Baba Vanga Prediction: ग्रहांच्या हालचालींमुळे जुलै महिन्यात येणार मोठ संकट, बाबा वेंगाची ती भीतीदायक भविष्यवाणी ठरणार खरी?
Baba Vanga Prediction: बाबा वेंगा यांची प्रत्येक भविष्यवाणी ही आजवर खरी ठरली आहे. त्यामुळे त्यांनी काही ग्रहांच्या हालचालीचे भाकीत खरं ठरणार का? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

जुलै हा महिना इतिहास, खगोलशास्त्र आणि भविष्यवाणीच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. प्रसिद्ध भविष्यवक्त्या बाबा वेंगा यांनी 2025 साठी केलेल्या भविष्यवाणीची पुन्हा एकदा जोरदार चर्चा सुरू झाली आहे. त्यांनी यावेळी ग्रहांच्या हालचालीवरुन भाकीत केलं आहे. यापूर्वी विनाश, युद्ध, राजकीय अस्थिरता, आर्थिक संकट आणि महामारी यांसारख्या विषयांवर भाष्य केले आहे. अलीकडेच त्यांनी ग्रहांच्या हालचालींशी संबंधित काही महत्त्वाचे संकेत दिले आहेत.
ग्रहांच्या हालचालींचा धोकादायक संकेत
गुरु अस्त (9 जून ते 7 जुलै 2025)
मिथुन राशीत गुरु ग्रह अस्त होणार आहे. गुरुच्या या अवस्थेमुळे नीती, धर्म, विवेक आणि नेतृत्वक्षमता यांमध्ये कमतरता जाणवू शकते. समाजात दिशाहीनता निर्माण होऊ शकते, ज्यामुळे काही राशींच्या लोकांसाठी हा काळ आव्हानात्मक ठरेल.
वाचा: EMIचं ओझं वाढतय, यश मिळत नाही? शनीदेव तर नाराज नाहीत? वाचा उपाय
शनी वक्री (13 जुलै ते 30 नोव्हेंबर 2025)
मीन राशीत शनी वक्री अवस्थेत जाणार आहे. शनीची वक्री चाल व्यवस्था, सत्ता आणि न्यायव्यवस्थेत संकटांचे संकेत देते. त्यामुळे या काळात काही राशींच्या व्यक्तींनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.
गुरु अतिचारी चाल
गुरु ग्रह मिथुन राशीत अतिचारी गतीने फिरत आहे. यामुळे निर्णय प्रक्रियेत गोंधळ आणि नीतीमत्तेत अस्थिरता येऊ शकते. शिवाय, मंगळ ग्रहाची दृष्टीदेखील मिथुन राशीवर पडणार आहे, ज्यामुळे युद्धासारखी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.
कोण आहेत बाबा वेंगा?
बाबा वेंगाचा जन्म 1911 मध्ये व्हांजेलिया पांडेवा दिमित्रोव्हा म्हणून झाला. त्या एक प्रसिद्ध बल्गेरियन गूढवादी आणि उपचारक होत्या, ज्यांना भविष्य पाहण्याच्या कथित क्षमतेसाठी ओळखले जाते. त्यांच्या काही भविष्यवाण्या अस्पष्ट आणि व्याख्येसाठी खुल्या असल्या तरी काही भविष्यवाण्या आश्चर्यकारकपणे अचूक मानल्या जातात. नवीन वर्षाच्या सुरुवातीला, बाबा वांगाच्या गूढ आणि कधीकधी चिंताजनक भविष्यवाण्यांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यांच्या भविष्यवाण्यांनी नेहमीच कुतूहल आणि वादविवाद निर्माण केला आहे.