Astrology : पुढचे दोन महिने शनि राहणार या विशेष योगात, या राशीच्या लोकांना राहावे लागेल सावध
शनीची चाल खूप मंद आहे आणि त्याला त्याचे राशी बदलण्यासाठी सुमारे अडीच वर्षे लागतात, तर चंद्र सुमारे अडीच दिवसांत त्याची राशी बदलतो. पण उद्या म्हणजेच 15 एप्रिलला शनीच्या राशीत चंद्र आल्याने युती होत आहे.

मुंबई : वैदिक गणनेनुसार, सर्व ग्रह आणि नक्षत्र ठराविक काळासाठी त्यांचे राशिचक्र बदलतात. ज्योतिषशास्त्रानुसार, चंद्राला मनाचा कारक आणि शनिदेव हे कर्माचा दाता आणि न्याय देवता म्हणून वर्णन केले आहे. शनीची चाल खूप मंद आहे आणि त्याला त्याचे राशी बदलण्यासाठी सुमारे अडीच वर्षे लागतात, तर चंद्र सुमारे अडीच दिवसांत त्याची राशी बदलतो. पण उद्या म्हणजेच 15 एप्रिलला शनीच्या राशीत चंद्र आल्याने युती होत आहे. त्यामुळे विष योग (Vish yoga) तयार होत आहे. विष योगाचा प्रभाव सर्व राशींवर दिसून येईल, परंतु काही राशींवर हा नकारात्मक प्रभाव दिसून येईल. या दरम्यान, या राशीच्या लोकांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे, तर चला जाणून घेऊया विष योग दरम्यान कोणत्या राशीच्या लोकांना सतर्क राहावे लागेल.
शनि चंद्र युती
ज्योतिषशास्त्रात, जिथे शनिला क्रूर ग्रह म्हणून वर्णन केले गेले आहे, तिथे चंद्राला मनाचा कारक म्हणून वर्णन केले आहे. चंद्र देखील आईशी संबंधित आहे. चंद्राच्या स्वभावाचे वर्णन चंचल असे केले आहे. जेव्हा हे दोन ग्रह कुंडलीत कोणत्याही प्रकारचे संबंध तयार करतात तेव्हा विष योगाची स्थिती निर्माण होते. विष योगाचा प्रभाव कर्क, कन्या आणि वृश्चिक राशींवर अडीच महिने अधिक दिसेल. या दरम्यान तुम्हाला संमिश्र परिणाम दिसतील.
विष योगासाठी उपाय
- विष योगाचा प्रभाव कमी करण्यासाठी शनिदेवाच्या जवळ तेलाचा दिवा लावावा.
- शनिदोषाचा प्रभाव कमी करण्यासाठी गाय आणि कुत्र्याला भाकरी खायला द्या.
- पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करून दिवा लावा.
- हनुमान चालिसाचे पठण करा. याशिवाय सोमवारी शिवलिंगाची पूजा करून गायत्री मंत्राचा जप करावा.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
