ज्ञान आणि सौभाग्याचा देवता आहे गुरु ग्रह; जाणून घ्या कुंडलीच्या कोणत्या घरात कोणते फळ मिळते

गुरु एक सौम्य आणि शुभ ग्रह मानला जातो. गुरु कोणत्याही राशीच्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये वेगवेगळे परिणाम दाखवतो.

ज्ञान आणि सौभाग्याचा देवता आहे गुरु ग्रह; जाणून घ्या कुंडलीच्या कोणत्या घरात कोणते फळ मिळते
ज्ञान आणि सौभाग्याचा देवता आहे गुरु ग्रह
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: अनिश बेंद्रे

Jul 30, 2021 | 8:44 AM

मुंबई : सौर मंडळामध्ये गुरुला एक विशेष स्थान आहे. ज्योतीषशास्त्रात गुरुला देवतांचा गुरु मानले जाते. ज्याप्रमाणे ज्योतिषशास्त्रात सूर्याला आत्म्याचा आणि चंद्राला मनाचा घटक मानले जाते, त्याचप्रमाणे गुरुला शारीरिक शक्ती आणि ज्ञानाचा घटक मानले गेले आहे. गुरु एक सौम्य आणि शुभ ग्रह मानला जातो. गुरु कोणत्याही राशीच्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये वेगवेगळे परिणाम दाखवतो. (Jupiter is the god of knowledge and good fortune; know the benefits)

कुंडलीच्या वेगवेगळ्या घरात गुरुचे फळ

1. ज्या व्यक्तीच्या कुंडलीच्या पहिल्या घरात गुरु आहे, ती व्यक्ती बहुतेकदा खूप धार्मिक, शिकलेली, भाग्यवान आणि सदाचारी असते.

2. ज्या लोकांच्या कुंडलीच्या दुसऱ्या घरात ग्रह आहे, ते लोक बहुतेक वेळा त्यांच्या वडिलोपार्जित संपत्ती आणि वडिलांची संपत्ती घालवताना आढळतात. तथापि, अशी व्यक्ती आपल्या मित्रांमध्येही सर्वात चांगली असते आणि विविध स्त्रोतांकडून पैसे मिळवते.

3. जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीच्या तिसऱ्या घरात देवगुरुची उपस्थित असेल, तर ती व्यक्ती संपत्तीने संपन्न असते, तसेच तिचा परदेशी प्रवास घडतो आणि सदाचारीही असते.

4. जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीच्या चौथ्या घरात गुरु असेल तर देवगुरूच्या कृपेने ती व्यक्ती खूप भाग्यवान असते. ती व्यक्ती पैसा, वाहन आणि घर इत्यादी सुख प्राप्त करते.

5. कुंडलीच्या पाचव्या घरात बसलेला भगवान गुरू अनेकदा व्यक्तीला हुशार, बुद्धिमान आणि सदाचारी बनवतो. अशी व्यक्ती अनेकदा वकील, न्यायाधीश या पदांवर काम करते.

6. जर गुरु कुंडलीच्या सहाव्या घरात असेल तर ती व्यक्ती बऱ्याचदा कोणत्या ना कोणत्या आजाराने ग्रस्त असते. तथापि, अशी व्यक्ती आपल्या कामात यशस्वी असते. तिला वाहनसुखही मिळते.

7. एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीच्या सातव्या घरात देवगुरू असेल, तर गुरु त्या व्यक्तीला बुद्धिमान बनवतो. अशी व्यक्ती सद्गुणी असते आणि पत्नीच्या सूचनांचे पालन करते.

8. ज्या लोकांच्या कुंडलीच्या आठव्या घरात गुरु आहे, त्या व्यक्तीचे व्यक्तींमत्व प्रचंड आकर्षक असते. लोक अशा व्यक्तीकडे नेहमीच आकर्षित होतात. अशी व्यक्ती दिर्घायुषी असते.

9. कुंडलीच्या नवव्या घरात बसलेला गुरु ग्रह व्यक्तीला अनेकदा धार्मिक बनवतो. असा माणूस यशस्वी होतो आणि बरीच तीर्थयात्रा करतो. त्याचे भाग्य परदेशात चांगले फळफळते.

10. कुंडलीच्या दहाव्या घरात बसलेला गुरु त्या व्यक्तीच्या कुटुंबाची शोभा वाढवतो. तसेच व्यक्तीचे मोठे नाव होते. या व्यक्तीला जीवनातील सर्व सुख मिळते. अशी व्यक्ती कधीही कोणावर अन्याय करत नाही.

11. जन्मकुंडलीच्या अकराव्या घरात बसणारी व्यक्ती बऱ्याचदा भविष्य सांगणारी असते आणि ती व्यक्ती विविध माध्यमांतून पैसे कमावते. अनेकदा अशा व्यक्तीची पुत्रप्राप्तीनंतर भरभराट होते.

12. जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीच्या बाराव्या घरात गुरु बसला असेल तर अशी व्यक्ती बहुतेकदा इतरांना उपदेश करते. अशा व्यक्तीला एकटेपणा हवा असतो. तसेच देवाची पूजा करणे आवडते. (Jupiter is the god of knowledge and good fortune; know the benefits)

इतर बातम्या

राज्य सरकारचा 15 टक्के फी सवलतीचा निर्णय निव्वळ धूळफेक, मविआ सरकार शिक्षण सम्राट धार्जिणे, अतुल भातखळकर यांचा आरोप

डिमॅट खातेधारकांसाठी महत्त्वाची बातमी! 1 ऑगस्टपूर्वी अपडेट करा केवायसी

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें