AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Tips : घरात आणा या पाच वस्तू, चुंबका प्रमाणे आकर्षीत होईल पैसा, तीजोरी राहील कायम भरलेली

वास्तुशास्त्रामध्ये  (Vastu Tips) अशा 5 गोष्टींचे वर्णन केले आहे, त्यांना घरी आणल्याने माता लक्ष्मी आणि कुबेर देव आपोआप तुमच्या घराकडे खेचले जातात. आज आम्ही तुम्हाला त्या पाच गोष्टींबद्दल सविस्तरपणे सांगणार आहोत.

Vastu Tips : घरात आणा या पाच वस्तू, चुंबका प्रमाणे आकर्षीत होईल पैसा, तीजोरी राहील कायम भरलेली
लक्ष्मीImage Credit source: Social Media
| Updated on: Jul 01, 2023 | 9:03 PM
Share

मुंबई : आयुष्यात अशी व्यक्ती क्वचितच असेल, ज्याला श्रीमंत व्हायला आवडणार नाही, पण प्रत्येकाची इच्छा पूर्ण होत नाही. यासाठी लक्ष्मी आणि कुबेर देव यांचा आशीर्वाद असणे अत्यंत आवश्यक आहे. या दोघांना संतुष्ट करण्यासाठी प्रत्येक मनुष्य आपापल्या परीने प्रयत्न करतो. वास्तुशास्त्रामध्ये  (Vastu Tips) अशा 5 गोष्टींचे वर्णन केले आहे, त्यांना घरी आणल्याने माता लक्ष्मी आणि कुबेर देव आपोआप तुमच्या घराकडे खेचले जातात. आज आम्ही तुम्हाला त्या पाच गोष्टींबद्दल सविस्तरपणे सांगणार आहोत. त्यांना तुमच्या घरी आणून तुमचे कुटुंब समृद्ध करू शकता. चला जाणून घेऊया काय आहेत त्या गोष्टी.

आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी या 5 गोष्टी घरी आणा

नाणी

माता लक्ष्मी आणि कुबेर देव यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी तुमच्या तिजोरीत किंवा पर्समध्ये 3 नाणी ठेवा. तुम्ही तुमच्या देवघरात लाल कापडात 3 नाणी ठेवू शकता. असे केल्याने भाग्यवृद्धी होते आणि संकटांपासून मुक्ती मिळते.

मत्स शिल्प

वास्तुशास्त्रानुसार, सुख, समृद्धी, संपत्ती आणि उत्तम आरोग्यासाठी तुम्ही माशाची चांदीची मूर्ती बनवून घरात ठेवू शकता. असे म्हटले जाते की या प्रकारची मूर्ती घरात शांती आणि समृद्धीचा मार्ग प्रशस्त करते. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही भिंतीवर माशांची पेंटिंग देखील लावू शकता.

मंगल कलश

धार्मिक विद्वानांच्या मते, धनलाभासाठी तुम्ही घरातील ईशान कोपऱ्यात अष्टदल कमल बनवून मंगल कलशाची स्थापना करू शकता. नंतर तो कलश पाण्याने भरून त्यात तांब्याचे नाणे टाकावे. हा उपाय खूप प्रभावी आहे.

लक्ष्मीचे प्रतीक असलेले कौड्या

माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी कौड्या हळदीच्या द्रावणात किंवा केशरमध्ये भिजवून वाळवा. यानंतर, जेव्हा त्या कौड्यांचा रंग पिवळा होईल तेव्हा त्यांना लाल कपडात बांधून ठेवा आणि घराच्या तिजोरीत ठेवा. शास्त्रानुसार, पिवळी कौडी ही माता लक्ष्मीचे प्रतीक आहे. ती घरात ठेवल्याने पैसा चुंबकासारखा आकर्षीत होतो .

गणेश, लक्ष्मी आणि कुबेर यांची मूर्ती

घरात पैशाचा ओघ वाढवण्यासाठी माता लक्ष्मी, कुबेर देव आणि भगवान गणेशाच्या मूर्ती पूजागृहात ठेवाव्यात. या तिन्ही देवतांची रोज योग्य विधीपूर्वक पूजा करावी. असे केल्याने कुटुंबात सुख-समृद्धी वाढते आणि आनंद पसरू लागतो.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.