Umaji Naik | शेवटच्या श्वासापर्यंत इंग्रजांविरोधात लढा, आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक यांना मृत्यूने कसं गाठलं?

आपल्या उभ्या हयातीत इंग्रजांविरोधात (British) संघर्ष केला. 3 फेब्रुवारी 1834 रोजी त्यांना फाशी देण्यात आली. इंग्रजांशी संघर्ष करताना सर्वात आधी बलीदान देणारे उमाजी नाईक (Umaji Naik) पहिले क्रांतीकारक होते. म्हणूनच त्यांना आद्य क्रांतीवीर म्हटले जाते.

Umaji Naik | शेवटच्या श्वासापर्यंत इंग्रजांविरोधात लढा, आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक यांना मृत्यूने कसं गाठलं?
UMAJI NAIK (फोटो- फेसबूकवरुन साभार)
Follow us
| Updated on: Feb 03, 2022 | 7:11 AM

मुंबई : आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेक क्रांतीकारकांनी जीवाची बाजी लावली. काही क्रांतीकारी हसत हसत फासावर चढले तर काही धाडसी तरुणांनी आपले पूर्ण जीवण अंधाऱ्या कोठडीत काढले. उमाजी नाईक हेदेखील त्यापैकीच एक होत. त्यांनी आपल्या उभ्या हयातीत इंग्रजांविरोधात (British) संघर्ष केला. 3 फेब्रुवारी 1834 रोजी त्यांना फाशी देण्यात आली. इंग्रजांशी संघर्ष करताना बलीदान देणारे उमाजी नाईक (Umaji Naik) पहिले क्रांतीकारक होते. म्हणूनच त्यांना आद्यक्रांतीवीर म्हटले जाते. त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांच्या कार्याविषयी जाणून घेऊया. पेशवाई बुडाल्यानंतर देशावर इंग्राजांचे राज्य सुरु झाले. उमाजी नाईक यांनी याच इंग्रजी सत्तेविरोधात बंड पुकारले. छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांनी इंग्रजांविरोधात लढा दिला.

वडील पुरंदर किल्ल्याचे राखणदार

उमाजी नाईक यांचा जन्म 7 सप्टेंबर 1791 रोजी पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील भिवडी या गावी झाला. उमाजी नाईक यांचे वडील दादाजी खोमणे हे लढाऊ आणि झुंजार होते. पुरंदर किल्ल्याचे रखवालदार म्हणून त्यांनी काम केले. आपल्या वडिलांकडून उमाजी नाईक यांनी गोफण चालविणे, तीरकमठा मारणे, कुऱ्हाड चालवणे, दांडपट्टा, भाला फेकणे आदी युद्धावेळी कामाला येणारी कौशल्ये शिकून घेतली. वयाच्या 11 व्या वर्षी उमाची नाईक यांच्याकडे वंशपरंपरेने वतनदारी आली. उमाजी नाईक खंडोबाचे भक्त होते. आपल्या पत्रावर ते ‘खंडोबा प्रसन्न’ असं लिहायचे.

अन् इंग्रजी सत्तेविरोधात बंड पुकारले

रामोशी समाजाकडे पुरंदर किल्ल्याचे रक्षण करण्याचे काम होते. मात्र 1803 मध्ये इंग्रजांनी रामोशी समाजाकडून हे काम काढून घेतले. इंग्रजांच्या या निर्णयामुळे पुरंदरमधील रामोशी समाजावर उपासमारीची वेळ आली होती. महिला, मुलांना अन्न मिळेनासे झाले होते. त्यामुळे उमाजी नाईक यांनी शिवरायांना स्फूर्तीस्थान मानत लोकांना गोळा करणे सुरु केले. त्यांनी कृष्ण नाईक, खुशाबा रामोशी, बाबू सोळंसकर तसेच विठुजी नाईक अशा तरुणांना गोळा केले. तसेच या साथीदारांच्या मदतीने उमाजी नाईक यांनी इंग्रजांविरोधात बंड पुकारले होते. यानंतर उमाजी नाईक आणि इंग्रज यांच्यात संघर्ष सुरु झाला.

तुरुंगवासादरम्यान लिहणे, वाचणे शिकून घेतले 

पुढे उमाजी नाईक इंग्रज, वतनदार तसेच सावकारांना लुटायचे. लुटलेले धन तसेच अन्न गरीब लोकांमध्ये वाटायचे. महिला, मुलांना मदत करायचे. कोणावर अत्याचार झालाच मदतीसाठी धावून जायचे. पुढे उमाजी नाईक यांच्या कारवाया वाढल्या आणि इंग्रजांना उमाजी नाईक यांचा त्रास होऊ लागला. 1818 मध्ये उमाजी यांना एका वर्षाचा तुरुंगवास झाला. त्यानंतर आणखी एका दरोड्यात त्यांना पकडण्यात आले. यावेळी त्यांना सात वर्षाची शिक्षा झाली होती. या काळात त्यांनी लिहणे आणि वाचणे शिकून घेतले होते.

उमाजी नाईक यांना पकडण्यासाठी इंग्रजांनी बक्षीस जाहीर केले 

पुढे उमाजी नाईक यांचा इंग्रजांविरोधातील संघर्ष वाढत गेला. उमाजी नाईक यांनी इंग्रजांना सळो की पळो करुन टाकले. त्यानंतर इंग्रजांनी उमाजी नाईक यांना पकडण्यासाठी वेगवेगळे इनाम जाहीर केले. दोन ते तीन वेळा इंग्रजांनी उमाजी यांना पकडण्यासाठी बक्षीस जाहीर केलेले होते. तसेच उमाजी यांना पकडण्यासाठी इंग्रजांनी ॲलेक्झांडर मॅकिंटॉश या अधिकाऱ्याची नियुक्ती केली होती. पुढे पुण्याचा कलेक्टर जॉर्ज गिबर्न याने 26 जानेवारी 1831 रोजी जाहीरनामा प्रसिद्ध करुन उमाजी नाईक यांच्याविरोधात जो तक्रार देईल त्याला आकर्षक असे बक्षीस देण्याचे जाहीर केले. मात्र या प्रलोभनाला कोणीही बळी पडले नाही. उमाजी यांच्याविरोधात कोणीही तक्रार दिली नाही.

3 फेब्रुवारी 1834 रोजी उमाजी नाईक यांना फाशी

त्यानंतर इंग्रजांच्या या जाहीरमानाम्याला उत्तर म्हणून उमाजी नाईक यांनी 16 फेब्रुवारी 1831 रोजी स्वत:चा जाहीरनामा जारी केला. उमाजी नाईक तसेच त्यांच्या साथीदारांनी कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे, मराठावाडा या भागात आपली ताकद दाखवून दिली होती. इंग्रजांनी 8 ऑगस्ट 1831 रोजी उमाजी यांना पकडून देणाऱ्यास 10 हजार रुपयांचे बक्षीस तसेच 400 बिघे जमीन देण्यासे जाहीर केले. त्यानंतर 3 फेब्रुवारी 1834 रोजी उमाजी नाईक यांना फाशी देण्यात आली. इंग्रजी सत्तेविरोधात बंड करणारे ते आद्य क्रांतीकरक होते.

(टीप- वरील माहिती मराठी विश्वकोश तसेच रामोशी डॉट कॉम या संकेतस्थळांवरुन घेतली आहे.)

इतर बातम्या :

तुम्ही वापरत असलेल्या सेफ्टी पिनचा इतिहास माहितीय काय, जाणून घ्या ही मजेशीर गोष्ट…

PHOTO | जगातील सर्वात मोठ्या क्रूझचा प्रवास झालाय सुरू, हे क्रुझ नाही तर आहे समुद्रावर वसलेले शहर!

Asteroid : 11 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या अंतराळातील बदलामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण, पृथ्वीवर या घटनेचा असा होईल परिणाम!

Non Stop LIVE Update
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?.
तेव्हा फडणवीसांना नमस्कार घालायला सुद्धा माणूस नसेल, कुणी केली टीका?
तेव्हा फडणवीसांना नमस्कार घालायला सुद्धा माणूस नसेल, कुणी केली टीका?.
एकेकाळी शरद पवार माझे दैवत होते, पण आता...दादांच्या वक्तव्यावरून चर्चा
एकेकाळी शरद पवार माझे दैवत होते, पण आता...दादांच्या वक्तव्यावरून चर्चा.
शिरसाटांकडून लाव रे तो व्हिडीओ, खैरेंच्या 'नमाज'च्या वक्तव्यावरून वाद
शिरसाटांकडून लाव रे तो व्हिडीओ, खैरेंच्या 'नमाज'च्या वक्तव्यावरून वाद.
बाळासाहेब ठाकरेंवर बोलताना भावूक, मोदींची 2024 मधील TV9 वर महामुलाखत
बाळासाहेब ठाकरेंवर बोलताना भावूक, मोदींची 2024 मधील TV9 वर महामुलाखत.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेचं तिकीट पण शांतीगिरी महाराज खेळ बिघडवणार?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेचं तिकीट पण शांतीगिरी महाराज खेळ बिघडवणार?.
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?.
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?.