Daily Horoscope 27 June 2022: ‘या’ राशीच्या लोकांना मिळणार जोडीदाराकडून आनंदाची बातमी; आजचे राशि भविष्य

मेष- आजच्या दिवशी घर दुरुस्ती आणि सजावट महत्त्वाचं काम असू शकतं. काही वेळा काही कामात अपेक्षित परिणाम न मिळाल्याने अस्वस्थ व्हाल. चुकीच्या गोष्टींमध्ये वेळ वाया घालवू नका. अनावश्यक खर्च करू नका. वृषभ- दिवसाच्या सुरुवातीला तुम्ही नव्या कामाच्या सुरुवातीबद्दल आणि नव्या नात्याबद्दल उत्साही राहाल. शरीर आणि मनाचं आरोग्यामुळे तुमचा उत्साह वाढेल. नातेवाइकांशी संबंध बिघडण्याची शक्यता आहे. […]

Daily Horoscope 27 June 2022: 'या' राशीच्या लोकांना मिळणार जोडीदाराकडून आनंदाची बातमी; आजचे राशि भविष्य
नितीश गाडगे

|

Jun 27, 2022 | 7:00 AM

 1. मेष- आजच्या दिवशी घर दुरुस्ती आणि सजावट महत्त्वाचं काम असू शकतं. काही वेळा काही कामात अपेक्षित परिणाम न मिळाल्याने अस्वस्थ व्हाल. चुकीच्या गोष्टींमध्ये वेळ वाया घालवू नका. अनावश्यक खर्च करू नका.
 2. वृषभ- दिवसाच्या सुरुवातीला तुम्ही नव्या कामाच्या सुरुवातीबद्दल आणि नव्या नात्याबद्दल उत्साही राहाल. शरीर आणि मनाचं आरोग्यामुळे तुमचा उत्साह वाढेल. नातेवाइकांशी संबंध बिघडण्याची शक्यता आहे. त्यामुळे आजच्या दिवशी रागावर नियंत्रण ठेवा.
 3. मिथुन- व्यवहारात फसवणूक होण्याची शक्यता आहे. आजच्या दिवशी आरोग्य कमजोर राहू शकतं. काहींना नवीन नोकरी मिळण्याचे संकेत आहेत. तर जवळच्या व्यक्तीसोबत अचानक समस्या उद्भवू शकतात.
 4. कर्क- आजच्या दिवशी आर्थिक बाजूचा विचार करा आणि योग्य तो निर्णय घ्या. तुमची कोणतीही योजना कोणालाही सांगू नका. काही अनपेक्षित खर्च होऊ शकतात. आर्थिक परिस्थिती बिघडण्याची शक्यता आहे.
 5. सिंह- या राशीच्या लोकांचे आज कामात मन लागणार नाही. परंतू अनेक नवीन कल्पनांवर काम करण्याची संधी मिळेल. प्रियकर / प्रेयसी आपला वेळ आनंदात घालवू शकतील. गृहिणी आणि महिलांना काहीशा आरोग्याच्या समस्या जाणवतील.
 6. कन्या- आजचा दिवस अत्यंत शुभ आहे. अनेक कामं मार्गी लागतील. विद्यार्थ्यांना आनंदाची बातमी मिळेल. उद्योजकांना नवीन सहकारी मिळतील. जिवनसाथीकडून सप्राईज मिळू शकते. आरोग्याची काळजी घेणं गरजेचं असेल. वृद्धांनी प्रवास टाळावा
 7. तुळ- या राशीच्या लोकांना वरिष्ठांकडून चांगली बातमी मिळू शकते. नवीन प्रोजेक्ट सुरू करू शकता. विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळू शकते. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस आनंददायी ठरू शकतो. नातेवाईकांची मदत करण्याची संधी आहे.
 8. वृश्चिक- या राशीच्या लोकांच्या कामाबद्दल प्रामाणिकपणा आणि समर्पण त्यांना आर्थिक बाबतीत निराश होऊ देणार नाही. सध्याचा काळ हा तुमचा व्यवसाय वाढवण्याचा आहे, या विषयावर पूर्ण लक्ष केंद्रित करा आणि प्रमोशनचाही वापर करा.
 9. धनु- नोकरीसाठी केलेले प्रयत्न यशस्वी होणार आहेत. महिला त्यांच्या कामाबद्दल अधिक जागरूक राहतील आणि यशही मिळेल. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या समस्या आणि अस्वस्थता यातूनही सुटका होण्याची शक्यता आहे.
 10. मकर- या राशीच्या लोकांसाठी इतरांकडून मदतीची अपेक्षा करणं वेळ वाया घालवण्यासारखे आहे. तरुणांसाठी वेळ अनुकूल आहे, महत्त्वाच्या कामात घालवा आणि वेळ वाया जाऊ देऊ नका.
 11. कुंभ- या राशीच्या लोकांना सुट्टीच्या दिवशीही कामाचा पदभार स्वीकारावा लागू शकतो. ऑफिसमधलं काम असेल तर करावं लागेल. इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या विक्रीसाठी आजचा दिवस चांगला आहे.
 12. मीन- या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंदाचा ठरेल. जीवनसाथीकडून आनंदाची बातमी मिळेल. सह कुटूंब प्रवासाचा योग आहे. विद्यार्थ्यांना मेहनतीचे फळ मिळालेले दिसेल. नोकरदारांना आर्थिक फायदा होईल.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें