काहीही होऊ शकतं… नास्त्रेदमस आणि बाबा वेंगा यांची भूकंपावरच्या भविष्यवाण्या कोणत्या?
यात नास्त्रेदमस आणि बाबा वेंगा यांनी 2025 साठी केलेल्या भूकंपाच्या भविष्यवाण्यांचा आढावा घेण्यात आला आहे. या दोन्ही भविष्यवेत्त्यांनी आपआपल्या काळात अनेक भाकितं केली होती. ती सर्व खरी ठरली आहे. आता त्यांनी भूकंपाबाबतचे भाकीत करून ठेवलं आहे. ते खरं ठरणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

नवी दिल्लीत भूकंपाचा मोठा झटका बसला. त्यामुळे नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. सुदैवाने या भूकंपात कोणताही जीवित हानी झाली नाही. जगभरात रोजच कुठे ना कुठे भूकंप होत असतो. भूगर्भात होणाऱ्या हालचालींमुळे हे भूकंप होत असतात. भूकंप का होतो? याची कारणे संशोधकांना माहीत आहेत. पण भूकंप कधी होणार हे कोणीच सांगू शकत नाही. भूकंपाची अचूक भविष्यवाणी कुणालाही सांगता येत नाही. भूकंप कधी येणार? किती तीव्रतेचा असणार? हे सांगता येत नाही. पण आपल्या अचूक भविष्यवाणीमुळे प्रसिद्ध असलेले बाबा वेंगा आणि नास्त्रेदमस यांनी भूकंपाची अचूक भविष्यवाणी वर्तवली आहे. काही वेळेस या दोन्ही भविष्यवेत्त्यांची भविष्यवाणी खरीही ठरली आहे. या दोघांच्या इतरही भविष्यवाणीवर टाकलेला हा प्रकाश.
नास्त्रेदमस यंनी आपल्या कवितांमध्ये नेहमीच नैसर्गिक आपत्तीबाबत लिहिलं आहे. पृथ्वीचं कंपन होणं आणि नद्यांना उधाण येणं हे शब्द त्यांच्या कवितेत नेहमी येत असतात. हे शब्द म्हणजे त्यांचा इशाराच असल्याचं मानलं जातं. 2025चा संदर्भ पाहता क्लायमेट चेंजचा वाढता प्रभाव म्हणून पाहिलं जातं. एवढंच नव्हे तर समुद्राचा अचानक वाढत असलेला स्तर, वेगाने बर्फ वितळणे आणि वातावरणात वेगाने होणार्या बदलावरून वैज्ञानिकांनीही अनेकदा धोक्याचा इशारा दिला आहे.
जंगलात आग लागणे, दुष्काळ पडणे किंवा प्रलंयकारी महापूर येणे आदी गोष्टींचा नास्त्रेदमस यांच्या पुस्तकात उल्लेख आहे. अशावेळी भूकंप येणे किंवा अचानक ढगफुटी होणे किंवा प्रचंड उकाडा होणे आदी नैसर्गिक संकटाचा संकेत मिळत आहे.
2025 साठी मोठी भविष्यवाणी
- 2025मध्ये जगात भू-राजनैतिक तणाव कायम राहील
- सूडानमध्ये दुष्काळ, मर्यादित मदत आणि मोठ्या प्रमाणावर स्थलांतराचं मानवीय संकट राहील
- सीरियात बशर अल-असदच्या पतनानंतर अनिश्चित काळापर्यंत राजकीय संकट राहील
- जगातील सर्वात शक्तीशाली लोकशाही म्हणजे अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांची दुसऱ्यांदा सत्ता
बाबा वेंगांची भविष्यवाणी
बाबा वेंगा यांनी 2025साठी काही भविष्यवाणी केल्या होत्या. सध्या या भविष्यवाणींची चर्चा खूप आहे. बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीनुसार, यूरोपात विनाशकारी युद्धाची सुरुवात होईल. त्यामुळे महाद्विपातील मोठी लोकसंख्या कमी होईल. बाबा वेंगा यांची भविष्यवाणी खरी मानल्यास 2025मध्ये रशिया पूर्ण जगावर राज्य करेल. रशिया-युक्रेनमधील सुरू असलेल्या युद्धामुळे या प्रकारच्या शक्यतांना अस्थिर मानलं जात आहे. बाबा वेंगा यांनी 2025मध्ये नैसर्गित आपत्ती येणार असल्याचं म्हटलं आहे. त्यांच्या मतानुसार, अमेरिकेच्या पश्चिमी तटावर भूकंप येईल. यावेळी असंख्य निष्क्रीय ज्वालामुखी फुटतील, असं भाकीत बाबा वेंगा यांनी केलंय.
नास्त्रेदमस कोण आहे?
मायकल डी नोस्ट्रेडेम यांना नास्त्रेदमस या नावानेही ओळखलं जातं. ते 16 व्या शतकातील फ्रान्सचे ज्योतिषी होते. त्यांनी वर्तवलेली रहस्यमय भविष्य अनेक शतकांपासून खरी होत आहे. 1555मध्ये त्यांनी लेस प्रोफेटीज नावाचं पुस्तक लिहिलं होतं. त्यात अनेक भविष्यवाणी वर्तवल्या होत्या. यात नेपोलियनचा उदय, विश्व युद्धापासून ते आधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रगतीवरही या पुस्तकात उल्लेख आहे.
बाबा वेंगा कोण आहेत?
बाबा वेंगा ही महिला होती. ती बल्गेरियाची होती. शिवाय अंध होती. अंध असूनही बाबा वेंगा यांनी वर्तवलेल्या अनेक भविष्यवाण्या खऱ्या ठरल्या आहेत. 9/11 चा हल्ला, राजकुमारी डायनाचा मृत्यू आणि चेरनोबिल अणू संकट आदी अनेक भाकीतं तिनं वर्तवली होती.