AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Horoscope Today 15 March 2024 : आजचे राशी भविष्य; विद्यार्थ्यांसाठी कसा जाईल आजचा दिवस ?

कामाच्या ठिकाणी अचानक ताण वाढू शकतो. तुम्हाला काम पूर्ण करण्यासाठी पुरेसा वेळ मिळणार नाही. अशा वेळी काळजी करण्याऐवजी धीर धरा आणि शांतपणे काम करा. कामात इतरांची मदत मिळण्याची शक्यता कमी आहे. दिवसभर व्यस्त वेळापत्रकामुळे तुमचा थकवा वाढू शकतो

Horoscope Today 15 March 2024 : आजचे राशी भविष्य; विद्यार्थ्यांसाठी कसा जाईल आजचा दिवस ?
| Updated on: Mar 15, 2024 | 7:00 AM
Share

मुंबई : ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीत केली जातात. दैनंदिन राशिभविष्य रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Horoscope Today 15 March 2024) हे ग्रह-नक्षत्राच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.

मेष

आजचा दिवस तुमच्यासाठी छान असेल. व्यवसायात भागीदारीतून लाभ होऊ शकतो. पालकांशी संबंध सौहार्दपूर्ण राहतील. ज्यामुळे तुमच्या नात्यात गोडवा राहील. मुलांकडून काही चांगली बातमी मिळू शकते. सामाजिक कार्यात रुची वाढेल. तुम्ही गोष्टी चांगल्या प्रकारे समजून घेण्याचाही प्रयत्न कराल. तुम्हाला काही गोपनीय गोष्टींबद्दल देखील कळू शकते. मित्रांसोबत वेळ घालवता येईल.

वृषभ

आज आत्मविश्वासात वाढ होईल, तुमची आर्थिक बाजू खूप मजबूत असेल. पर्यटनाशी संबंधित लोकांना आर्थिक फायदा होईल. उत्साही वाटेल. कुटुंबातील सदस्यांशी संबंध सुधारतील. काही सर्जनशील कामात मन गुंतवून घ्याल. अधिकारीही तुमच्या कामावर खूश होतील. आज तुमचा सल्ला गरजूंसाठी उपयुक्त ठरू शकतो. कुटुंबातही सुख-शांती नांदेल.

मिथुन

आज दिवस संमिश्र जाईल. एखाद्या कामात मित्राची मदत घेऊ शकता. संयमाने निर्णय घेतल्यास यशाची नव्या संधी खुली होऊ शकते. आज कोणत्याही जबाबदारीकडे दुर्लक्ष करू नका. एकाग्र चित्ताने काम कराल तर ते फायदेशीर ठरेल. काम कमीत कमी वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल आणि त्यात यशही मिळेल. तुमचे आरोग्य चांगले राहील.

कर्क

आज तुमची सर्व महत्वाची कामे पूर्ण होतील. पैशाच्या बाबतीत लोकांवर जास्त विश्वास ठेवणे टाळावे. तुमचा खर्च वाढू शकतो. एखाद्याला पैसे उधार देण्यापूर्वी नीट विचार करा. तुमच्या जवळची व्यक्ती तुमचा विश्वासघात करण्याचा प्रयत्न करू शकते. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत एखाद्या धार्मिक स्थळी प्रवास घडण्याची शक्यता आहे. भविष्याचा थोडा विचार करण्याची गरज आहे.

सिंह

आयुष्यात काही चांगले बदल करण्याचा प्रयत्न कराल. बऱ्याच काळापासून सुरू असलेल्या समस्यांवर उपाय सापडू शकतो. त्यामुळे मन हलकं होई, प्रसन्न होईल. उधार दिलेले पैसे अचानक परत मिळतील. कुटुंबात धार्मिक कार्याचे नियोजन करता येईल. तुमच्या वागण्यात काही चांगले बदल होतील. इतरांना मदत करण्याची संधी मिळू शकते, ज्याचा तुम्हालाही फायदा होईल.

