AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shani Upay : शनिवारी केलेल्या उपायांनी मिळतो साडेसातीत लाभ, शनिदोषातून मिळते मुक्ती

या दिवशी विधीवत शनिदेवाची पूजा करणे (Shani Upay) उत्तम मानले जाते. यामुळे शनिदेवाची विशेष कृपा राहते आणि तुमच्यावरचे संकटही दूर होते.

Shani Upay : शनिवारी केलेल्या उपायांनी मिळतो साडेसातीत लाभ, शनिदोषातून मिळते मुक्ती
शनि Image Credit source: Shani Jayanti
| Updated on: May 12, 2023 | 7:43 PM
Share

मुंबई : शनिदेवाला न्यायाची देवता म्हणतात. ते प्रत्येकाला त्यांच्या कर्माप्रमाणे फळ देतात. हिंदू धर्मात शनिवार हा शनिदेवाला समर्पित दिवस आहे. या दिवशी विधीवत शनिदेवाची पूजा करणे (Shani Upay) उत्तम मानले जाते. यामुळे शनिदेवाची विशेष कृपा राहते आणि तुमच्यावरचे संकटही दूर होते. कार्यातील बाधा दुर होतात. ज्या व्यक्तीच्या पत्रिकेत शनिदेवाचा अशुभ प्रभाव असतो त्याच्या जीवनातले सुख आणि शांती हिरावल्या  जाते. धार्मिक शास्त्रानुसार शनिदेवाची कृपा मिळवायची असेल तर शनिवारी त्यांचा उपासना करण्याचा सल्ला देण्यात येतो. आज आपण जाणून घेणार आहोत  की शनिवारी कोणत्या उपायांचा अवलंब केल्यास तुम्हाला फायदा होईल.

शनिवारच्या दिवशी अवश्य करा हे उपाय

  •  शनिवारी सूर्योदयानंतर पिंपळाची पूजा करावी. जल अर्पण करण्यासोबत तेलाचा दिवा लावावा. यामुळे शनिदेवाची कृपा सदैव राहते.
  • मान्यतेनुसार शनिदेवाला लोबान आवडतात. शनिवारी रात्री घरामध्ये धूप जाळावा. लोबानचा धूर घरातील सर्व नकारात्मकता दूर करतो.
  •  शनिवारी कुत्र्याची सेवा करावी. काळ्या कुत्र्याला मोहरीच्या तेलाने मळलेली रोटी खायला द्यावी. यामुळे शनिदेव प्रसन्न होतात. आणि लाभ मिळतो.
  • शनिवारी संध्याकाळी सूर्यास्तानंतर शनि मंदिरात मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. यासोबत दिव्यात काळे तीळ टाकावेत.
  •  शनिवारी शनिदेवाचा मंत्र आणि चालीसा पठण करावे. यामुळे शनिदेवाची कृपा राहते आणि कुंडलीतून सती सतीचा प्रभाव कमी होतो.
  • शनिवारी खास सुंदरकांड किंवा हनुमान चालिसाचे पठण करावे.

शनिदोष काय असतो?

ज्योतिष शास्त्रानुसार शनिदोष हा सर्व प्रकारच्या दोषांमध्ये सर्वात वेदनादायक मानला जातो. जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये शनि दोषाचा योग असेल किंवा कुंडलीमध्ये शनी चुकीच्या घरात बसला असेल, तर शनिदोषाची लक्षणे त्या व्यक्तीला स्वतः दिसून येतात. जीवनात नकारात्मक ऊर्जा विकसित होते. कामात अडथळे येत असून आरोग्य तुम्हाला साथ देत नाही. कारण शनिदेव हे संथ गतीने चालणारे देवता आहेत, त्यामुळे त्याचा प्रभाव कुंडलीवर दीर्घकाळ टिकतो.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

इकडं अटक वॉरंट जारी अन् तिकडं कोकाटे लिलावती रुग्णालयात दाखल, झाल काय?
इकडं अटक वॉरंट जारी अन् तिकडं कोकाटे लिलावती रुग्णालयात दाखल, झाल काय?.
ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?
ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?.
गड-किल्ल्यांवरील हिरवी चादर स्वतःच गुंडाळा, अन्यथा... राणेंचा इशारा
गड-किल्ल्यांवरील हिरवी चादर स्वतःच गुंडाळा, अन्यथा... राणेंचा इशारा.
माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात, अटक वॉरंट जारी; प्रकरण नेमकं काय?
माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात, अटक वॉरंट जारी; प्रकरण नेमकं काय?.
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका.
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?.
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका.
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?.
बाण-पंजा एक साथ...शिंदे-काँग्रेस युतीचे नवं पर्व, दानवेंचं टीकास्त्र
बाण-पंजा एक साथ...शिंदे-काँग्रेस युतीचे नवं पर्व, दानवेंचं टीकास्त्र.
निवडणुकीपूर्वी अंबरनाथमध्ये थरार, BJP उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार
निवडणुकीपूर्वी अंबरनाथमध्ये थरार, BJP उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार.