AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नैराश्याचा हात सोडून अध्यात्माचा हात धरा, या महाशिवरात्रीला तुमच्या राशीनुसार शिवलिंग खास गोष्टींचे दान करा

या महाशिवरात्रींच्या दिवशी जर तुम्ही तुमच्या राशींप्रमाणे दान केले तर ते जास्त फालदायी ठरेल. या दिवशी मंगळ, शनि, बुध, चंद्र आणि शुक्र मकर राशीत राहणार आहेत. अशा स्थितीत यावेळी महाशिवरात्रीला राशीनुसार शिवाची पूजा अत्यंत फलदायी ठरेल.

नैराश्याचा हात सोडून अध्यात्माचा हात धरा, या महाशिवरात्रीला तुमच्या राशीनुसार शिवलिंग खास गोष्टींचे दान करा
zodiac
Mrunal Patil
Mrunal Patil | Updated on: Feb 23, 2022 | 2:25 PM
Share

मुंबई :  भारतात सर्वत्र शिवभक्तांकडून महा शिवरात्रीचा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. या दिवशी भगवान शंकराची (lord Shiva) विशेष पूजा केली जाते. हिंदू दिनदर्शिकेनुसार, महा शिवरात्री दरवर्षी फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्ष चतुर्दशीला साजरी केली जाते. 2022 मध्ये महाशिवरात्री (Maha Shivratri 2022)मंगळवार, 1 मार्च (1 March) रोजी येत आहे. मान्यतेनुसार, या दिवशी भगवान भोलेनाथांची माता पार्वतीचा विवाह झाला होता. या दिवशी बेलची पाने खास आकर्षण ठरते. पौराणिक कथेनुसार, एकदा देवी पार्वतीने तिच्या कपाळावरचा घाम पुसला आणि त्याचे काही थेंब मंदार पर्वतावर पडली, ज्यातून बेलाच्या झाडाचा उगम झाला. त्यामुळे शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करण्यात येते. पण या महाशिवरात्रींच्या दिवशी जर तुम्ही तुमच्या राशींप्रमाणे दान केले तर ते जास्त फालदायी ठरेल. या दिवशी मंगळ, शनि, बुध, चंद्र आणि शुक्र मकर राशीत राहणार आहेत. अशा स्थितीत यावेळी महाशिवरात्रीला राशीनुसार शिवाची पूजा अत्यंत फलदायी ठरेल.

राशीनुसार महाशिवरात्रीला शिवाची पूजा करा

मेष : गंगेच्या पाण्यात साखर आणि गूळ मिसळून शिवलिंगाचा अभिषेक करावा. याशिवाय शिव पंचाक्षर मंत्र ओम नमः शिवाय 108 वेळा जप करा. यामुळे जास्त फायदा होईल.

वृषभ : महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर गाईचे दूध आणि दह्याने अभिषेक करा. असे केल्याने धनाशी संबंधित समस्या दूर होतील. त्यामुळे नोकरीची समस्या संपून जातील.

मिथुन : महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगाला उसाच्या रसाने अभिषेक करावा. तसेच उजव्या हाताने दातुरा अर्पण करा. असे केल्याने मानसिक समस्या दूर होतात.

कर्क : दुधात साखर आणि साखर मिसळून शिवलिंगाचा अभिषेक करावा. असे केल्याने आरोग्याशी संबंधित समस्या दूर होतील. तसेच कुटुंब आनंदी राहील.

सिंह : पाण्यात लाल चंदन मिसळून शिवलिंगाचा अभिषेक करावा. असे केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात.

कन्या : दूर्वा आणि काही भाग पाण्यात मिसळून शिवाला अभिषेक करा. महाशिवरात्रीच्या दिवशी असे केल्याने रोगांपासून मुक्ती मिळते.

तूळ : महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर गाईचे तूप आणि गुलाबाच्या अत्तराचा अभिषेक करावा. असे केल्याने जीवनात सुख-समृद्धी येते. तसेच आर्थिक प्रश्न सुटेल.

