Horoscope Today 1 January 2022 | काय होणार या वर्षात ? कसा असेल वर्ष 2022 चा पहिला दिवस? , जाणून घ्या इत्यंभूत माहिती

वर्षाच्या पहिल्या दिवशी ग्रहांचा राजा आणि सुखाचा कारक शुक्र ग्रह यांच्या संयोगाने सर्व राशीच्या लोकांच्या जीवनात आनंद आणि आनंदावर परिणाम होईल. चला तर मग जाणून घेऊयात कसे जाईल 2022 हे वर्ष.

Horoscope Today 1 January 2022 | काय होणार या वर्षात ?  कसा असेल  वर्ष 2022 चा पहिला दिवस? , जाणून घ्या इत्यंभूत माहिती
Yoga Zodiac
Follow us
| Updated on: Jan 01, 2022 | 10:17 AM

मुंबई : इंग्रजी नवं 2022 वर्षाची सुरुवात झाली आहे. मागील काही काळ कोरोना महामारीमुळे आपण सर्वचजण त्रस्त होते. पण आता नव्या वर्षाची सुरुवात झाली आहे. हे वर्ष कसे जाईल याची उत्सुक्ता सर्वांनाच लागून राहीली आहे. आज चंद्र वृश्चिक राशीतून धनु राशीत प्रवेश करेल. येथे चंद्राचा संयोग सूर्य, शुक्राशी होईल. अशा स्थितीत वर्षाच्या पहिल्या दिवशी ग्रहांचा राजा आणि सुखाचा कारक शुक्र ग्रह यांच्या संयोगाने सर्व राशीच्या लोकांच्या जीवनात आनंद आणि आनंदावर परिणाम होईल. चला तर मग जाणून घेऊयात कसे जाईल 2022 हे वर्ष.

मेष : (Mesh Rashi)

मेष राशींच्या व्यक्तींसाठी नवीन वर्षाची सुरुवात अतिशय आनंदात जाणार आहे. आज तुमच्यात भरपूर ऊर्जा पाहायला मिळणार आहे. सामाजिक स्तरावर तुम्ही स्वतःची चांगली प्रतिमा निर्माण करू शकता. मात्र मेष राशीच्या लोकांनी आरोग्याबाबत काळजी घ्यावी. परदेशात जाण्याचा विचार करणाऱ्यांना या संदर्भात काही चांगली बातमी मिळू शकते. कौटुंबिक जीवन नेहमीपेक्षा चांगले होईल. आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ आहे.

वृषभ : (vrushabh Rashi)

इंग्रजी वर्षाचा पहिला दिवस वृषभ राशींच्या व्यक्तींसाठी सरप्राईजींग असणार आहे. या दिवसात तुम्हाला अनेक सरप्राईज मिळू शकतात. व्यापार्‍यांनाही नफा मिळण्याची शक्यता आहे, पण या राशीच्या लोकांना व्यवहार करताना थोडी काळजी घ्यावी लागेल. सामाजिक स्तरावर तुम्ही तुमच्या शब्दांच्या जादूने लोकांना आकर्षित करू शकता. नवीन वर्ष चांगले जाण्यासाठी काही नवीन संकल्प तुमच्याकडून घेतले जाऊ शकतात.

मिथुन : (Mithun Rashi)

मिथुन राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंदाने भरलेला असेल. आज हे लोक आपल्या नातेवाईकांना भेटू शकतात आणि त्यांच्यासोबत चांगला वेळ व्यतीत करु शकतात. आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ दिवस आहे. या दिवशी कोणतेही काम मन लावून करा.

कर्क : (Karak Rashi)

वर्षाच्या पहिल्याच दिवशी कर्क राशीच्या लोकांच्या प्रेम जीवनात चांगले बदल होऊ शकतात, जे अजूनही अविवाहित आहेत त्यांचा शोध आज थांबू शकतो. जर लग्न झाले असेल तर तुम्ही तुमच्या मुलांसोबत चांगला वेळ घालवू शकता. या राशीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात अपेक्षित यश मिळविण्यासाठी या दिवशी संकल्प करता येईल. फक्त खर्चावर नियंत्रण ठेवा.

सिंह : (Sinha Rashi)

सिंह राशींच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस खूप शुभ मानला जावू शकतो. आजच्या दिवशी तुम्ही तुमच्या परिवारासोबत चांगला वेळ घालवाल. आज तुम्ही कोणतीही घरगुती वस्तू खरेदी करू शकता. नवविवाहित जोडप्यांसाठी आजचा दिवस खूप चांगला असू शकतो. आज रागावर नियंत्रण ठेवण्याचा संकल्प करावा.

कन्या : (Kanya Rashi)

आज तुम्ही उत्साही दिसाल आणि तुमच्या बोलण्याने घरातील लोकांमध्ये सामंजस्य निर्माण करण्याचा प्रयत्न कराल. काही लोक या दिवशी आपल्या प्रियकरासोबत किंवा जोडीदारासोबत लाँग ड्राईव्हवर जाऊ शकतात. आरोग्याबाबत जी चिंता होती त्यावर आज मात करता येईल.

तूळ : (Tula Rashi)

वर्षाचा पहिला दिवस तूळ राशींच्या लोकांसाठी आर्थिकदृष्ट्या मजबूत असेल. या दिवशी काही लोक संपूर्ण महिन्यासाठी बजेटचे नियोजन देखील करू शकतात. पण आज शेजाऱ्यांशी कोणत्याही कारणाने वाद झाला असेल तर नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी तक्रारी विसरून त्यांच्याशी बोला नाते टिकवण्याचा प्रयत्न करा.

वृश्चिक : ( Vrushik Rasji)

वृश्चिक राशींच्या व्यक्तींना आज ताजेतवाने वाटेल. परिवारातील लोकांसोबत तुमचे व्यवहार सहकार्याचे असतील. सामाजिक स्तरावर तुम्ही चांगली प्रतिमा निर्माण करू शकाल. आज डोळ्यांची विशेष काळजी घ्या.

धनु : (Dhanu Rashi)

धनु राशीच्या लोकांना आज त्यांच्या मित्रांकडून सरप्राईज गिफ्ट मिळू शकते. जुन्या मित्रांशी फोनवर बोलणे होईल. जर तुम्ही आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती करत असाल तर आज तुम्हाला अपेक्षित यश मिळण्याची शक्यता आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी सोन्याहून सुंदर आहे.

मकर : (Makar Rashi)

वर्षाच्या पहिल्या दिवशी मकर राशीच्या काही लोकांना आर्थिक लाभ होऊ शकतो. आज तुमच्या अनेक इच्छा पूर्ण होऊ शकतात. मोठ्या भावंडांसोबत काही कारणास्तव मतभेद झाले असतील तर या दिवशी तुम्ही त्यांच्याशी बोलून परिस्थिती सामान्य करू शकता. आजचा दिवस नवी सुरुवात करण्यासाठी उत्तम आहे.

कुंभ : (Kumbha Rashi)

कुंभ राशीच्या लोकांना नवीन वर्षाच्या सुरुवातीला करिअर क्षेत्राशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. यामुळे तुमच्या कुटुंबातील सदस्यांना तुमचा अभिमान वाटेल. या दिवशी तुमचे तुमच्या वडिलांसोबतचे नातेही सुधारेल. फक्त आज आळशीपणा करु नका.

मीन : (Meen Rashi)

या दिवशी, तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या कुटुंबातील सदस्यांसोबत पार्टी करण्याची लक्षणे आहेत. सकाळी एक सकारात्मक विचार तुमचा संपूर्ण दिवस सकारात्मक बनवू शकतो. जर या राशीचे काही लोक धार्मिक कार्यात भाग घेऊ शकतात. आज मन शांत ठेवा.

टीप- येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, यासाठी कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांचे हित लक्षात घेऊन ते येथे मांडले आहे.

संबंधीत बातम्या :

Zodiac| ‘ठरवलं की करणारच’, चिकाटी हीच ओळख, या 4 राशींची मनं जिंकणं जगातलं सगळ्यात अवघड काम!

Zodiac 2022 | नवीन वर्षात या 5 राशींच्या लोकांचे दोनाचे चार हात होणार, या वर्षी लग्न नक्की!

Zodiac | ‘सुख म्हणजे नक्की हेच असतं’ असं म्हणाल, फक्त दोन दिवस थांबा, या 5 राशींचे नशीब बदलणार

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.