आज शंकराची कोणावर कृपा?, कोणी गुंतवणूक करणे टाळावे?, जाणून घ्या आजचे राशीभविष्य

जचा दिवस कसा असेल?, आज कोणती काळजी घ्याव?, हे राशी भविष्याच्या माध्यमातून जाणून घेऊया. (monday daily horoscope marathi rashi bhavishya)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 6:57 AM, 1 Mar 2021
आज शंकराची कोणावर कृपा?, कोणी गुंतवणूक करणे टाळावे?, जाणून घ्या आजचे राशीभविष्य

मुंबई : आज सोमवार आहे. आजचा दिवस हा शंकराची उपासना केली जाते. मनापासून भक्ती केली तर शंकर आपल्या इच्छा पूर्ण करतो असं म्हणतात. त्यामुळे आजचा दिवस कसा असेल?, आज कोणती काळजी घ्याव?, हे राशी भविष्याच्या माध्यमातून जाणून घेऊया. ( monday 1 3 2021 daily horoscope marathi update rashi bhavishya)

मेष

आज सर्व कामे सुरळीत होतील. घरच्यांना वेळ देण्याचा प्रयत्न करा. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला असेल. कार्यालयीन जबाबदाऱ्या वाढतील. सरकारी कामं पूर्ण होतील. आरोग्य चांगले राहील. आपल्या जोडीदारास फिरायला घेऊन जा.

वृषभ

कार्यालयीन कामात तुमची वाहवा होईल. विरोधकांचा चांगल्या प्रकारे सामना कराल. जमिनीचे खटले सुटू शकतात. आरोग्यासंबंधी विशेष काळजी घ्या. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला राहील. आज जास्त खर्च होईल. घऱात आनंद नांदेल. तुमच्या संपत्तीत वाढ होईल. यात्रेला जाण्याचा विचार करु शकता.

मिथुन

आजचा दिवस चागंला असेल. आरोग्यात सुधारणा होतील. धन संपत्ती मिळेल. विद्यार्थ्यांना अडचणींवर उपाय सापडेल. कित्येक दिवस अडकलेले पैसै परत मिळतील. गुंतवणूक करण्यावर विचार करु शकता. प्रवास करताना वाहन काळजीपूर्वक चालवा. कठोर निर्णय घ्यावे लागतील. वृद्धांच्या प्रकृतीची काळजी घ्या.

कर्क

तुमच्या कर्तृत्वाने तुम्हाला यश येईल. प्रिय तसेच अप्रिय घटनांचा सामना करावा लागेल. वायफळ खर्च टाळा. परिवाराच्या छोट्या गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. तुमच्यावर आरोप लागू शकतात. वैवाहिक जीवनात सुख येईल. मित्राशी मतभेद होऊ शकतात. आनंददायी बातमी मिळेल.

सिंह

सांपत्तीक स्थिती ठीक ऱाहील. राग करू नका. आजचा दिवस सामान्य राहील. वयोवृद्धांचे आरोग्य बिघडू शकते. जोडीदारासोबत चांगल्या-वाईट गोष्टींवर चर्चा करा. कामासंदर्भात दूरच्या शहरात जावे लागू शकते. कार्यालयात वाद होऊ शकतात. व्यवसायाशी संबंधित व्यवहार पूर्ण होतील.

कन्या

गरजा पूर्ण होतील. जुने मित्र भेटू शखतात. उद्योगात नव्या योजना बनवू शकता. आरोग्याची काळजी घ्या. सकारात्मक विचार ठेवा. देवाची उपासना करण्यात मन लागेल. मुलांसोबत वेळ घालवा.

तुळ

आर्थिक परिस्तथितीत सुधारणा होणार. उद्योगात चांगली वाढ होईल. देवाची प्रार्थना करा. तुमचे कपडलेले काम पूर्ण होतील. आजचा दिवस चांगला असले. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रीत करावा. मित्राची भेट होणार. अनोळखी लोकांशी व्यवहार करु नका.

वृश्चिक

आज एखादी चांगली बातमी मिळू शकते. व्यवसायात नव्या संधी मिळतील. काम करताना दक्ष राहा. दुखापत होण्याची शक्यता. गुंतवणूक करण्यासाठी आजचा दिवस योग्य नाही. अविवाहितासाठी स्थळ येऊ शकते. वादाचा भाग होऊ नका. वैवाहिक जीवनात माधुर्य येईल.

धनु

पारिवारिक स्थितीत सुधारणा येणार. घरातील सदस्याची समस्या दूर करु शकाल. अनोळखी गोष्टीची भीती वाटू शकते.
जोडीदारास फिरायला घेऊन जा. जोडीदाराच्या इच्छा पूर्ण करा. व्यवसायात विशेष काळजी घ्या. कोणालाही कर्ज देताना काळजी घ्या. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीत लाभ मिळेल.

मकर

मनोरंजनाच्या साधनांकडे जास्त ओढले जाल. नातेवाईकांसोबत संबंध सुधारण्याचा प्रयत्न करा. आजचा दिवस चांगला असेल. कौशल्यात वाढ होईल. नव्या संधी मिळतील. मित्रांशी भेट होईल. आज जास्त खर्च होईल. काम चांगले होईल.

कुंभ

वायफळ खर्च करु नका. विद्यार्थ्यांना य़श प्राप्त करण्यासाठी मेहनत घ्यावी लागले. परिवारासोबत मतभेद होऊ शकतत. तुमचे मन अनेक चिंतानी ग्रस्त असेल. खर्च वाढल्यामुळे आज तणावाची स्थिती असू शकते. व्यवसायात वाढ करण्याचा विचार करु नका. अचानकपणे एखाद्या मित्राशी भेट होणार. जोडीदारासोबत नातेवाईकांकडे जाऊ शकता.

मीन

स्वत:मध्ये सकारात्मक बदल होतील. व्यवसाय चांगला राहील. थकलेले पैसे परत येण्याची शक्यता. आज चांगली बातमी मिळू शकते. एखाद्या गरजू व्यक्तीला मदत करा. आजचा दिवस चांगला जाईल. वाहन चालवताना काळजी घ्या.

इतर बातम्या :

पूजा चव्हाणच्या आईवडिलांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भावनिक पत्र, वाचा जसंच्या तसं…

Video : इंधन दरवाढीचा अनोखा निषेध, थेट बैलगाडीतूनच नवरा-नवरीची पाठवणी!

( monday 1 3 2021 daily horoscope marathi update rashi bhavishya)