मीन राशीचं आजचं राशीफळ, 26 जुलै : मालमत्तासंबंधित प्रकरणांत वादाची परिस्थिती उद्भवू शकते, अकाऊंटसंबंधित कामात खूप सावधगिरी बाळगा

मालमत्तासंबंधित प्रकरणांत वादाची परिस्थिती उद्भवू शकते. आपल्या रागावर नियंत्रण ठेवा आणि कुठलीही समस्या शांततेने सोडवण्याचा प्रयत्न करा. कारण त्याचा नकारात्मक परिणाम घरातील वातावरणावर होऊ शकतो.

मीन राशीचं आजचं राशीफळ, 26 जुलै : मालमत्तासंबंधित प्रकरणांत वादाची परिस्थिती उद्भवू शकते, अकाऊंटसंबंधित कामात खूप सावधगिरी बाळगा
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: वैजंता गोगावले, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

Jul 26, 2021 | 1:02 AM

Horoscope 26July, 2021:

तुमचा आजचा दिवस कसा असणार आहे? मीन राशीवाल्यांना आज काय काय उपाय करायला हवेत ज्यामुळे त्यांचा दिवस शुभ असेल. एवढच नाही तर काय केलं पाहिजे म्हणजे आजच्या दिवशी नुकसान होणार नाही. कुठल्या गोष्टींपासून सावध राहीलं पाहिजे? आजच्या दिवशी तुमच्यासाठी कोणता रंग, कोणता नंबर आणि कोणतं अक्षर शुभ असेल हे सगळं जाणून घेऊयात. पाहुयात 26 जुलैचं राशीफळ काय आहे.

Meena Rashifal(मीन राशीफळ) 26 जुलै-

युवा वर्गाला आयुष्यातील पहिल्या कमाईबद्दल खूप आनंद होईल. संशोधनाच्या क्षेत्रात काम करण्याचा प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही योग्य यश मिळण्याची शक्यता आहे. आजचा दिवस सामाजिक कामांमध्येही व्यतीत होईल.

मालमत्तासंबंधित प्रकरणांत वादाची परिस्थिती उद्भवू शकते. आपल्या रागावर नियंत्रण ठेवा आणि कुठलीही समस्या शांततेने सोडवण्याचा प्रयत्न करा. कारण त्याचा नकारात्मक परिणाम घरातील वातावरणावर होऊ शकतो.

व्यवसायातील कामे फायदेशीर राहतील. तुमच्या परिश्रमानुसार मेहनतीचे उत्तम फळही मिळेल. परंतु अकाऊंटसंबंधित कामात खूप सावधगिरी बाळगा. कोणतीही चूक झाल्यास नुकसान होऊ शकते.

प्रेमसंबंध – कौटुंबिक वातावरण सुखद असेल. तथापि, तुमच्या व्यस्त शेड्युलमुळे घरी आणि कुटुंबात जास्त वेळ घालवू शकणार नाहीत.

खबरदारी – आरोग्य ठिक असेल. परंतु महिलांनी त्यांच्या आरोग्याबद्दल जागरूक असणे आवश्यक आहे.

भाग्यवान रंग – पिवळा भाग्यवान अक्षर – स अनुकूल क्रमांक – 5

लेखक अजय भांबी- डॉ. अजय भांबी हे ज्योतिषमधलं नावाजलेलं व्यक्तिमत्व आहे. डॉ. भांबी हे नक्षत्र ध्यानचे जाणकार आणि उपचारकर्ता आहेत. एक ज्योतिषी म्हणून अजय भांबींना जग ओळखतं. इंग्रजी आणि हिंदी भाषेत अनेक पुस्तकांचं लिखाण केलं. अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय वर्तमानपत्रांसाठी लेखही लिहितात. थायलंडच्या उपपंतप्रधानांकडून बँकॉकमध्ये त्यांना World Icon Award 2018 सन्मानित करण्यात आलं आहे.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें