्याचा राशीचक्रावर परिणाम होत असतो. शनि महाराज एका राशीत अडीच वर्षे राहतात. पण त्याचा प्रभाव पाठच्या आणि पुढच्या राशींवर होतो. म्हणजेच साडेसाती सुरु असते. तसेच चौथ्या आणि आठव्या स्थानी असल्यास पनौती लागते. या अडीच वर्षाच्या कालावधीला अडीचकी असं संबोधलं गेलं आहे. शनि महाराज 30 वर्षानंतर गोचर करत मीन राशीत विराजमान आहेत. या वर्षी शनि अमावस्या 26 मे रोजी आहे. त्यामुळे या दिवशी काही राशींना जबरदस्त लाभ होणार आहे. तीन राशींवर शनिदेवांची कृपा होणार आहे. करिअर आणि व्यवसायात लाभ मिळू शकतो. इतकंच काय तर अडकलेले पैसेही परत मिळू शकतात.
या तीन राशींना मिळणार लाभ
मिथुन : या राशीच्या जातकांना शनि महाराजांचं गोचर फलदायी ठरणार आहे. कारण या राशीच्या कर्मस्थानात शनिदेव गोचर करत आहेत. यामुळे नोकरी, उद्योग धंद्याच्या ठिकाणी प्रगती दिसून येईल. नोकरी करणाऱ्या जातकांना कामाच्या ठिकाणी प्रगतीची नवी दारं खुली होतील. वरिष्ठांकडून कौतुकाचा थाप पाठीवर पडेल. इतकंच काय तर प्रमोशन आणि पगारवाढही शक्य आहे. व्यवसायिकांना नवे टेंडर मिळू शकतात. त्यामुळे उत्पन्नाचे नवे स्रोत खुले होतील. न्यायालयीन प्रकरणातही अपेक्षित यश मिळेल.
मकर : मकर राशीच्या तिसऱ्या स्थानात शनि महाराज गोचर करत आहेत. नुकतीच साडेसाती संपली आहे. त्यामुळे या अडीच वर्षात बरंच काही चांगलं घडताना दिसणार आहे. गेल्या काही दिवसांपासून अडकलेली कामं पूर्ण होणार आहेत. व्यवसायात अचानक धनलाभ होऊ शकतो. तसेच अडकलेली कामं मार्गी लागतील. सरकारी कामात अपेक्षित यश मिळेल. या काळात वाहन किंवा प्रॉपर्टी खरेदी करू शकता. कौटुंबिक पातळीवर आनंदी वातावरण असेल.
वृषभ : या राशीच्या उत्पन्न आणि लाभ स्थानात शनि महाराज गोचर करत आहेत. त्यामुळे या दिवसापासून लाभ मिळू शकतो. तुमचं उत्पन्न वाढू शकते. तसेच स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अपेक्षित लाभ मिळू शकतो. सरकारी नोकरीसाठी प्रयत्नशील व्यक्तींना यश मिळू शकतं. हाती घेतलेली कामं चुटकीसरशी पूर्ण करता येतील. आता केलेल्या गुंतवणुकीतून चांगला लाभ मिळेल.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)