वृश्चिक : शिवरात्रीला पाण्यात साखर आणि मध मिसळून शिवलिंगावर अभिषेक करावा. असे केल्याने कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.

धनु : शिवलिंगाचा दुधाचा अभिषेक करावा. असे केल्याने करिअरशी संबंधित सर्व समस्या दूर होतील.

मकर : शिवलिंगावर तिळाच्या तेलाचा अभिषेक करा. तसेच बेलपत्रावर पांढरे चंदन लावून उजव्या हाताने शिवाला अर्पण करावे. असे केल्याने तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल. यासोबतच शारीरिक वेदनाही दूर होतील.

कुंभ : शिवलिंगावर पंचामृताने अभिषेक करा. यासोबतच शिवाला बेलपत्राची माळ अर्पण करावी. असे केल्याने धनलाभ होईल.

मीन : या राशींच्या लोकांनी महाशिवरात्रीच्या दिवशी हळद अभिषेक करावा. असे केल्याने तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल. तसेच कुटुंब आनंदी राहील.

(येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)

संबंधीत बातम्या :

Chanakya Niti : आयुष्यामध्ये यशाची शिखरे गाठायची असतील तर ‘या’ 5 लोकांपासून दोन हात लांबच राहा!

Rashifal : ‘या’ 3 राशींच्या लोकांच्या डोक्याचा ताप वाढण्याची शक्यता, खर्चावर लगाम ठेवा!

Vastu tips : नात्यामधील सततचे तणाव दूर करण्यासाठी बेडरूममध्ये ठेवा या गोष्टी आणि गोडवा वाढवा!

Follow Us
जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत अन् सुषमा अंधारेंची नावं?
Manoj Jarange Viral Audio Clip : जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत अन् सुषमा अंधारेंची नावं? महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
मनोज जरांगेंना डॅमेज करण्याचा डाव? कथित ऑडिओ क्लिपमधील संभाषणाने....
Jarange Patil Viral Audio Clip : मनोज जरांगेंना डॅमेज करण्याचा डाव? कथित ऑडिओ क्लिपमधील संभाषणाने राजकीय वर्तुळात खळबळ
जरांगेंनी ऐकवलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये अतुल नावाचा उल्लेख; नेमकं प्रकरण..
Jarange Patil Viral Audio Clip : जरांगेंनी ऐकवलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये अतुल नावाचा उल्लेख; नेमकं प्रकरण काय?
500 कोटींचे पुरावे माझ्याकडे; मनोज जरांगे पाटील यांचा मोठा दावा....
Manoj Jarange On Eknath Shinde : 500 कोटींचे पुरावे माझ्याकडे; मनोज जरांगे पाटील यांचा मोठा दावा, पुढे काय म्हणाले?
मनोज जरांगेंना 500 कोटी मिळाल्याची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल....
Jarange Patil Viral Audio Clip : मनोज जरांगेंना 500 कोटी मिळाल्याची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल; श्रीकांत शिंदेंचंही नाव, जरांगे काय खुलासा करणार?
पंतप्रधान मोदींच्या राजकीय भवितव्यावर राऊतांचं भाकीत; अमेरिकेच्या....
Sanjay Raut : पंतप्रधान मोदींच्या राजकीय भवितव्यावर राऊतांचं भाकीत; अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या दौऱ्याचा उल्लेख करत काय म्हणाले?
मुंबई विमानतळावर सोन्याच्या तस्करीचा पर्दाफाश; दोन किलो सोन्यासह....
Mumbai Airport : मुंबई विमानतळावर सोन्याच्या तस्करीचा पर्दाफाश; दोन किलो सोन्यासह....
मुंबई जगातील तिसऱ्या क्रमांकाचं प्रदूषित शहर; AQI थेट...
Mumbai Air Pollution : मुंबई जगातील तिसऱ्या क्रमांकाचं प्रदूषित शहर; नागरिकांच्या आरोग्याला धोका, AQI थेट...
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...