AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आजचे राशीभविष्य 5 May 2025 : वैवाहिक जीवनात काय घडणार? कोणाच्या राशीत आज कोणता योग?

Horoscope Today 5 May 2025 in Marathi : ज्योतिषशास्त्रात जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते. तुमचा आजचा दिवस कसा जाईल ? काय घडणार आजच्या दिवसात ? हे जाणून घेण्यासाठी अवश्य वाचा आजचे राशीभविष्य

आजचे राशीभविष्य 5 May 2025 : वैवाहिक जीवनात काय घडणार? कोणाच्या राशीत आज कोणता योग?
आजचं भविष्य
| Updated on: May 05, 2025 | 7:30 AM
Share

ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशीभविष्य यामध्ये अनुक्रमे येता आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Horoscope Today 5 May 2025) हे ग्रह-नक्षत्रांच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनू, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.

मेष राशी (Aries Daily Horoscope)

मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस आर्थिकदृष्ट्या भाग्यशाली असेल. आध्यात्मिक कार्यांमध्ये रुची वाढेल. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील. व्यवसायात मालमत्ता विक्रीतून चांगला धनलाभ होण्याची शक्यता आहे. जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळेल. आरोग्यासाठी योग आणि ध्यानाला महत्त्व द्या. जोडीदारासोबत वेळ घालवाल.

वृषभ राशी (Taurus Daily Horoscope)

वृषभ राशीच्या व्यक्तींनी खर्चावर नियंत्रण ठेवा. अनावश्यक खर्च टाळा. आर्थिक स्थिती मजबूत राहील. वादविवाद टाळा. मालमत्ता खरेदी-विक्रीत उशीर होईल. मात्र, प्रवासाचे योग संभवतील. कामाला सकारात्मक प्रतिसाद मिळेल. आरोग्य उत्तम राहील.

मिथुन राशी (Gemini Daily Horoscope)

मिथुन राशीच्या व्यक्तींनी आज वादविवाद टाळावेत. कौटुंबिक जीवनातील लहान-सहान गोष्टींचा आनंद घ्यावा. रिअल इस्टेटमधील गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते. परंतु कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्यावा. जोडीदारासोबत एकत्र वेळ घालवा.

कर्क राशी (Cancer Daily Horoscope)

कर्क राशीच्या व्यक्तींना आज सकारात्मक ऊर्जा जाणवेल. कामाचे उत्तम फळ मिळेल. शेअर बाजारात विचारपूर्वक गुंतवणूक करा. कौटुंबिक जीवन आनंदात घालवाल. मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी योग आणि ध्यान उपयुक्त ठरेल. मालमत्ता खरेदीत विलंब होईल. त्यामुळे संयम ठेवा.

सिंह राशी (Leo Daily Horoscope)      

सिंह राशीच्या व्यक्तींना आर्थिक स्थिरता मिळेल. यामुळे मन प्रसन्न राहील. व्यावसायिक जीवनात प्रगती होईल. मालमत्ता खरेदीचे योग आहेत. संपत्तीत वाढ होईल. मानसिक शांततेसाठी नियमित योगाचा अवलंब करा.

कन्या राशी (Virgo Daily Horoscope)

कन्या राशीच्या व्यक्तींचा आत्मविश्वास वाढेल. धनलाभ संभवतो. कुटुंबातील सदस्यांशी संबंध सुधारण्याचा प्रयत्न करा. कार्यक्षेत्रात नवीन संधी मिळेल. योगामुळे आरोग्य चांगले राहील. कुटुंबातील व्यक्तींकडून चांगली बातमी मिळेल.

तूळ राशी (Libra Daily Horoscope)

तूळ राशीच्या व्यक्तींची आर्थिक स्थिती सुधारेल. प्रवासाचे योग आहेत. घरात वादविवाद टाळावेत. आरोग्याची काळजी घ्यावी. आज कामात मन रमेल. मालमत्ता खरेदी-विक्रीचा विचार टाळावा. वैवाहिक जीवनात आनंदी वातावरण राहील.

वृश्चिक राशी (Scorpio Daily Horoscope)

वृश्चिक राशीच्या व्यक्तींचे भावंडांशी संबंध अधिक चांगले होतील. अचानक कोणताही बिझनेस सुरु करु नका. यामुळे मोठा धोका संभवतो.  शांत ठिकाणी भेट दिल्यास मनःशांती लाभेल. जुनी मालमत्ता विकून धनलाभ होऊ शकतो. प्रियजनांसोबत वेळ घालवा.

धनु राशी (Sagittarius Daily Horoscope)

धनु राशीच्या व्यक्तींच्या जीवनात सुख-शांती नांदेल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. प्रेमसंबंध सुधारतील. व्यावसायिक स्थिती मजबूत राहील. कामांमध्ये दिरंगाई करु नका. नियमित योगा करा. आरोग्य उत्तम राहील.

मकर राशी (Capricorn Daily Horoscope)

मकर राशीच्या व्यक्तींसाठी नोकरी आणि व्यवसायात अनुकूल वातावरण राहील. नफा होईल. कामांना सकारात्मक प्रतिसाद मिळेल. जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळेल. आरोग्य उत्तम राहील. आनंद मिळेल.

कुंभ राशी (Aquarius Daily Horoscope)

कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आर्थिक लाभ होईल. आध्यात्मिक कार्यांमध्ये रुची वाढेल. कुटुंबातील सदस्यांशी प्रेम आणि आपुलकी वाढेल. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. आरोग्याची काळजी घ्या. वैवाहिक जीवन आनंदात घालवाल.

मीन राशी (Pisces Daily Horoscope)

मीन राशीच्या व्यक्तींसाठी कौटुंबिक जीवन आनंदी असेल. कामात चांगली कामगिरी कराल. जुनी मालमत्ता विकण्याचा निर्णय फायदेशीर ठरेल. व्यवसायात प्रगती होईल. सुखद प्रवासाचे योग आहेत.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडल
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडलं?
पंढरीकडे पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
Pandharpur Wari 2026 | पंढरीकडे संतांच्या पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
मोठी बातमी! ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर..
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर...
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक; द हिंदूचा मोठा दावा
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक, 25 वर्षीय तरुण जखमी; द हिंदूचा मोठा दावा
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ..
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ दासने दिली अपडेट
धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
Dharmendra Pradhan | 22 दिवसांच्या आंदोलनानंतरही धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत घडामोडींना वेग
Rahul Gandhi Demands : प्रधानांचा राजीनामा आणि मोदींकडून माफी… विद्यार्थ्यांच्या तीन मागण्यांवर राहुल गांधी ठाम.

Rahul Gandhi Demands : प्रधानांचा राजीनामा आणि मोदींकडून माफी… विद्यार्थ्यांच्या तीन मागण्यांवर राहुल गांधी ठाम

Rahul Gandhi : मुलींना मारलं, अंगावर बंदुकीचे छर्रे, त्यांनी काय चुकीचं केलं? दिल्लीतील लाठीचार्जवर राहुल गांधींनी सरकारला घेरलं.

Rahul Gandhi : मुलींना मारलं, अंगावर बंदुकीचे छर्रे, त्यांनी काय चुकीचं केलं? दिल्लीतील लाठीचार्जवर राहुल गांधींनी सरकारला घेरलं

CJP protest : विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज, पोलिसांवर कारवाईची मागणी, याचिकेवर सुनावणी, हाय कोर्टातूत आता मोठा आदेश.

CJP protest : विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज, पोलिसांवर कारवाईची मागणी, याचिकेवर सुनावणी, हाय कोर्टातूत आता मोठा आदेश

Todays Gold Rate: आता खरेदी करणं शक्यच नाही! सोन्याचे भाव चांगलेच वाढले, आज 10 ग्रॅमसाठी….

Todays Gold Rate: आता खरेदी करणं शक्यच नाही! सोन्याचे भाव चांगलेच वाढले, आज 10 ग्रॅमसाठी…

उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, बंडखोर खासदारांविरोधात याचिका दाखल, काय करण्यात आला युक्तीवाद?.

उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, बंडखोर खासदारांविरोधात याचिका दाखल, काय करण्यात आला युक्तीवाद?

शस्त्रक्रियेवर अमिताभ बच्चन यांचा मोठा खुलासा, थेट म्हटले, माझ्या...

शस्त्रक्रियेवर अमिताभ बच्चन यांचा मोठा खुलासा, थेट म्हटले, माझ्या..