Zodiac Capricorn | मकर राशीच्या व्यक्तींना या 5 गोष्टी चूकुनही विचारु नका, नाहीतर मैत्री संपली समजा

राशीचक्रातील 12 एकमेकींपासून खूपच वेगळ्या आहेत. राशींच्या या गुणधर्माचा परिणाम त्या राशीच्या व्यक्तीवर होत असतो. याच राशींपैकी एक रास म्हणजे मकर, शांत पण तेवढीच रागीट. त्यांच्या हसमुख स्वभावामुळे त्यांचे खूप मित्र होतात पण या राशींच्या लोकांना पटकन राग येतो.

Zodiac Capricorn | मकर राशीच्या व्यक्तींना या 5 गोष्टी चूकुनही विचारु नका, नाहीतर मैत्री संपली समजा
Capricorn


मुंबई :  राशीचक्रातील 12 एकमेकींपासून खूपच वेगळ्या आहेत. राशींच्या या गुणधर्माचा परिणाम त्या राशीच्या व्यक्तीवर होत असतो. याच राशींपैकी एक रास म्हणजे मकर, शांत पण तेवढीच रागीट. त्यांच्या हसमुख स्वभावामुळे त्यांचे खूप मित्र होतात पण या राशींच्या लोकांना पटकन राग येतो. त्यामुळे तुमच्या मित्र परिवारात कोणी मकर राशीचा मित्र असेल तर त्याला 5 गोष्टी कधीही विचारू नका, तसे केल्यास तुमची मैत्री संपलीच म्हणून समजा. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहे त्या गोष्टी.

मकर राशीच्या लोकांना या 5 गोष्टी कधीच सांगू नका

🔸त्यांची चुक दाखवून देऊ नका
मकर त्यांची चूक कधीच मान्य करणार नाही. तुम्ही त्यांना त्यांची चुक सांगायला गेलात तर तुम्ही आत्मसन्मानाला धक्का पोहचवलात या पद्धतीने ते तुमच्याशी वागतील. या राशीच्या लोकांना काही काळ गेल्या नंतर त्यांची चुक कळते. त्यामुळे तुम्हा स्वत:हून त्यांना त्यांची चुक सांगू नका.

🔸जर ते रागात असतील तर त्यांच्या पासून लांब राहा
मकर राशींचे व्यक्ती रागात असताल तर त्यांच्या पासून लांब राहीलेले केव्हाही चांगले. कारण या काळात अनावधानाने तुमच्या भावना दुखावू शकतात.

🔸चुकूनही त्यांच्याशी खोटे बोलू नका
या राशीच्या व्यक्तींशी चुकूनही खोटे बोलू नका कारण हे लोक तुम्हाला सहज पाहू शकतात. जर या व्यक्तींनी तुमची चुक पकडली तर ते तुम्हाल काहीही बोलणार नाही पण त्यांच्या वागण्यातून सर्व गोष्टी अगदी स्पष्ट होतील. त्यामुळे या राशीच्या लोकांसोबत नेहमी प्रामाणिक रहा.

🔸एक चुक ही पडेल महागात
मकर राशीच्या व्यक्तीला तुम्ही दुख: दिलेत तर हे लोक काही क्षणातच तुम्हाला त्याच्या आयुष्यातून काढून टाकतील. हे लोक खूप निष्ठावान असतात जर तुम्ही त्यांना गमावलत तर परत कधी जिंकू शकणार नाही.

🔸त्यांच्या समोर ‘मी’ चा पाढा वाचू नका
या राशीच्या व्यक्तींसमोर स्वतःचे कौतुक करु नका. कारण मकर राशींच्या व्यक्तींना ही काळजी नसते. त्यांना तुमचा स्वभाव भावतो तुमची संपत्ती नाही.

टीप- येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, यासाठी कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांचे हित लक्षात घेऊन ते येथे मांडले आहे.

संबंधित बातम्या :

Shagun-Apshagun | उंदीर-चिचुंद्री घरात असणे शुभ की अशुभ, जाणून घ्या…

PHOTO | Vastu Tips : अभ्यासात एकाग्रता वाढवण्यासाठी स्टडी रुममध्ये लावा ‘ही’ 4 झाडे

Kaal Sarp Dosh : कुंडलीतील काल सर्प दोष दूर करण्यासाठी हे महाउपाय करा…

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI