AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Tips : गंगाजलाला वास्तू शास्त्रात आहे विशेष महत्त्व, घरात गंगाजल ठेवत असाल तर या गोष्टी अवश्य पाळा

आपल्या देशात गंगा नदीला माता मानून तिचे पाणी अमृत मानले जाते. गंगा मातेला मोक्षदाता म्हणतात. त्यामुळे मृत्यूनंतर मृत व्यक्तीच्या तोंडात गंगाजल टाकण्याची परंपरा आहे. गंगा मातेचे पाणी इतके शुद्ध आहे की ते कधीही सडत नाही किंवा त्यात हानिकारक जीवाणू टिकू शकत नाहीत.

Vastu Tips : गंगाजलाला वास्तू शास्त्रात आहे विशेष महत्त्व, घरात गंगाजल ठेवत असाल तर या गोष्टी अवश्य पाळा
गंगाImage Credit source: Social Media
| Edited By: | Updated on: Feb 09, 2024 | 7:06 PM
Share

मुंबई : हिंदू धर्मात गंगाजलाला (Gangajal) विशेष महत्त्व आहे. प्राचीन काळापासून आपल्या देशात गंगा नदीला माता मानून तिचे पाणी अमृत मानले जाते. गंगा मातेला मोक्षदाता म्हणतात. त्यामुळे मृत्यूनंतर मृत व्यक्तीच्या तोंडात गंगाजल टाकण्याची परंपरा आहे. गंगा मातेचे पाणी इतके शुद्ध आहे की ते कधीही सडत नाही किंवा त्यात हानिकारक जीवाणू टिकू शकत नाहीत. या कारणास्तवही गंगाजल अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. मान्यतेनुसार, गंगा मातेच्या पाण्यात स्नान केल्याने व्यक्तीचे सर्व पाप धुऊन शुद्ध होतात. या कारणास्तव गंगा नदीत स्नान करण्याचे विशेष महत्त्व मानले जाते. अनेक सणांच्या दिवशी लाखो भाविक गंगा नदीत स्नान करण्यासाठी येतात. पूजेतही पवित्र गंगाजल वापरले जाते. जवळजवळ सर्व हिंदू लोक गंगाजल आपल्या घरात किंवा देवघरात ठेवतात, परंतु गंगाजल ठेवण्याचे काही नियम आहेत, तरच गंगाजल घरात ठेवल्यास फायदा होतो.

गंगाजलाचे पात्र

बहुतेक लोक प्लॅस्टिकच्या बाटलीत किंवा डब्यात गंगाजल घेऊन घरी येतात आणि ते अशा प्रकारे घरात ठेवतात, जे अत्यंत चुकीचे मानले जाते. गंगेचे पाणी अतिशय पवित्र आहे, त्यामुळे ते ठेवण्याचे पात्रही शुद्ध असावे. चांदी, तांबे, पितळ किंवा मातीच्या भांड्यात गंगाजल ठेवणे योग्य मानले जाते.

गंगाजल साठविण्याची जागा

मान्यतेनुसार, गंगाजल स्वच्छ आणि गडद ठिकाणी ठेवावे. गंगाजल ठेवण्यासाठी फक्त गडद आणि स्वच्छ जागा शुभ मानली जाते. गंगाजल सूर्यप्रकाशाच्या ठिकाणी किंवा उघड्यावर ठेवू नये. गंगाजल स्वयंपाकघर किंवा स्नानगृहाजवळ ठेवू नये.

स्वच्छतेची विशेष काळजी घ्या

  • गंगाजल पूजास्थानाजवळ ठेवणे शुभ मानले जाते. गंगाजल कुठेही ठेवा, त्या ठिकाणच्या स्वच्छतेची विशेष काळजी घ्या.
  • गंगाजल ठेवलेल्या ठिकाणी हे काम करू नका.
  • गंगेचे पाणी ज्या ठिकाणी ठेवले जाते ती जागा पूर्णपणे शुद्ध असावी. ज्या खोलीत गंगाजल ठेवले असेल तर चुकूनही तेथे मांसाहार किंवा मद्य सेवन करू नये.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

दादांसारखा नेता जाणं महाराष्ट्राची हानी - हर्षवर्धन सपकाळ
दादांसारखा नेता जाणं महाराष्ट्राची हानी - हर्षवर्धन सपकाळ.
नियोजनाच्या बाबतीत अजित दादांचा हात कोणीही धरु शकत नाही: अंकूश काकडे
नियोजनाच्या बाबतीत अजित दादांचा हात कोणीही धरु शकत नाही: अंकूश काकडे.
क्रू मेंबर पिंकी माळी यांचा मृत्यू; स्थानिकांची सरकारकडे 'ही' मागणी
क्रू मेंबर पिंकी माळी यांचा मृत्यू; स्थानिकांची सरकारकडे 'ही' मागणी.
अंत्यसंस्कारानंतर कार्यकर्त्यांचा टाहो; पार्थ, जय पवारांनी जोडले हात
अंत्यसंस्कारानंतर कार्यकर्त्यांचा टाहो; पार्थ, जय पवारांनी जोडले हात.
अजितदादा पर्व संपले... तडफदार आणि झंझावाती नेतृत्व अनंतात विलीन
अजितदादा पर्व संपले... तडफदार आणि झंझावाती नेतृत्व अनंतात विलीन.
अजित पवार पंचतत्वात विलीन, दोन्ही मुलांकडून मुखाग्नी
अजित पवार पंचतत्वात विलीन, दोन्ही मुलांकडून मुखाग्नी.
नितीन गडकरी यांनी घेतलं अजितदादांच्या पार्थिवाचं अखेरचं दर्शन
नितीन गडकरी यांनी घेतलं अजितदादांच्या पार्थिवाचं अखेरचं दर्शन.
केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी घेतलं अजित पवारांचं अंत्यदर्शन
केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी घेतलं अजित पवारांचं अंत्यदर्शन.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार.
अजितदादांना अखेरचा निरोप देतांना प्रतिभा पवारांना अश्रु अनावर
अजितदादांना अखेरचा निरोप देतांना प्रतिभा पवारांना अश्रु अनावर.