AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पती पत्नी एकाच राशीचे असतील तर काय? काय सांगतं ज्योतिषशास्त्र? कसा पडतो फरक ते जाणून घ्या

लग्न करण्यापूर्वी अनेक कुटुंबिय कुंडली ग्रह तारे ज्योतिष्याकडून तपासून मगच होकार कळवतात. वैवाहिक जीवनात अडचणी येऊ नये यासाठी हा अट्टाहास असतो. पण पती आणि पत्नी एकाच राशीचे असतील तर काय होतं? त्यांच्या आयुष्यात शुभ अशुभ काय घडते ते सांगा

पती पत्नी एकाच राशीचे असतील तर काय? काय सांगतं ज्योतिषशास्त्र? कसा पडतो फरक ते जाणून घ्या
पती पत्नी एकाच राशीचे असतील तर काय? काय सांगतं ज्योतिषशास्त्र? कसा पडतो फरक ते जाणून घ्याImage Credit source: Freepik
| Updated on: Jun 18, 2025 | 5:51 PM
Share

लग्न करण्यापूर्वी अनेक गोष्टींची शहनिशा केली जाते. मुलगा किंवा मुलगीचा स्वभाव कसा आहे? घरी कोण असतं? उत्पन्नाचे स्त्रोत, राहण्यासाठी घर आहे का? वगैरे वगैरे गोष्टींची चौकशी केली जाते. इतकंच काय हे सर्व पाहिल्यानंतर कुंडली जुळते की नाही ते देखील तपासलं जातं. कारण लग्न हे दोन जीवांचं पवित्र बंधन मानलं जातं. त्यामुळे वैवाहिक जीवनात अडचणी येऊ नये म्हणू रास आणि कुंडलीतील ग्रह ताऱ्यांचा ज्योतिषाकडून पडताळणी केल्या जातात. जर पती पत्नी जर एकाच राशीची असतील शुभ असतं की अशुभ? पती पत्नी यांच्यात सामंजस्यपणा असतो का? की टोकाचा वाद होतो. चला जाणून घेऊयात ज्योतिषशास्त्र काय सांगते.

ज्योतिषशास्त्रात 12 राशींचा उल्लेख केला आहे. काही राशींचे स्वभाव एकमेकांच्या भिन्न असतात. मृत्यूषडाष्टक योगामुळे काही राशींचं पटत नाही. त्यामुळे ज्योतिष या लग्नांना नकार देतात. जसं की तूळ आणि मीन राशीत षडाष्टक योग असतो. म्हणजेच एकमेकांपासून सातव्या स्थानात असतील तर षडाष्टक योग लागतो. दरम्यान एकाच राशीचे असतील त्यांचे स्वभाव, आवडनिवड आणि दृष्टीकोनात साम्य दिसून येतं. त्यामुळे वैवाहिक जीवन चांगलं असू शकतं. एकमेकांच्या भावना समजू शकतो. सकारात्मक पैलूंबाबत सांगायचं तर चांगली समज आणि समन्वय, समान आवडी आणि ध्येये, परस्पर आदर आणि पाठिंबा, सोपी निर्णय प्रक्रिया असते. तर नकारात्म पैलू सांगायचे तर, कट्टरता आणि संघर्ष, एकमेकांच्या कमतरता ओळखणे आणि संतुलनाचा अभाव असतो.

मेष राशीचे लोकं उत्साही, साहसी आणि स्वतंत्र असतात. त्यामुळे हे नातं उत्कटतेने भरलेले असते. पण अहंकारामुळे दोघांमध्ये टोकाचा संघर्ष होऊ शकतो. मिथुन राशीचे लोकं बुद्धीमान आणि परिवर्तनशील आहे. पण दोघांमध्ये दोघांमध्येही स्थिरता आणि वचनबद्धतेचा अभाव असू शकतो. कर्क राशीचे जोडपी भावनिक, संवेदनशील आणि कुटुंबाभिमुख असतात. पण अधिक भावनिक असल्याने मन:स्थिती समस्या ठरू शकते. सिंह राशीचं जोडपं दोघेही आत्मविश्वासू, उदार आणि लक्ष वेधून घेणारे आहेत. हे नाते रोमांचक आणि अद्भुत असतं. पण दोघांचा अहंकार आणि वर्चस्व गाजवण्याची प्रवृत्ती संघर्ष निर्माण करू शकते. मकर राशीचे लोकं शिस्तप्रिय आणि जबाबदार असतात. हे नाते स्थिर आणि यशस्वी असतात. परंतु दोघांकडून जास्त गांभीर्य आणि भावनिक अंतर समस्या निर्माण करू शकते.

राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.