Shivsena : बंडखोरांच्या मंत्री पदाबाबत संध्याकाळपर्यंत निर्णय, कार्यकरणीच्या बैठकीनंतर राऊतांनी दिले संकेत

बंडखोर आमदारांच्या बाबतीत पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली नव्हती. मात्र, शनिवारी पदाधिकारी आणि कार्यकरणीच्या बैठकीत त्यांनी या आमदारांचाही समाचार घेतला. एकतर बाळासाहेब ठाकरे किंवा शिवसेना हे नाव वगळून निवडणुकीला सामोरे जाऊनच दाखवा असे त्यांनी आव्हान दिले तर त्यानंतर लागलीच आमदारांच्या कारवाईबाबत निर्णय होणार असल्याचे सांगितले.

Shivsena : बंडखोरांच्या मंत्री पदाबाबत संध्याकाळपर्यंत निर्णय, कार्यकरणीच्या बैठकीनंतर राऊतांनी दिले संकेत
खा. संजय राऊत
Image Credit source: tv9
राजेंद्र खराडे

|

Jun 25, 2022 | 4:26 PM

मुंबई : आतापर्यंत बंडखोराबद्दल मवाळ असलेली (Shivsena) शिवसेना आता मात्र कडक कारवाईच्या भूमिकेत असल्याचे पाहवयास मिळत आहे. शनिवारी दिवसभर सुरु असलेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत प्रथमच (CM Uddhav Thackeray) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रोष व्यक्त केला. जनतेमध्ये जाऊन मतं मागायची असतील तर स्व:ताच्या बापाचे नाव वापरा असे म्हणत बंडखोर आमदार आणि मंत्र्यांबाबत शनिवारी संध्याकाळपर्यंत निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे शिवसेना आणि पक्ष प्रमुख हे आता अॅक्शन मोडमध्ये असल्याचे चित्र आहे. (Rebellious) बंडखोरांच्या विरोधात शिवसैनिक हे रस्त्यावर उतरले आहेत. तर दुसरीकडे कार्यकरणीच्या बैठकीत संघटनात्मक निर्णय घेतले जात आहेत. त्यामुळे पक्षात पडलेली फूट भरुन काढण्यासाठी कोरोनाबाधित असतानाही मुख्यमंत्री आता रिंगणात उतरले आहेत.

मंत्री पदावरुन काय म्हणाले संजय राऊत?

बंडखोरांमध्ये केवळ आमदारच नाहीतर मंत्र्यांचाही सहभाग आहे. त्यामुळे याबाबत शिवसेना पक्ष काय निर्णय घेणार याकडे आमदारांचे आणि सर्वसामान्य जनतेचेही लक्ष लागले होते. आता कार्यकरणीच्या बैठकीत पक्षात कुणाला ठेवायाचे आणि कुणाला नाही याबाबत सर्व अधिकार हे एकमताने पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना देण्यात आले आहेत. असे असले तरी या कार्यकरणीत आमदार आणि मंत्र्यांच्या कारवाईबाबत कोणताही निर्णय झाला नाही. मात्र, संध्याकाळी (शनिवारी) याबाबत संकेत दिले जातील असे खा. राऊत यांनी सांगितले आहे. त्यामुळे बंडखोर आमदार आणि मंत्र्यांच्या कारवाईबाबत मोठा निर्णय शिवसेनेकडून घेतला जाऊ शकतो.

आता पक्ष प्रमुखच कडक भूमिकेत

बंडखोर आमदारांच्या बाबतीत पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली नव्हती. मात्र, शनिवारी पदाधिकारी आणि कार्यकरणीच्या बैठकीत त्यांनी या आमदारांचाही समाचार घेतला. एकतर बाळासाहेब ठाकरे किंवा शिवसेना हे नाव वगळून निवडणुकीला सामोरे जाऊनच दाखवा असे त्यांनी आव्हान दिले तर त्यानंतर लागलीच आमदारांच्या कारवाईबाबत निर्णय होणार असल्याचे सांगितले. त्यामुळे पक्षातून कुणाकुणाची हकालपट्टी होणार हे लवकरच समजणार आहे.

हे सुद्धा वाचा

कारवाईमध्ये कोणा-कोणाचा नंबर?

शिवसेना पक्षाकडून बंडखोरांवर कारवाई तर अटळ आहेच पण यासाठी आवश्यक असलेल्या तांत्रिक बाबी पूर्ण केल्या जात असल्याचे खा. संजय राऊत यांनी सांगितले. त्यामुळे प्रत्यक्ष कारवाईला लवकर सुरवात होणार असून शनिवारी संध्याकाळपासून याला सुरवात होणार असल्याचेही ते म्हणाले. मात्र, कारवाईमध्येही पहिला नंबर कुणाचा ? असा सवाल उपस्थित होत आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें