Astrology: शुक्र आणि सूर्याची युती ‘या’ राशींच्या आयुष्यात आणणार सोनेरी दिवस!

ज्योतिष शास्त्रानुसार शुक्र ग्रह 7 ऑगस्ट रोजी कर्क राशीत प्रवेश करणार आहे. या राशीत सूर्य ग्रह आधीच स्थित आहे. शुक्र कर्क राशीत प्रवेश करताच सूर्याशी युती होईल. या युतीचा प्रभाव सर्व राशींच्या जीवनावर दिसून येईल.

Astrology: शुक्र आणि सूर्याची युती 'या' राशींच्या आयुष्यात आणणार सोनेरी दिवस!
सूर्य आणि शुक्राची युती
Image Credit source: Social Media
नितीश गाडगे

|

Jul 28, 2022 | 6:43 PM

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार (Astrology)  पत्रिकेत शुक्राचे स्थान अतिशय महत्त्वाचे असते.  शुक्राच्या शुभ स्थानामुळे भौतिक सुख, वैवाहिक सुख आणि संतती सुख प्राप्त होते. शुक्राच्या स्थितीवरून एखाद्या व्यक्तीच्या विवाह आणि मुलांशी संबंधित माहिती जाणून घेणे शक्य आहे. जेव्हा कोणताही ग्रह राशी बदलतो तेव्हा त्याचा परिणाम सर्व राशींच्या आर्थिक स्थिती, वैवाहिक जीवन आणि आरोग्यवर होतो. ज्योतिष शास्त्रानुसार शुक्र ग्रह 7 ऑगस्ट रोजी कर्क राशीत प्रवेश करणार आहे. या राशीत सूर्य ग्रह आधीच स्थित आहे. शुक्र कर्क राशीत प्रवेश करताच सूर्याशी युती होईल. या युतीचा प्रभाव सर्व राशींच्या जीवनावर दिसून येईल. तीन राशींवर या राशीचा शुभ प्रभाव पडेल.

  1. मेष- ज्योतिष शास्त्रानुसार मेष राशीच्या लोकांच्या मान-सन्मानात वाढ होईल. या लोकांचे वैवाहिक जीवन आनंदी राहील. जीवनसाथीसोबत चांगला वेळ घालवू शकाल. परस्पर वाद दूर होण्याची शक्यता आहे. तसेच काही चांगल्या बातम्या जीवनात बदल घडवून आणतील.
  2. मिथुन- शुक्र आणि सूर्य यांच्या युतीमुळे या राशीच्या लोकांच्या घरातील वातावरण प्रसन्न राहील. संततीप्राप्तीची इच्छा असलेल्या लोकांच्या मनोकामना पूर्ण होतील. लाइफ पार्टनरला वेळ देऊ शकाल आणि तब्येतही चांगली राहील.
  3. कन्या- शुक्र आणि सूर्याच्या युतीने कन्या राशीच्या लोकांच्या वैवाहिक जीवनावर परिणाम दिसून येईल. प्रेम आणि परस्पर समंजसपणा वाढेल. या काळात तुम्हाला एखाद्या आजारापासून मुक्ती मिळेल. ज्योतिष शास्त्रानुसार या काळात जीवन साथीदाराला नोकरीत लाभ मिळू शकतो.

या राशींसाठी ठरणार त्रासदायक

ज्योतिषशास्त्रानुसार, कोणत्याही ग्रहाच्या हालचालीचा सर्व राशींच्या जीवनावर शुभ आणि अशुभ दोन्ही प्रभाव पडतो. त्याचबरोबर तूळ, धनु आणि कुंभ राशीच्या लोकांसाठी हा काळ थोडा त्रासदायक ठरेल. त्यांचे जोडीदाराशी वाद होऊ शकतात. नात्यात दुरावा येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या काळात थोडे सावधपणे वागणे योग्य राहील.

हे सुद्धा वाचा

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें