AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या 5 राशीचे लोक असतात अत्यंत खर्चिक, शॉपिंगवर खर्च करतात हजारो रुपये

ज्योतिषशास्त्रानुसार, काही राशींचे लोक शॉपिंगला प्रचंड महत्त्व देतात. वृषभ राशीचे लोक विचारपूर्वक शॉपिंग करतात, तर सिंह राशीचे लोक ब्रँडेड वस्तूंना प्राधान्य देतात.

या 5 राशीचे लोक असतात अत्यंत खर्चिक, शॉपिंगवर खर्च करतात हजारो रुपये
| Edited By: | Updated on: Jan 17, 2025 | 9:49 PM
Share

प्रत्येक व्यक्तीच्या काहीना काही आवडीनिवडी असतात. पण एक आवड मात्र सर्वांची कॉमन असते. मग ती स्त्री असो की पुरुष असो. त्यांची आवड समान असते. ती म्हणजे शॉपिंग करणं. अर्थात त्यात शॉपिंग करण्याची वेळ वेगवेगळी असू शकते. शॉपिंगचा खर्च इकडे तिकडे असू शकतो. पण अनेकांना शॉपिंग करण्याची चटक लागलेली असते. ते शॉपिंगला खूप महत्त्व देतात आणि ते केव्हा आणि कुठेही शॉपिंग करायला तयार असतात. पण अशा काही राशीचे लोक आहेत की ज्यांना शॉपिंग करायला खूप आवडते. ज्योतिष शास्त्रानुसार, काही राशींमध्ये लोक शॉपिंगमध्ये अधिक रुचि घेतात. इतकी रुची घेतात की त्यांच्या कमाईतील बराचसा भाग शॉपिंगवरच उडवतात. कोणत्या राशीचे हे लोक आहेत, ते पाहूया.

वृषभ (Taurus) :

वृषभ राशीच्या लोकांना शॉपिंग करायला प्रचंड आवडते. परंतु त्यांची एक चांगली बाब म्हणजे ते शॉपिंग करताना खूप विचार करतात. विचार करूनच ते शॉपिंग करतात. शिवाय महिन्याचा बजेट कोलमडणार नाही याची काळजी घेतात. ज्या गोष्टींची नितांत गरज आहे, अशाच गोष्टींचे ते शॉपिंग करतात. वृषभ राशीच्या महिलांना पुरुषांच्या तुलनेत अधिक शॉपिंग करायला आवडते.

सिंह (Leo) :

सिंह राशीच्या लोकांना ब्रँडेड वस्त्रांचा आणि वस्तूंचा आवड असते. आपली मानसिक स्थिती सुधारण्यासाठी ते शॉपिंग करतात. कधीकधी ते आपल्या कमाईपेक्षा जास्त खर्च करतात. त्यामुळे त्यांचं आर्थिक गणित नेहमीच चुकतं. लोकांसमोर दिखाऊपणा करण्यासाठी या राशीच्या लोकांना शॉपिंग करणे आवडते. या राशीच्या पुरुष आणि महिलांना दोन्ही शॉपिंगची आवड असते.

तुळ (Libra) :

तुळ राशीच्या लोकांना विलासी जीवन जगायला आवडते. त्यांना महागड्या आणि आलिशान वस्तू खरेदी करायला आवडतात. त्यासाठी ते कधीच बजेट पाहत नाहीत. तुळ राशीच्या लोकांकडे पैशांची कमतरता नसते, त्यामुळे ते शॉपिंग करताना पैशाची पर्वा करत नाही. गाडी, मोबाइल, घराचे इंटिरियर्स यासारख्या वस्तू ते पटकन बदलतात.

कुंभ (Aquarius) :

कुंभ राशीचे लोक जेव्हा कंटाळलेले असतात, तेव्हा ते शॉपिंग करायला निघतात. त्यांना इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि गॅझेट्सची खूप आवड असते. ऑनलाइन शॉपिंग करणे त्यांना विशेषतः आवडते. ते जितके खर्च करतात, त्याहून अधिक कमावतात, त्यामुळे त्यांना पैशाची जास्त चिंता वाटत नाही.

धनु (Sagittarius) :

धनु राशीचे लोक आपल्या कमाईचा मोठा भाग शॉपिंगवर खर्च करतात. ते फक्त स्वतःसाठीच नाही, तर आपल्या कुटुंबासाठी आणि मित्रमैत्रिणींसाठीही महागडे गिफ्ट्स घेतात. त्यांना फॅशनेबल कपडे, एसेसरीस, कॉस्मेटिक्स, गॅझेट्स वगैरे वस्तू खरेदी करायला आवडतात. शॉपिंग करताना ते बजेटची चिंता करत बसत नाहीत.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...
आम्ही लढणार, जिंकणार आणि लोकशाही वाचवणार इंडिया आघाडीचा निर्धार
India Alliance PC : आम्ही लढणार, जिंकणार आणि लोकशाही वाचवणार इंडिया आघाडीचा निर्धार
साताऱ्याच्या सुपुत्राची सुवर्ण कामगिरी; साहिल जाधवने आशियाई स्पर्धेत..
साताऱ्याच्या सुपुत्राची सुवर्ण कामगिरी; साहिल जाधवने आशियाई स्पर्धेत दोन गोल्ड जिंकून रचला इतिहास!