Sun Transit Zodiac | तुम्ही म्हणाल तीच पूर्व दिशा ! , खुद्द सूर्यदेवच चमकवणार या 4 राशींचे नशीब

Sun Transit Zodiac | तुम्ही म्हणाल तीच पूर्व दिशा ! , खुद्द सूर्यदेवच चमकवणार या 4 राशींचे नशीब
zodiac

ज्योतिष शास्त्रानुसार काही राशींवर ग्रहांच्या संक्रमणाचा शुभ प्रभाव पडतो. पुढील 29 दिवस या लोकांवर सूर्यदेवाची कृपा वर्षाव होणार आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: मृणाल पाटील

Jan 03, 2022 | 8:51 AM

मुंबई : 2022 हे नवीन वर्ष सुरू झाले आहे. ज्योतिष शास्त्रानुसार जानेवारी महिन्यात काही मोठे ग्रहांचे संक्रमण होणार आहे. ग्रहांच्या राशी बदलाचा थेट परिणाम व्यक्तीच्या जीवनावर होतो. ग्रहांच्या संक्रमणाचा प्रत्येक राशीच्या लोकांवर वेगवेगळा प्रभाव पडतो. ज्योतिष शास्त्रानुसार काही राशींवर ग्रहांच्या संक्रमणाचा शुभ प्रभाव पडतो. पुढील 29 दिवस या लोकांवर सूर्यदेवाची (Sun Transit) कृपा वर्षाव होणार आहे.

मेष

या महिन्यात मेष राशीच्या लोकांचा आत्मविश्वास वाढेल. नोकरीत काही नवीन जबाबदारी मिळू शकते. व्यवसायाचा विस्तार होईल. वैवाहिक जीवनात आनंद राहील. कुटुंबात वडिलांकडून आर्थिक लाभ होईल. या महिन्यात 14 जानेवारीनंतर सुरू केलेले नवीन काम फायदेशीर ठरेल.

वृश्चिक

वृश्चिक राशींच्या लोकांसाठी हा महिना आत्मविश्वासाने भरलेला असणार आहे. नोकरीत प्रगतीच्या अनेक संधी मिळतील. व्यवसायाचा विस्तार होईल. अचानक आर्थिक लाभ झाल्यामुळे पैशाची कमतरता दूर होईल. जीवनसाथीसोबत दर्जेदार वेळ घालवाल. वैवाहिक जीवनात आनंद राहील.

कर्क

या महिन्यात कुटुंबात होणार्‍या धार्मिक कार्यामुळे मन प्रसन्न राहील. आर्थिक स्थिती सुधारेल. नोकरी आणि व्यवसायासाठी हा महिना शुभ राहील. याशिवाय कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळेल. मित्रांसोबत आनंदाचे क्षण घालवाल. नवीन व्यवसायातून धनलाभाचे योग आहेत.

मीन

घरामध्ये धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाईल. आरोग्याच्या समस्यांपासून सुटका मिळेल. मानसिकदृष्ट्या शांत राहाल. जोडीदाराच्या मदतीने या महिन्यात उत्पन्न वाढेल. याशिवाय व्यवसायात आर्थिक स्थिती मजबूत राहील. वैवाहिक जीवन आनंदात जाईल.

टीप- येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, यासाठी कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांचे हित लक्षात घेऊन ते येथे मांडले आहे.

संबंधीत बातम्या :

Weekly Horoscope 3 Jan to 9 Jan 2022 | कसा असेल तुमचा संपूर्ण आठवडा ? कोणती शुभ वार्ता येणार, जाणून घ्या सर्वकाही एका क्लिकवर

Zodiac | सावधान !, 2022 मध्ये या 5 राशींच्या लोकांना संकटाचा सामना करावा लागणार, तुमची रास यामध्ये आहे का ?

zodiac | फक्त सुखाची नांदी, या 6 राशींना वर्षभर पैशांची कमतरता भासणार नाही !


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें