Special Story : तांडव, आश्रम वेबसिरीजला वादाची किनार, वाचा स्पेशल रिपोर्ट….

. ओटीटी प्लॅटफॉर्मवर एकापेक्षा एक वेबसिरीज आणि चित्रपट रिलीज होत आहेत. मात्र गेल्या काही दिवसांत काही वेब सीरिज वादाच्या भोवऱ्यात अडकल्या आहेत.(Tandav, Ashram webseries on the edge of controversy)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 6:00 AM, 5 Mar 2021
Special Story : तांडव, आश्रम वेबसिरीजला वादाची किनार, वाचा स्पेशल रिपोर्ट....

मुंबई : लॉकडाऊननंतर प्रत्येकजण चित्रपट किंवा मालिका पाहण्यासाठी ओटीटी प्लॅटफॉर्मकडे वळले आहेत. ओटीटी प्लॅटफॉर्मवर एकापेक्षा एक वेबसिरीज आणि चित्रपट रिलीज होत आहेत. याला प्रेक्षकांचाही प्रचंड प्रतिसाद मिळतोय, पण गेल्या काही दिवसांत काही वेब सीरिज वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. या वादांमुळे अनेकदा निर्मात्यांना काही सिन्स काढावे लागतात. सोशल मीडियावर बर्‍याच वेब सीरिजवर बंदी घालण्याचीही मागणी आहे. आज आम्ही अशा वेब सिरीजबद्दल सांगणार आहोत ज्यावर बंदी येऊ शकते.

तांडव

tandav web series

सैफ अली खानची वेब सिरीज तांडव या वेळी वादात अडकलेली आहे. या वादात निर्मात्यांना व अभिनेतांना अटकेपासून अंतरिम सवलत देण्यास सुप्रीम कोर्टानंही नकार दिला आहे. या सिरीजमध्ये धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला आहे. ही मालिका नुकतीच अ‍ॅमेझॉन प्राइमवर रिलीज झाली आहे. ज्यावर बंदी घालण्याची मागणीही केली जात आहे.

मिर्झापूरः

mirzapur

पंकज त्रिपाठी, अली फजल आणि दिव्येंदू शर्मा यांच्या मिर्झापूर या वेब सिरीजच्या पहिल्या आणि दुसर्‍या दोन्ही सीझनला प्रेक्षकांनी पसंती दिली आहे. मात्र आता या सिरीजसंदर्भातही वाद सुरू झाला आहे. काही काळापूर्वी मिर्झापूरमध्ये या सिरीजविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी कारवाईत केली आणि या प्रकरणातील तपास सुरू करण्यासाठी मुंबईकडे रवाना झाले. अलाहाबाद उच्च न्यायालयानं या दोन निर्मात्यांना अटक करण्यास मनाई केल्यानं सुनावणीनंतर आता याप्रकरणी एफआयआर नोंदवणाऱ्या पक्षाकडे आणि राज्य सरकारकडे जाब मागीतला आहे.

आश्रम

web series ashram

आश्रम या वेब सिरीजच्या दुसर्‍या सीझनच्या रिलीजपूर्वी बॉबी देओल आणि प्रकाश झा हे वादाच्या भोवऱ्यात अडकले. या सिरीवर धार्मिक भावना दुखावल्याचा देखील आरोप होता. या सिरीजवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली. मात्र ही वेब सिरीज एमएक्स प्लेयरवर प्रसिद्ध झाली.

संबंधित बातम्या 

Special Story : ओटीटी की थिएटर, निर्मात्यांना अधिक कमाई कशातून ?

Special story | रिलायन्स जिओ, इंडियन ऑईलमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; अर्ज कुठे?, कसा?, करावा