AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गुरु आणि शनि एकामगोमाग करणार नक्षत्र गोचर, राशीचक्रावर होणार सकारात्मक परिणाम

ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांच्या राशी गोचरासोबत नक्षत्र गोचरही महत्त्वाचं ठरतं. नक्षत्राच्या कोणत्या चरणात ग्रह स्थित आहे यावरून फळं मिळत असतात. आता शनि आणि गुरु एकामागोमाग एक नक्षत्र गोचर करणार आहेत. त्यामुळे काही राशीच्या जातकांना लाभ मिळणार आहे. चला जाणून घेऊयात या राशी कोणत्या ते...

गुरु आणि शनि एकामगोमाग करणार नक्षत्र गोचर,  राशीचक्रावर होणार सकारात्मक परिणाम
गुरु शनिच्या नक्षत्र गोचरामुळे या राशींचं नशिब पालटणार, ग्रहांची मिळणार उत्तम साथ
| Updated on: Feb 02, 2024 | 4:26 PM
Share

मुंबई : प्रत्येक ग्रहाचा राशीचक्रावर प्रभाव पडत असतो. पण गुरु आणि शनिची स्थिती जातकांसाठी खूप महत्त्वाची गणली गेली आहे. सध्या गुरु ग्रह मेष राशीत विराजमान आहे. तर शनि ग्रह स्वत:च्या मीन राशीत आहे. गुरु 1 मे पर्यंत या स्थितीत राहणार आहे. त्यानंतर वृषभ राशीत गोचर करेल. पण या दरम्यान होणाऱ्या नक्षत्र परिवर्तनाचा प्रभाव राशीचक्रावर पडणार आहे. 6 एप्रिलला शनि राहुच्या शतभिषा नक्षत्रात प्रवेश करेल. तर देवगुरु बृहस्पती पूर्वाभाद्र नक्षत्रात गोचर करणार आहे. त्यासोबत गुरु ग्रह मित्र सूर्य, चंद्र आणि मंगळाच्या कृतिका, रोहिणी आणि मृगशीर्ष नक्षत्रात असेल. त्यामुळे गुरु आणि शनिची चांगली फळं जातकांना मिळतील. चला जाणून घेऊयात या स्थितीचा कोणत्या राशींना लाभ मिळणार ते.

या राशींना मिळणार लाभ

मिथुन : ग्रहांची स्थिती मिथुन राशीसाठी अनुकूल राहील. काही आर्थिक अडचणी या कालावधीत दूर होतील.गेल्या काही दिवसांपासून अडकलेली कामं पूर्ण होतील. राजकारणात असलेल्या लोकांना या स्थितीचा सर्वाधिक फायदा होईल. नोकरी करणाऱ्या जातकांना याची उत्तम फळं मिळतील. गुरुची पंचम दृष्टी तिसऱ्या आणि आणि शनिची सप्तम दृष्टी तिसऱ्या स्थानावर पडत आहे. यामुळे आत्मविश्वासात वाढ होईल.

सिंह : गुरु आणि शनिची नवम दृष्टी भाग्य स्थानावर पडत आहे. नवव्या स्थानावर प्रभावी होत असल्याने नशिबाची उत्तम साथ मिळेल. केलेल्या मेहनतीला अपेक्षित फळ मिळेल, जे स्वप्न पाहाल ते पूर्णत्वास येईल. गेल्या काही दिवसांपासून असलेली चिंता दूर होईल. अध्यात्मात आवड निर्माण होईल. तसेच देवदर्शनाचा योग जुळून येईल. या कालावधीत मानसिक समाधान लाभेल.

धनु : या राशीच्या पंचम स्थानात गुरु विराजमाने आहे. तर शनि तिसऱ्या स्थानात आहे. शनि-गुरुची तिसरी दृष्टी पंचम स्थानावर पडत आहे. त्यामुळे अचानक धनलाभ मिळण्याची दाट शक्यता आहे. शेअर बाजारातून चांगला परतावा मिळेल. प्रेमप्रकरणात यश मिळेल. तसेच लग्नाचा योग जुळून येईल. आरोग्यविषयक तक्रारी दूर होतील. मुलांकडून आनंदाची बातमी कानावर पडेल.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत....
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप.
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं.
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा.
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का.
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल.
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी.
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ.
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट.