AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

G-20 नंतर शेअर बाजारात रचला गेला नवा इतिहास, पहिल्यांदा हा आकडा केला पार

Share Market After G20 : भारतात G-20 चे यंदा आजोजन करण्यात आले होते. या संमेलनात अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. ज्याचा परिणाम शेअर मार्केटवर देखील आज पाहायला मिळाला.

G-20 नंतर शेअर बाजारात रचला गेला नवा इतिहास, पहिल्यांदा हा आकडा केला पार
| Updated on: Sep 11, 2023 | 4:21 PM
Share

मुंबई : सोमवारी भारतीय शेअर बाजारात नवा इतिहास रचला गेला आहे. निफ्टीने प्रथमच 20,000 चा आकडा पार केला आहे. मुंबई शेअर बाजाराचा मुख्य निर्देशांक सेन्सेक्स 527 अंकांच्या वाढीसह 67000 अंकांच्या पुढे बंद झाला. ही वाढ होण्याचे कारण म्हणजे G20 शिखर परिषदेत घेतलेले महत्त्वाचे निर्णय मानले जात आहेत. ज्यामध्ये भारत, अमेरिका, युरोपियन युनियन आणि आखाती देशांदरम्यान रेल्वे आणि सागरी कॉरिडॉरबाबत झालेल्या कराराचा विचार केला जात आहे. याचे कारण PSU शेअर्समध्ये वाढ झाल्याचे मानले जाते, विशेषत: रेल्वेशी संबंधित. दुसरीकडे बँकिंग आणि वाहन समभागातही तेजी दिसून आली आहे.

सेन्सेक्सने 67 हजार अंकांचा टप्पा ओलांडला

मुंबई शेअर बाजाराचा मुख्य निर्देशांक सेन्सेक्स आज 67 हजार अंकांच्या पुढे बंद झाला. आज निर्देशांकात 500 हून अधिक अंकांची वाढ दिसून आली. मिळालेल्या माहितीनुसार, सेन्सेक्स 528 अंकांच्या वाढीसह 67,127.08 अंकांवर बंद झाला. 52 दिवसांनंतर सेन्सेक्सने 67 हजार अंकांचा टप्पा ओलांडला आहे.

21 जुलै रोजी सेन्सेक्स 67190 अंकांसह दिवसाच्या उच्चांकावर दिसला. जर आपण फक्त सप्टेंबर महिन्याबद्दल बोललो तर सेन्सेक्समध्ये सुमारे 2300 अंकांची म्हणजेच साडेतीन टक्क्यांची वाढ झाली आहे. 31 ऑगस्ट रोजी सेन्सेक्स 64,831 अंकांवर बंद झाला.

निफ्टीने 20 हजार अंकांचा टप्पा ओलांडला

दुसरीकडे, राष्ट्रीय शेअर बाजाराचा मुख्य निर्देशांक निफ्टीने 20 हजार अंकांचा टप्पा ओलांडला. ट्रेडिंग सत्रादरम्यान निफ्टीने 20,008.15 अंकांचा उच्चांक गाठला. जर आपण आकडेवारीवर नजर टाकली तर आज निफ्टी 19,890 अंकांवर उघडला आणि बाजार बंद झाल्यानंतर तो 176.40 अंकांच्या वाढीसह 19,996.35 अंकांवर बंद झाला.

सप्टेंबर महिन्यात निफ्टी 3.85 टक्क्यांनी वाढला आहे. या काळात निफ्टीने 742.55 अंकांची वाढ नोंदवली आहे. निफ्टीची ही पातळी शेवटची 20 जुलै रोजी दिसली होती. त्यावेळी निफ्टीने 19,991.85 अंकांसह लाइफ टाईम गाठला होता.

गुंतवणूकदारांना फायदा

सप्टेंबर महिन्यात गुंतवणूकदारांनी शेअर बाजारातून भरपूर कमाई केली आहे. आजच बोलायचे झाले तर 3.31 लाख कोटी रुपये गुंतवणूकदारांच्या खिशात पडले आहेत. बीएसईच्या आकडेवारीनुसार, बीएसईचे मार्केट कॅप शुक्रवारी 3,20,94,202.12 कोटी रुपये होते, जे आज 3,24,25,325.74 कोटी रुपयांवर पोहोचले.

याचा अर्थ एम कॅपमध्ये 3,31,123.62 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. दुसरीकडे, जर आपण संपूर्ण सप्टेंबरबद्दल बोललो तर, 31 ऑगस्ट रोजी बीएसईचा एम कॅप 3,09,59,138.70 कोटी रुपये होता. ज्यामध्ये तेव्हापासून 14,66,187.04 कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.