Wall Clock Vastu Shastra : या दिशेला घड्याळ टांगाल तर व्हाल कंगाल, कोणती दिशा असते शुभ ?
वास्तूनुसार, घरात घड्याळ लावण्याची योग्य दिशा आणि जागा सांगितली आहे. कारण चुकीच्या ठिकाणी लावलेले घड्याळ तुमच्या वाईट काळाची सुरुवात होऊ शकते. घड्याळ कोणत्या तदिशेला, कोणत्या भिंतीवर लावावे, त्याचा आकार, रंग कसा असावा ते जाणून घ्या, घड्याळ लावण्यासाठी कोणती दिशा अशुभ असते हेही समजून घ्या.

Wall Clock Vastu Shastra : आजकाल, मोबाईल फोन आणि इतर डिजिटल उपकरणांमध्ये किती वाजले हे चेक करण्याची अर्था वेळ पाहण्याची सुविधा असल्याने घड्याळांचे महत्त्व कमी होत चालले आहे. पूर्वी घड्याळे ही वेळ बघण्याची मुख्य साधन होती, परंतु आता या घडाळ्यांकडे फॅशन ॲक्सेसरी किंवा स्टेटस सिम्बॉल म्हणून जास्त पाहिले जाते. पण काळ कितीही बदलला तरी आपल्या घरात भिंतींवर लावलेले घड्याळ सौंदर्य तर वाढवचंच पण कधीच आऊटडेटेडही होत नाही. वास्तुशास्त्रात वेळ सांगणाऱ्या घड्याळाला विशेष महत्त्व देण्यात आले आहे.
वास्तूनुसार, घरात घड्याळ लावण्याची योग्य दिशा आणि जागा सांगितली आहे. कारण चुकीच्या ठिकाणी लावलेले घड्याळ तुमच्या वाईट काळाची सुरुवात होऊ शकते. विशेषतः, एक अशी दिशा आहे जिथे कोणीच चुकूनही घड्याळ लावू नये, अन्यथा वाईट दिवस सुरू होण्यास वेळ लागत नाही. एवढंच नव्हे तर त्यामुळे बरंच नुकसानही होऊ शकतं. घड्याळांविषयी वास्तुशास्त्र काय म्हणते ते जाणून घेऊया.
घड्याळ लावण्याची योग्य दिशा घ्या जाणून :
घड्याळाची दिशा –
वास्तुशास्त्रानुसार, उत्तर, पूर्व आणि पश्चिम दिशेला घड्याळ ठेवणे शुभ मानले जाते. पण, दक्षिण दिशेला घड्याळ लावणे चांगले मानले जात नाही. या दिशेला घड्याळ लावल्यास आर्थिक समस्या निर्माण होऊ लागतात. तसेच, हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की जेव्हा पूर्व आणि उत्तर दिशांना जागा नसते तेव्हाच पश्चिम दिशेला घड्याळ लावावे.
घड्याळ कुठे लावू नये ?
घराच्या प्रवेशद्वारावर किंवा आपण घरात जिथून प्रवेश करतो, त्या ठिकाणी घड्याळ लावणे योग्य नाही. घराच्या प्रवेशद्वारावर किंवा घराच्या कोणत्याही दाराच्या वर घड्याळ लावले जात नाही. बेडजवळ किंवा बेडच्या वर भिंतीवर घड्याळ लावणे देखील चांगले मानले जात नाही.
घड्याळाचा रंग कोणता असावा ?
ज्योतिषशास्त्र सांगते की, वास्तुनुसार, घराची आर्थिक स्थिती चांगली ठेवणाऱ्या आणि जीवनात समृद्धी आणणाऱ्या घड्याळाचा रंग पांढरा, हलका राखाडी, आकाशी निळा, हलका हिरवा आणि क्रीम असावा. भिंतीवर टांगण्यासाठी धातूच्या रंगाचे घड्याळ देखील निवडता येते.
घड्याळाचा आकार कसा असावा ?
वास्तुशास्त्रानुसार, गोल आकाराचे घड्याळ घरासाठी चांगले असते. म्हणूनच वेगवेगळ्या आकाराचे घड्याळ खरेदी करण्याऐवजी घराच्या भिंतीवर एक सामान्य, चांगलं गोल घड्याळ लावावं.
