Zodiac Signs | विवाहाचं नाव ऐकूनही घामटं फुटतं, ‘या’ चार राशींच्या व्यक्ती लग्नापासून का धूम ठोकतात?

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Sep 05, 2021 | 3:00 PM

बरेच जण लग्न करण्याचे स्वप्न पाहतात. मात्र लग्नाच्या वेळेपर्यंत त्यांना बर्‍याच बदलांची भीती वाटते, त्यामुळे अनेक समस्या उद्भवतात.

Zodiac Signs | विवाहाचं नाव ऐकूनही घामटं फुटतं, 'या' चार राशींच्या व्यक्ती लग्नापासून का धूम ठोकतात?
Zodiac Signs

मुंबई : काही जण बोहल्यावर चढण्यासाठी अक्षरशः गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले असतात. आपल्या आयुष्यातील त्या खास दिवसासाठी त्यांनी मनात मोठमोठ्या योजनाही आखलेल्या असतात. आपले उर्वरित आयुष्य जोडीदारासोबत घालवण्यासाठी त्यांना धीर धरवत नाही. ते लग्नाबद्दल खूपच उत्साही असतात आणि एका विशिष्ट वयानंतर स्वतःचा जोडीदार शोधण्यासाठी त्यांची धडपड सुरु असते. मात्र काही जण असेही असतात, जे लग्न करण्याच्या कल्पनेलाही घाबरतात.

लग्नाच्या बाबतीत या लोकांच्या मनात खूप भीती असते आणि म्हणूनच ते एका व्यक्तीसोबत आयुष्य व्यतीत करण्यास फारसे उत्सुक नसतात. ज्योतिष शास्त्रानुसार, राशिचक्रातील चार राशी अशा आहेत, ज्यांचे हात-पाय लग्नाच्या साध्या कल्पनेनेही थंड पडतात.

कन्या रास (Virgo)

कन्या राशीच्या व्यक्ती अत्यंत उच्च दर्जाचे जीवन व्यतीत करणे पसंत करतात. त्यांना तडजोड मान्य नसते आणि म्हणूनच त्यांना परफेक्शनिस्ट असंही म्हटलं जातं. त्यांना लग्नाच्या संकल्पनेने फारसं रोमांचित वाटत नाही, कारण त्यांची धारणा असते की कोणीही त्यांच्या अपेक्षा आणि स्टँडर्ड पूर्ण करु शकणार नाही.

वृश्चिक रास (Scorpio)

वृश्चिक राशीच्या व्यक्तींना आपले मन मोकळे करणे नीटसे जमत नाही. ही त्यांची सवय त्यांना लग्नबंधनात अडकण्यापासून भयकंपित करते. त्यांना वाटते की ते आपल्या जोडीदारापाशी त्यांच्या भावना त्यांना हव्या तितक्या उत्कटपणे व्यक्त करू शकणार नाहीत.

धनु रास (Sagittarius) 

धनु राशीच्या व्यक्ती अत्यंत उत्साही असतात. त्यांच्या आयुष्यात नकारात्मकता किंवा नाटकीपणाला स्थान नाही. लग्नासोबत अनेक जबाबदाऱ्या आणि समस्या येतात, असा त्यांचा समज असतो. म्हणूनच ते लग्न करण्याच्या कल्पनेला घाबरतात.

मीन रास (Pisces)

मीन राशीचे लोक अद्वितीय आणि अपारंपरिक असतात. ते इतरांमध्ये सहजासहजी मिसळत नाहीत आणि म्हणूनच ते लग्न करण्यास फारसे उत्सुक नसतात. त्यांना वाटते की त्यांचा जीवनसाथी त्यांची मानसिकता आणि विचार प्रक्रिया समजून घेणार नाही.

बरेच जण लग्न करण्याचे स्वप्न पाहतात. मात्र लग्नाच्या वेळेपर्यंत त्यांना बर्‍याच बदलांची भीती वाटते, त्यामुळे अनेक समस्या उद्भवतात.

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा

संबंधित बातम्या :

Zodiac Signs | जोडीदारासोबतच पक्के मित्र असतात या राशीच्या व्यक्ती, ठरतात सर्वोत्तम जोडपे

Zodiac Signs | या 4 राशीच्या व्यक्ती जोखीम घेताना कधीही मागेपुढे पाहात नाही, नेहमी आव्हानांसाठी असतात तयार

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI