Shukra Gochar 2023 : शुक्राच्या गोचरामुळे कर्क राशीत धन योग, तीन राशींना मार्गक्रमण 38 दिवस फळणार

ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचं गोचर हे ठराविक कालावधीनंतर होत असतं. त्यामुळे शुभ अशुभ योग जुळून येतात. भौतिक सुखांचा कारक असलेला शुक्र ग्रहाच्या गोचरामुळे तीन राशींना नशिबाची साथ मिळणार आहे.

Shukra Gochar 2023 : शुक्राच्या गोचरामुळे कर्क राशीत धन योग, तीन राशींना मार्गक्रमण 38 दिवस फळणार
Shukra Gochar 2023 : शुक्राच्या गोचरामुळे तीन राशींना मिळणार 38 दिवस नशिबाची साथ, कोणत्या राशी आहेत वाचा
| Updated on: May 31, 2023 | 1:10 PM

मुंबई : ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह त्याच्या ठराविक कालावधीनंतर राशी बदल करत असतो. त्याचे शुभ अशुभ परिणाम राशीचक्रावर होत असतात. कधी कधी काही ग्रहांच्या युतीमुळे काही योगही जुळून येतात. जर योग शुभ असेल तर निश्चितच त्याचा फायदा जातकांना होतो. भौतिक सुखांचा कारक असलेल्या शुक्र ग्रहाने कर्क राशीत गोचर केलं आहे. या राशीत शुक्र 7 जुलै 2023 पर्यंत राहाणार आहे. जवळपास 38 दिवस या राशीत असणार आहे. कर्क राशीत प्रवेश करताच धनयोग जुळून आला आहे. शुक्राने चंद्राच्या राशीत प्रवेश केल्याने धनयोग तयार झाला आहे. या शुभ योगाचा तीन राशींना फायदा होणार आहे. चला जाणून घेऊयात या स्थितीचा कोणत्या राशींना फायदा होणार ते..

या तीन राशींना होणार फायदा

मिथुन : या राशीच्या दुसऱ्या स्थानात धनयोग तयार झाला आहे. त्यात शुक्र आणि बुधाची मैत्रिपूर्ण संबंध आहेत. त्यामुळे या धनयोगाचा जातकांना नक्कीच फायदा होईल. कौटुंबिक स्थरावर चांगला फायदा होताना दिसेल. व्यवसायिक उपक्रमांमध्ये लाभ मिळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर गेल्या काही दिवसांपासून असलेली आर्थिक कोंडी फुटेल. विवाह इच्छुक जातकांना काही स्थळं चालून येतील.

कर्क : शुक्राच्या गोचरामुळे या राशीतच धनयोग तयार होत आहे. यामुळे जातकांच्या काही अडचणी झटपट दूर होतील. जीवनात भौतिक सुख मिळेल. आरामदायी जीवन जगण्याची अनुभूती घेता येईल. पैसे येण्याचे काही नवीन स्त्रोत निर्माण होतील. समाजात मानसन्मान मिळेल. वैवाहिक जीवन सुखमय असेल.

कन्या : या राशीच्या एकादश भावात धनयोग तयार होत आहे. त्यामुळे आर्थिक गणितं या काळात सुटतील. तसेच पैशांचे नवीन स्त्रोत निर्माण झाल्याने दिलासा मिळेल. प्रेम प्रकरणात यश मिळेल. जोडीदारासोबत चांगला वेळ व्यतित कराल. कौटुंबिक वातावरण आनंदी असेल. त्यामुळे आणखीन धीर मिळेल.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)