Solar Eclipse 2023: मेष राशीत राहु असताना सूर्यग्रहण, जाणून घ्या तिथी आणि राशींवरील परिणाम

मेष राशीत या वर्षातलं पहिलं सूर्यग्रहण होणार आहे. विशेष म्हणजे दोन दिवसांनी या राशीत गुरु ग्रह प्रवेश करणार आहे. राहुच्या उपस्थित गुरु विपरीत फळं देईल अशी स्थिती आहे.

Solar Eclipse 2023: मेष राशीत राहु असताना सूर्यग्रहण, जाणून घ्या तिथी आणि राशींवरील परिणाम
मेष राशीत सूर्य आणि राहुची युती असताना ग्रहण, असा होईल तीन राशींवर विपरीत परिणाम
Follow us
| Updated on: Mar 23, 2023 | 6:44 PM

मुंबई :  ज्योतिषशास्त्राचं गणित ग्रहांच्या स्थितीवर अवलंबून असतं. त्या ग्रहांच्या युती, आघाडी , अमावास्या, पौर्णिमा आणि ग्रहण सर्वात महत्त्वाचं ठरतं. चैत्र अमावस्येला या वर्षातील पहिलं सूर्यग्रहण लागणार आहे. 20 एप्रिल 2023 रोजी गुरुवारी मेष राशीत पहिलं सूर्यग्रहण असणार आहे. विशेष म्हणजे या राशीत आधीच राहु ग्रह विराजमान असल्याने विपरीत परिणाम दिसून येतील. सूर्य 15 मार्चपासून मीन राशीत विराजमान आहे आणि 14 एप्रिलला मेष राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे मेष राशीत सूर्य आणि राहुची युती आणि ग्रहण एकाच वेळी होणार आहे.

सूर्य आणि राहुच्या युतीला ज्योतिषशास्त्रात ग्रहण योग म्हंटलं जातं. सूर्य आणि राहुची युती मेष राशीत 15 मे पर्यंत असणार आहे. त्यात मेष राशीत 20 एप्रिलला ग्रहण लागणार आहे. ग्रहण योग विनाशकारी मानला जातो.त्यामुळे या स्थितीचा फटका आरोग्यावर होईल.

गुरु ग्रहही सूर्यग्रहणानंतर मेष राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे राहुच्या सान्निध्यात आल्याने गुरुची शक्ती कमी होईल. इतकंच काय तर ऑक्टोबर महिन्यापर्यंत चांडाळ योग निर्माण होणार आहे. हा अशुभ योग असल्याने जातकांना त्रास सहन करावा लागेल. तसेच शनि सुद्धा राहुच्या नक्षत्रात असल्याने विपरीत परिणाम दिसून येईल.

20 एप्रिलला सकाळी 7 वाजून 5 मिनिटांपासून दुपारी 12 वाजून 29 मिनिटांपर्यंत सूर्यग्रहण असणार आहे. सूतक कालावधी एकूण 5 तास 24 मिनिटांचाअसेल. ग्रहण भारतातून दिसणार नसल्याने सूतक काळ मान्य नसेल. असं असताना ज्योतिषशास्त्रानुसार काही राशींवर वाईट प्रभाव दिसून येईल.

या तीन राशींवर होईल विपरीत परिणाम

मेष – सूर्यग्रहण मेष राशीत असणार आहे. त्यामुळे या राशीवर सर्वाधिक परिणाम दिसून येईल. जातकांना मानसिक त्रास सहन करावा लागेल. त्यामुळे या काळात काळजी घेणं गरजेचं आहे. अपघाताची भीती असल्याने गाडी काळजीपूर्वक चालवा. शक्यतो लांबचा प्रवास टाळणं गरजेचं आहे.

कर्क – या राशीचा जातकांनाही ग्रहणाचा फटाक बसणार आहे. या काळात नाहक मानसिक त्रास सहन करावा लागेल. अचानक भीतीसारखं वाटेल आणि नकारात्मकता वाढेल. या काळात धीर धरा आणि दैवी उपासना करा.

वृश्चिक – या राशीच्या लोकांना या काळात अपमान सहन करावा लागेल. यासाठी वाणीवर नियंत्रण ठेवून काम करा. विचार करूनच एखाद्याला शब्द द्या. वादापासून लांब राहिलेलंच बरं असेल. खर्चात वाढ होईल.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.