world braille day 2022 | कोण होते लुई ब्रेल ज्यांनी स्वत: अंध असतानाही जगभरातल्या अंधांसाठी ‘डोळस’ कामगिरी केली?

world braille day 2022 | कोण होते लुई ब्रेल ज्यांनी स्वत: अंध असतानाही जगभरातल्या अंधांसाठी 'डोळस' कामगिरी केली?
lui brel

पूर्वी अंध लोकांना काहीही दिसत नसल्यामुळे शिक्षण घेता येत नसे. मात्र त्यांच्या अंधकारमय जीनवात ब्रेल लिपीमुळे प्रकाश पडला. ब्रेल लिपीमुळेच अंध माणसे डोळस होऊ लागली. ही ब्रेल लिपी विकसित करणारे लुई ब्रेल यांची आज जयंती. त्यांचा जन्मदिवस संपूर्ण गजात विश्व ब्रेल दिवस म्हणून साजरा केला जातो.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: prajwal dhage

Jan 04, 2022 | 7:06 AM

मुंबई : दृष्टी असेल तर या जगाचं सौंदर्य अनुभवता येतं. मात्र जी लोक अंध आहेत त्यांचं काय ? पूर्वी अंध लोकांना काहीही दिसत नसल्यामुळे शिक्षण घेता येत नसे. मात्र त्यांच्या अंधकारमय जीनवात ब्रेल लिपीमुळे प्रकाश पडला. ब्रेल लिपीमुळेच अंध माणसे डोळस होऊ लागली. ही ब्रेल लिपी विकसित करणारे लुई ब्रेल यांची आज जयंती. त्यांचा जन्मदिवस संपूर्ण गजात विश्व ब्रेल दिवस म्हणून साजरा केला जातो.

वयाच्या तिसऱ्या वर्षी डोळे गमावले

लुई ब्रेल हे मूळचे फ्रान्स देशाचे नागरिक होते. त्यांनी ब्रेल लीपी विकसित करुन अंध लोकांना साक्षर करण्याचं मोठं काम केलं. आपल्या जीवनाचा मोठा वेळ त्यांनी ब्रेल लीपी विकसित करण्यासाठी दिला. त्यांच्या या कामामुळेच आज लाखो अंध लोक डोळस बनले आहेत. लुई ब्रेल यांचा जन्म 4 जानेवारी 1809 मध्ये फ्रान्स देशात झाला. वयाच्या तिसऱ्या वर्षीच त्यांच्यासोबत एक दुर्घटना घडली. याच अपघातात त्यांची दृष्टी गेली. मात्र डोळ्याने ते अंध असले तरी त्यांची बुद्धी तल्लख होती. परीक्षेमध्ये ते कायमच चांगली कामगिरी करायचे. त्यांनी अथक परिश्रम आणि जिद्दीच्या जोरावर रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ ब्लाईंड यूथ येथे पुढील शिक्षण घेतले. येथे शिक्षण घेत असतानाच त्यांनी अंध मुलांना वाचण्यासाठी एक स्पेसल कोड विकसित केला होता. याच कोडला नंतर ब्रेल लीपी म्हणून ओळखले जाऊ लागले.

कॅप्टन बार्बियर यांची भेट, नंतर ब्रेल लीपीचा विकास

आपल्या शालेय जीवनात लुई ब्रेल यांची भेट कॅप्टन चार्ल्स बार्बियर यांच्याशी झाली. त्यांनी सैनिकांना रात्रीच्या अंधारात संदेश वाचण्यासाठी क्रिप्टोग्राफीचा विकास केला होता. याच क्रिप्टोग्राफी लिपीच्या मदतीने रात्रीच्या अंधारात सैनिकांना संदेशाचे वाचन करता येत असे. कॅप्टन चार्ल्स यांच्याकडून प्रेरणा घेऊन नंतर ब्रेल यांनी नव्या भाषेचा शोध लावला. यावेळी त्यांचे वय अवघे 16 वर्षे होते. लुई ब्रेल यांनी सहा बिंदुंचा वापर करत 64 अक्षरं आणि चिन्हांचा शोध लावला. यामध्ये त्यांनी विराम चिन्हा, अक्षर, संख्या तसेच संगिताचे नोटेशन्स लिहण्यासाठीदेखील महत्त्वाचे चिन्ह दिले. ब्रेल यांच्या याच लिपीला नंतर ब्रेल लिपी म्हणून ओळखले जाऊ लागले.

मृत्यू झाल्यानंतर लोकांनी घेतली दखल

लुई ब्रेल यांना जास्त आयुष्य लाभलं नाही. वयाच्या 43 वर्षी 6 जानेवारी 1832 रोजी त्यांचे निधन झाले. मृत्यूच्या तब्बल सोळा वर्षानंतर त्यांच्या कामाचा सम्नान केला गेला. त्यांच्या या लिपला 1868 साली मान्यता मिळाली. आज ही भाषा संपूर्ण जगात वापरली जाते. 2009 साली लुई ब्रेल यांच्या जन्माला दोनशे वर्षे पूर्ण झाले होते. यावेळी भारत सरकारने त्यांच्या नावाचे खास तिकीट प्रकाशित केले होते.

इतर बातम्या :

VIDEO: मुंबई बँकेवर प्रवीण दरेकरांचंच वर्चस्व, आधी 17 जागा जिंकल्या; आता…

Retirement Rights Day | चला, जाणून घेऊयात, निवृत्ती वेतनधारकांचे हक्क आणि अधिकार…!

16 December | Ind-Pak | युद्धभूमीतून पळ काढत शरणागती पत्करणाऱ्या पाकिस्तानचा लाचार जनरल नियाजीची गोष्ट!


Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें