खूप सोसलं, आता शुक्र दाखवणार चांगले दिवस; या राशींच्या लोकांना लागणार मोठा जॅकपॉट
शुक्र ग्रह 20 जुलैला रविवारी मृगशिरा नक्षत्रामध्ये प्रवेश करणार आहे, आणि याच दिवशी राहू व केतुचं देखील नक्षत्र परिवर्तन होणार आहे. हा काळ चार राशींसाठी अत्यंत शुभ ठरणार आहे.

शुक्र ग्रह 20 जुलैला रविवारी मृगशिरा नक्षत्रामध्ये प्रवेश करणार आहे, आणि याच दिवशी राहू व केतुचं देखील नक्षत्र परिवर्तन होणार आहे. शुक्र ग्रह रविवारी दुपारी 12 वाजून 55 मिनिटांनी मृगशिरा नक्षत्रात प्रवेश करणार आहे. या नक्षत्राचे स्वामी ग्रहांचे सेनापती मंगळ आहे. शुक्र ग्रहाच्या नक्षत्र परिवर्तनानंतर काही दिवसांमध्येच 26 जुलैला बुध ग्रह राशी परिवर्तन करणार आहे. बुध वृषभ राशीमधून मिथुन राशीमध्ये प्रवेश करणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र हा ग्रह भौतिक सुख सुविधा, समृद्धी, सुख, दाम्पत्य जीवन, ऐश्वर्य, आनंद आणि सुंदरताचा कारक ग्रह आहे. त्यामुळे जेव्हा शुक्र आपली चाल बदलतो त्या घटनेला ज्योतिषशास्त्रात खूप महत्त्व असंत, शुक्राच्या नक्षत्र परिवर्तनाचा बाराही राशींवर परिणाम होणार आहे. शुक्राचं हे नक्षत्र परिवर्तन कोणत्या राशीसाठी शुभ असणार आहे? हे जाणून घेऊयात.
मिथुन रास – शुक्रानं मृगशिरा नक्षत्रात प्रवेश करताच या राशींच्या लोकांचा सुवर्णकाळ सुरू होणार आहे. मिथुन राशींच्या लोकांना नवे कपडे आणि दागिने प्राप्त होण्याचा योग आहे. तसेच या काळात त्यांना कुटुंबाची पूर्ण साथ मिळणार आहे.शुक्र ग्रहाच्या प्रभावामुळे या राशीच्या लोकांच्या आर्थिक उत्पन्नात मोठी वाढ होणार असून, उत्पन्नाचा एखादा नवीन स्त्रोत देखील प्राप्त होऊ शकतो, अनेक दिवसांपासून सरकार दरबारी अडकलेलं एखादं काम या काळात पूर्ण होण्याची देखील शक्यता आहे.
सिंह रास – शुक्राचं नक्षत्र परिवर्तन होताच सिंह राशींच्या लोकांना आनंदाचे, सुखाचे दिवस येणार आहेत. सिंह राशींच्या लोकांच्या संपत्तीमध्ये वाढ होईल. कुटुंबांची साथ मिळेल. नशीबाचीही शंभर टक्के साथ या काळात मिळणार आहे. विवाह इच्छूक तरुणांसाठी या काळात अनुकूल वातावरण राहणार आहे. जर तुम्ही एखादा नवा बिझनेस सुरु करू इच्छित असाल तर हा बिझनेस भविष्यात तुम्हाला खूप फायद्याचा ठरू शकतो, शुक्र राशीच्या नक्षत्र परिवर्तनानंतर सिंह राशींच्या लोकांच्या सर्व इच्छा पूर्ण होण्याचे योग आहेत.
तूळ रास – शुक्राच्या नक्षत्र परिवर्तनाचा या राशींच्या लोकांना मोठा फायदा होणार आहे. तूळ राशीच्या लोकांच्या संपत्तीमध्ये वाढ होण्याचा योग आहे. या काळात तूळ राशीच्या लोकांना कुटुंबाची आणि जवळच्या व्यक्तींची पूर्ण साथ मिळणार आहे. या काळात तुम्ही भविष्यातील काही योजना आखू शकता, त्या पद्धतीनं नियोजन करू शकता.
वृश्चिक रास – या राशीच्या लोकांना देखील शुक्राचं हे नक्षत्र परिवर्तन मोठं फायद्याचं ठरणार आहे. कुटुंबात एखादं शुभ कार्य ठरू शकतं, तसेच अनेक दिवसांपासून अडलेलं एखादं काम या काळात पूर्ण होऊ शकतं.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
