AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Horoscope 8 May 2022 : व्यावसायिक कामे सुरळीत पार पडतील, कुटुंबातही प्रेमाचे वातावरण राहील

Horoscope 8 May 2022 : आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल? आजचे स्टार काय सांगतायत? दैनिक राशिभविष्य 2022 द्वारे आजचे राशीभविष्य आणि संपूर्ण दिवसातील घडामोडींची माहिती जाणून घ्या.

Horoscope 8 May 2022 : व्यावसायिक कामे सुरळीत पार पडतील, कुटुंबातही प्रेमाचे वातावरण राहील
zodiac
| Updated on: May 08, 2022 | 6:00 AM
Share

आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल? आजचे स्टार काय सांगतायत? दैनिक राशिभविष्य 2022 द्वारे आजचे राशीभविष्य आणि संपूर्ण दिवसातील घडामोडींची माहिती जाणून घ्या. हे राशीभविष्य (Horoscope) वाचून तुम्ही तुमच्या दैनंदिन योजना यशस्वी करू शकाल. आज तुम्हाला कोणत्या आव्हानां (Challenge)चा सामना करावा लागू शकतो किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात. दैनंदिन राशीभविष्य वाचून तुम्ही परिस्थितीसाठी तयार होऊ शकता.

मेष

कोणतेही काम करण्यापूर्वी त्याचे योग्य नियोजन करा अर्थात एक ड्राफ्ट तयार करा. त्यामुळे काम करताना कोणत्याही प्रकारची चूक होणार नाही. कौटुंबिक आणि वैयक्तिक स्वरूपाची कामे करण्यासाठी काही योजना आखाल. त्यात तुम्हाला बर्‍याच प्रमाणात यश येईल. मुलांच्या भावना समजून घ्या आणि त्यांच्या उपक्रमातही सहकार्य करा. तुमच्या वैयक्तिक बाबींमध्ये इतरांना ढवळाढवळ करू देऊ नका. अन्यथा, तुमच्या कामात काही अडथळे येऊ शकतात. या आठवड्यात व्यावसायिक कामे सुरळीत पार पडतील. कामाच्या ठिकाणी आपली उपस्थिती अवश्य ठेवा. कारण कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे कार्यालयीन व्यवस्थेलाही फटका बसू शकतो. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा सध्याच्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी काही योजना आखत असाल तर हा काळ त्यासाठी अनुकूल आहे. नोकरदारांना हा काळ काही विशेष यश देणारा आहे.

प्रेम संबंध – तुमच्या जोडीदाराचा पाठिंबा आणि सल्ला तुमचे मनोबल वाढवेल. कुटुंबातही प्रेमाचे वातावरण राहील. प्रेमसंबंधांमध्ये एकमेकांचा मान-सन्मान ठेवा.

खबरदारी – सध्याच्या हवामानात तुम्हाला संसर्ग किंवा ऍलर्जीसारखा त्रास होऊ शकतो. त्यामुळे तुमची दिनचर्या व्यवस्थित ठेवा. आयुर्वेदिक उपचार तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरतील.

शुभ रंग – पिवळा भाग्यवान अक्षर –भाग्यांक – 5

वृषभ

काही प्रतिकूल परिस्थिती समोर येईल. पण तुम्ही त्यांचा खंबीरपणे सामना करू शकाल. धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यांकडेही तुमचा कल वाढेल. स्थलांतराची योजना तयार करीत असाल तर त्यावर गांभीर्याने काम करा. त्यासाठी सध्याचा काळ अनुकूल आहे. तुमचा कोणत्याही महत्त्वाच्या मुद्द्यावर गोंधळ होत असेल, मनात नाना प्रकारचे प्रश्न येत असतील, तर तुम्ही जवळच्या लोकांचा सल्ला घ्या. त्यांच्याकडून तुम्हाला नक्कीच योग्य सल्ला मिळेल. वैयक्तिक कामातील व्यस्ततेमुळे कुटुंबीय आणि नातेवाईकांसोबत जास्त वेळ घालवता येणार नाही. त्यामुळे तुम्हाला त्यांची नाराजी सहन करावी लागू शकते. आळशीपणामुळे व्यवसायातील काम उद्यावर ढकलू नका. त्यापेक्षा कुठलेही काम वेळेवर पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. सध्याचा वेळ तुमच्यासाठी यशस्वी ठरणारा आहे. नियोजनबद्ध पद्धतीने काम करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. कार्यालयात महत्त्वाची कागदपत्रे आणि फाइल्स व्यवस्थित ठेवणे महत्त्वाचे आहे.

प्रेम संबंध – कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील. प्रिय व्यक्तीची भेट होईल व त्यातून तुमच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. प्रेमसंबंधांमध्ये कौटुंबिक मान्यता मिळेल. त्यामुळे मानसिक शांती आणि आनंदाचे वातावरण राहील.

खबरदारी – कोलमडलेली दिनचर्या तसेच खाण्याच्या सवयींचे बिघडलेले वेळापत्रक यामुळे आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकेल. सध्याच्या हवामानात बेफिकीर राहणे योग्य नाही. प्रतिकूल हवामानाचा विचार करता निसर्गाच्या सहवासात थोडा वेळ घालवा.

शुभ रंग – गुलाबी भाग्यवान अक्षर –भाग्यांक – 8

मिथुन

सध्याचा काळ तुमच्यासाठी फार आव्हानात्मक आहे. पण तुम्ही तुमच्या कौशल्याने तसेच कामाच्या क्षमतेने प्रत्येक परिस्थितीला तोंड देऊ शकाल. आठवड्याच्या उत्तरार्धात तुमच्या यशाचे काही दरवाजे उघडणार आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली चिंता दूर होईल. भविष्यातील नियोजनाबाबत काही महत्त्वाचे धोरण आखू शकाल. स्वतःच्या फायद्यासाठी तुमच्या वागण्यात थोडासा स्वार्थीपणा आणणेदेखील आवश्यक आहे. तुमच्या जवळचे काही लोक तुमच्यासाठी अडथळे निर्माण करू शकतात. कोणाच्याही गोड बोलण्याला बळी पडू नका. कायदेशीर आणि सरकारी बाबींमध्ये गाफील राहू नका. काम आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या यांच्यात संतुलन राखण्याचे आव्हान तुमच्यापुढे असेल. नवीन तंत्रज्ञानाच्या वापराशी संबंधित कार्यपद्धती इत्यादींवर चर्चा होईल. सरकारी नोकरांशी व्यवहार करताना सावधगिरी बाळगा. यादरम्यान तुमची बदनामी होण्याची शक्यता आहे.

प्रेम संबंध – व्यस्तता असूनही कुटुंबाला प्राधान्य द्याल. त्यामुळे तुमच्या घरातील वातावरण चांगले राहील. कुटुंबात आनंद आणि शांती राहील. गैरसमजांमुळे प्रेमप्रकरणात कटुता येऊ शकते.

खबरदारी – जास्त धावणे आणि कठोर परिश्रम केल्याने तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. तसेच बद्धकोष्ठता, वाताचे विकार यांसारख्या समस्याही तुम्हाला सतावतील. या अनुषंगाने तुम्हाला आहार आणि दिनचर्या व्यवस्थित ठेवणे महत्वाचे असेल.

शुभ रंग – पांढरा भाग्यवान अक्षर –भाग्यांक – 7

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.