कन्या

आज तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये प्रगती करण्याची नवी संधी मिळेल. जोडीदारासोबत जेवायला जाऊ शकता. नात्यातही सकारात्मकता येईल. कामात यश मिळेल. मित्रांकडून लाभाची अपेक्षा आहे. आज तुमचा उत्साहही कायम राहील. तुम्हाला तुमच्या भावा-बहिणींचे पूर्ण सहकार्य मिळेल. सर्व प्रलंबित कामे आज पूर्ण होतील. घरातील वातावरणही प्रसन्न राहील. या राशीच्या विद्यार्थ्यांचा आज अभ्यासाकडे कल राहील.

तूळ

आजचा दिवस संमिश्र असले. तुमचे लक्ष तुमचे काम पूर्ण करण्यावर असेल. ऑफिसमध्ये काही कामावर चर्चा करावी लागू शकते. या राशीच्या विद्यार्थ्यांचा मित्रांशी संवाद वाढू शकतो. तुम्हाला काही नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात, ज्या तुम्ही यशस्वीपणे पार पाडाल. कोणतेही मोठे काम मुलांच्या मदतीने पूर्ण होईल. काही लोकांना तुमचा हेवा वाटू शकतो.

वृश्चिक

आजचा दिवस तुमच्यासाठी उत्तम असेल. आज जे काही काम सुरू कराल ते वेळेवर पूर्ण होईल. तुमची कल्पकता तुम्हाला तुमचे ध्येय साध्य करण्यात मदत करू शकते. व्यवहारासाठी आजचा दिवस चांगला आहे. तुमच्या जोडीदाराच्या कामगिरीचे कौतुक केल्याने तुमच्या वैवाहिक जीवनात गोडवा येईल. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळू शकते. आरोग्य चांगले राहील.

धनु

आजचा दिवस उत्तम असेल. या राशीच्या लोकांना त्यांच्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी इतर व्यक्तीकडून चांगल्या सूचना मिळतील. पैशाशी संबंधित चांगली बातमी मिळेल. कामाशी संबंधित काही चांगली बातमी देखील मिळू शकते. तुमची सर्व नियोजित कामे आज पूर्ण होतील. एखाद्या कार्यक्रमात तुम्ही एखाद्या व्यक्तीला भेटू शकता जो तुमच्यासाठी खूप खास असेल.

मकर

आज तुमचा दिवस पूर्वीपेक्षा चांगला जाईल. कुटुंबासोबत सहलीचे नियोजन करू शकाल. आज तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत वेळ घालवू शकता, यामुळे तुमचे नाते आणखी सुधारेल. आज अशा एका व्यक्तीशी तुमची भेट होऊ शकते, जे भविष्यात लाभदायक ठरू शकते. काही विशेष कामात यश मिळू शकते. आज व्यवसाय वाढवण्यासाठी मनात नवीन कल्पना येऊ शकतात.

कुंभ

आज तुमचा दिवस आनंदाने भरलेला असेल. आज तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. व्यावसायिकांना फायदा होईल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला आहे. तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला मोठे यश मिळेल. काही महत्त्वाचे काम पूर्ण करण्याचा विचार करत असाल तर ते आज पूर्ण होईल. तुमचे काम सोडून इतरांना मदत करण्याच्या भावना आज तुमच्या मनात येऊ शकतात.

मीन

आजचा दिवस सामान्य असेल, एखाद्या कामाबाबत मनात उत्साह जाणवेल. कामाच्या ठिकाणी अचानक ताण वाढू शकतो. तुम्हाला काम पूर्ण करण्यासाठी पुरेसा वेळ मिळणार नाही. अशा वेळी काळजी करण्याऐवजी धीर धरा आणि शांतपणे काम करा. कामात इतरांची मदत मिळण्याची शक्यता कमी आहे. दिवसभर व्यस्त वेळापत्रकामुळे तुमचा थकवा वाढू शकतो. अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या समस्या दूर होतील.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा
तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा.
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का.
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया.
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया.
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा.
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार.
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा.
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का.
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा...
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा....
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी.