Sunday special story | 2020 मध्ये व्हायरल झालेले ‘हे’ व्हिडीओ पाहिलेत का?, बघा स्पेशल 10 व्हिडीओ

2020 या वर्षामध्ये असे अनेक व्हिडीओ समोर आले, ज्यांची प्रचंड चर्चा झाली. फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूबसारख्या माध्यमांवर या व्हिडीओंनी कोटींनी लाईक्स मिळवले. (viral video year 2020)

Sunday special story | 2020 मध्ये व्हायरल झालेले 'हे' व्हिडीओ पाहिलेत का?, बघा स्पेशल 10 व्हिडीओ
Follow us
| Updated on: Jan 03, 2021 | 12:39 PM

मुंबई : कोरोना महामारीमुळे 2020 हे वर्ष अस्थिरतेत गेलं. महामारी, लॉकडाऊन, क्वॉरन्टाईन, आयसोलेशन, व्हॅक्सीन असे अनेक शब्द कित्येकांना नव्याने समजले. जगण्याचीच शाश्वती नसल्यामुळे जगण्यातलं सुख, आनंद, हास्य असं सगळं जणू मागे पडल्यासारखं झालं होत. असं असलं तरी मागच्या वर्षी अशा अनेक गोष्टी घडल्या ज्यांचा समाजमाध्यमांवरचा वावर आपल्या सुखाऊन गेला. 2020 या वर्षामध्ये असे अनेक व्हिडीओ समोर आले, ज्यांची प्रचंड चर्चा झाली. फेसबुक, इन्टाग्राम, यूट्यूबसारख्या माध्यमांवर या व्हिडीओंनी कोटींनी लाईक्स मिळवले. चला तर मग 2020 या वर्षातील सर्वात व्हायरल व्हिडीओ कोणते होते ते पाहूया.

1) गो कोरोना गो 

कोरोना महामारीचे सावट असताना मागील वर्षी सगळे गोंधळून गेले होते. अफवांचं जणू पेव फुटलं होतं. कुठल्यातरी वनस्पतींचा काढा करुन पिल्याने कोरोना होत नाही, किंव नेहमी गरम पाणी पिल्यामुळे कोरोना विषाणू मरतो, असे अनेक प्रकराचे सल्ले या काळात दिले जाऊ लागले. कधी एकदाचा कोरोना निघून जातो अशी प्रत्येकाची मनस्थिती झाली होती. जो-तो आपापल्या परीने कोरोना महामारी संपण्यासाठी प्रार्थना करत होते. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीसुद्धा ‘गो कोरोना गो’ असे म्हणत जगावरील कोरोना संकट टळावे अशी प्रार्थना केली. त्यांचा हाच व्हिडीओ नंतर सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. लॉकडाऊनच्या काळात हा व्हिडीओ अतीशय आवडीने पाहिला गेला. यूट्यूब, फेसबूकवर तर या व्हिडीओला कोटींनी लाईक्स मिळाले. नंतर त्यांचा या ‘गो कोरोना गो’ ला घेऊन नेटवेड्यांनी हजारोंनी मिम्स बनवले. तर कुणी विनोदबुद्धी वापरून आठवलेंच्या ‘गो कोरोना गो’ या डायलॉगला घेऊन हजारोंच्या संख्येने विनोद निर्माण केले. 2020 या वर्षातला हा सर्वात व्हायरल आणि चर्चेत राहणार व्हिडीओ ठरला.

2) रसोडेमें कौन था?

मागच्या वर्षी रसोडेमे कोन था? हा प्रश्न तुम्ही स्व:तला किंवा तुमच्या मित्राला नक्कीच विचारला असेल. हा डायलॉग फेमस होण्यामागे संगीत निर्माता यशराज मुखाते या तरुणाची विनोदबुद्धी आहे. त्याने साथ निभाना साथिया या हिंदी मालिकेतील 56 सेकंदांची क्लीप घेऊन, त्यातून संगीत निर्माण केलं. या क्लीपमध्ये कोकिलाबेन गोपीबहूला रागवत असते. कोकिलाबेन गोपीबहूला स्वयंपाक घरात कोण होतं?, हे विचारताना यशराज मुखातेला या संवादातून विनोद निर्माण करण्याची कल्पना सूचली आणि त्याने कोकिलाबेन आणि गोपी बहू यांच्यातील संवादापासून रॅप साँग निर्माण केलं. फक्त 56 सेकंदांच्या या रॅप म्यूझिकने नंतर सोशल मीडियावर प्रचंड धुमाकूळ माजवला. खुद्द यशराज मुखातेनेसुद्धा कल्पना केली नसेल एवढी प्रसिद्धी मुखातेच्या या व्हिडीओला मिळाली. नंतर भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी हेच डायलॉग डिबेट शोमध्ये वापरले. तर स्मृती ईराणी यांनी रसोडे मे कौन था?, म्हणत एक राजकीय मीम शेअर केलं. मागच्या वर्षी रसोडे मे कौन था? हा डायलॉग आणि य़शराज मुखातेने संगीतबद्ध केलेला 56 सेकंदांचा व्हिहीओ चांगलाच चर्चेत राहिला.

3) बाबा का ढाबा

कोरोना महामारीमुळे कित्याकांचे रोजगार गेले. कित्येकांच्या जगण्याचा प्रश्न गंभीर होऊन बसला. या सर्व धांदलीमध्ये कोरोनामुळे पुरेसे पैसे मिळत नसल्यामुळे चरितार्थाचा प्रश्न निर्माण झालेले ‘बाबा का ढाबा’वाले कांताप्रसाद हे मागच्या वर्षी चांगलेच चर्चेत राहिले. कोरोनामुळे ग्राहक येत नसल्यामुळे लोकांना जेवण, चहा तयार करुन तो विकणाऱ्या कांताप्रसाद यांची कमाई होत नसल्याचे यूट्यूबर गौरव वसान याला मसजले. त्यांने कांताप्रसाद यांच्या हलाखीच्या परिस्थितीला कॅमेऱ्यात कैद करुन तो शोशल मीडियावर शेअर केला. तसेच, कांताप्रसाद यांना मदत करण्याचे त्याने आवाहन केले. गौरवच्या आवाहनला चांगला प्रतिसाद मिळाला. मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात व्हायरल झालेल्या या व्हिडीओमुळे कांताप्रसाद यांचं राहणीमान, जगण्याचा स्तर बदलला. हा व्हिडीओदेखील मागच्या वर्षी चांगलाच चर्चेत राहीला. नंतर मात्र, कांताप्रसाद यांनी यूट्यूबर गौरवने पैशांची गफलत केल्याचा आरोप केला असला तरी, या कांताप्रसाद यांच्या व्हिडीओने सोशल मीडियाच्या माध्यमातून काही सकारात्मक गोष्टी घडू शकतात असा संदेश नक्कीच दिला.

४) पीपीई कीटमध्ये डॉक्टरचा डान्स

कोरोनाकाळात डॉक्टारांनी जीवाचे रान करुन लाखो लोकांचे प्राण वाचवले. कोरोना विषाणूबद्दल अनेक गैरसमज असताना डॉक्टरांनी मोठ्या हिमतीने कोरोनाग्रस्तांवर उपचार केला. तसेच काही डॉक्टरांनी कोरोनाला घाबरून न जाता योग्य काळजी घेण्याचे आवाहन करत जनजागृती केली. त्यासाठी काही डॉक्टर्सने तर चक्क पीपीई कीट परिधान केलेली असताना कोव्हीड वॉर्डमध्ये डान्स करतानाचे विडीओ स्व:तच्या सोशल मीडिया अकाऊन्ट टाकले. हे व्हिडीओ शेअर करत त्यांनी कोरोनाला न घाबरण्याचे आवाहन केले. त्यातील काही डॉक्टांचे व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाले. डॉ. अरुप सेनापती यांनी शेअर केलेला व्हिडीओसुद्धा असाच प्रसिद्ध झाला. त्यांच्या या व्हिडीओला ट्विटरवर तब्बल 5.6 मिलीयन व्ह्यूज आले. अभिनेता ऋतिक रोशन आणि अभिनेत्री माधुरी दीक्षितसारख्या सिनेकलाकारांनी सेनापतींचा डान्स आणि त्यांच्या कामाबद्दलच्या समर्पणवृत्तीबदल आदर व्यक्त केला. हा व्हिडीओ 2020 मध्ये चांगलाच व्हायरल झाला होता.

5) जोतिरादित्य सिंधिया यांची टंग स्लीपिंग

मध्यप्रदेशमधील पूर्वीचे काँग्रेसचे दिग्गज नेते आणि सध्या भाजपवासी झालेले जोतिरादित्य सिंधिया यांचा मध्य प्रदेशच्या विधानसभा पोटनिवडणुकीदरम्यानचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला. जोतीरादित्य सिंधिया यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला होता. यावेळी मध्य प्रदेशमध्ये विधानसभेच्या पोटनिवडणुका लागल्या होत्या. भाजपकडून मोठ्या-मोठ्या सभा घेतल्या जात होत्या. यावेळी भाजपला मतदान करा असे आवाहन करताना त्यांची जीभ स्लीप झाली होती. भाजपला मतदान करा असं म्हणण्याऐवजी ते ‘हाथ के पंजेवला बटन दबेगा’ असे म्हणाले होते. ऐन निवडणुकीच्या वेळी भर सभेत असा प्रकार घडल्यामुळे यावेळी सिंधिया यांचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता. त्यांच्या या व्हिडीओला लाखोंनी लाईक आणि शेअर करण्यात आलं. सिंधिया यांनी मार्च 2020 मध्ये काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला होता.

6) लीटल सोल्जर

देशाच्या संरक्षणासाठी सीमेवर तैनात असलेल्या सैनिकांविषयी प्रत्येकालाच आदर असतो. मात्र, इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलिसांना (ITBP) सलामी देताना नवांग नामग्याल या पाच वर्षीय मुलाचा व्हिडीओ मात्र चांगलाच चर्चेत राहीला. हा व्हिडीओ आयटीबीपीच्या जवानांनी रेकॉर्ड केला होता. यामध्ये पाच वर्षीय नामग्याल जवानांना सलामी करताना दिसतोय. हा व्हिडीओ शोशल मीडियावर आल्यानंतर तो प्रचंड व्हायरल झाला. नंतर इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलिसांनी नवांग नामग्यालच्या समर्पणवृत्तीला बघून त्याला जवांनाचे कपडे दिले. हा व्हिडीओसुद्धा 2020 मध्ये चांगलाच व्हायरल झाला.

7) चोरट्यांशी दोन हात

पंजाबमध्ये धाडसी लोकांची कमी नाही. मात्र, पंजाबमधील 15 वर्षीय कुसुम कुमारी चेन चोरांशी दोन हात करतानाचा व्हिडीओ 2020 मध्ये चांगलाच व्हायरल झाला होता. सप्टेंबर 2020 मध्ये हा व्हिडीओ सोशल मीडियावर आला होता. कुसुमच्या वडिलांनी घेऊन दिलेला मोबाईल फोन हिसकाऊन चेनचोर पळून जात होते. मात्र, त्यातील एकाला कुसुमने पकडत त्याचा हिमतीने प्रतिकार केला. चोराने तिच्यावर धारदार शस्त्राने वार करुनही तिने त्या चोराला सोडले नाही. हा सर्व थरार एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. नंतर हे व्हिडीओ फुटेज सोशल मीडियावर आल्यानंतर काही क्षणांतच कुसुमच्या शौर्याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता. नंतर पंजाबमधील स्थानिक नेत्यांनी तिच्या पराक्रमाची दखल घेत तिला सन्मानित केलं होतं.

8) भारतीय मुलाकडून ऑस्ट्रेलीयन मुलीला प्रपोज

असे म्हणतात की प्रेमाला जात, धर्म आणि सीमा नसते. 2020 या वर्षात अशीच एक प्रेमकहीनी चांगलीच गाजली. नोव्हेंबर 2020 मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलीयादरम्यानचा एकदिवसीय सामना बघायला आलेला भारतीय मुलगा आणि एका ऑस्ट्रेलीयन मुलीचे प्रेम जुळून आले. मुलाने थेट स्टेटीयममध्येच ऑस्ट्रेलीयन मुलीला लग्नासाठी विचारले. हे दोघेही आधीपासूनच मित्र होते. हा सर्व प्रकार पाहून मुलगी भारावली आणि तिनेही त्या मुलासोबत लग्न करण्यास होकार दिला. हा सामना भारत हारला होता. मात्र, सोशल मीडियावर क्रिकेटच्या सामन्याची कमी आणि या कपलच्या प्रेमाचीच चर्चा जास्त रंगली होती. मुलाने लग्नासाठी विचारतानाचा हा व्हिडीओ नंतर अतिशय व्हायरल झाला.

9) पंजाबी मुलाचा बहरदार भांगडा

कोरोनाकाळात सगळ्यांच्या जीवनात एक संथपणा आला होता. मात्र विनेश कटारिया यांनी ट्विटरवर पोस्ट केलेल्या एका मुलाचा भांगडा डान्स सर्वांना उर्जा देऊन गेला. या व्हिडीओमध्ये छोटा पंजाबी मुलगा दोन कुत्र्यांच्या समोर दिलखुलासपणे भांगडा करताना दिसत आहे. त्याचा हा डान्स पाण्यासाठी कुत्रेसुद्धा आसुसल्याचं दिसत आहे. विनेश यांनी त्यांच्या अकाउंटवरुन ट्विट केलेला हा व्हिडीओ नंतर वर्षभर चर्चेत राहिला. त्यांनी टाकलेल्या या व्हिडीओला प्रचंड लाईक्स, आणि रिट्विट मिळाले होते.

10) एक चतूर नार गाण्यावर क्वॉरन्टाईन सेंटरमध्ये डान्स

कोरोनाकाळात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे कित्येकांची धांदल उडाली. प्रवासादरम्यान अनेकांना क्वॉरन्टाईन करण्यात आलं. तर काही जणांना खबरदारी म्हणून क्वॉरन्टाईन सेन्टरमध्ये ठेवलं होत. बिहारमधील क्वॉरन्टाईन सेंटरमध्ये एका माणसाने पडोसन या चित्रपटातील ‘एक चतूर नार करके सिंगार’ या गीतावर केलेला डान्स या काळात चांगलाच व्हायरल झाला. या व्हिडीओमध्ये माणूस धोतर आणि बनीयन असा वेश परिधान करुन अभिनेता महमुद यांची नक्कल करतोय. या माणसाने केलेला डान्ससुद्धा 2020 या वर्षात चांगलाच व्हायरल झाला.

संबंधित बातम्या :

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.