AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्वयंपाकघरातून ‘या’ गोष्टी ताबडतोब काढून टाका, अन्यथा वाढू शकतात समस्या

वास्तुशास्त्रात स्वयंपाकघरासाठी अनेक नियम सांगितले आहेत जे पाळल्यास घरात सुख-समृद्धी टिकून राहते. वास्तुशास्त्रानुसार काही गोष्टी स्वयंपाकघरात ठेऊ नयेत. चला जाणून घेऊया याबद्दल.

स्वयंपाकघरातून 'या' गोष्टी ताबडतोब काढून टाका, अन्यथा वाढू शकतात समस्या
kitchen
| Edited By: | Updated on: Sep 14, 2025 | 8:00 PM
Share

स्वयंपाकघर हा घराचा एक महत्त्वाचा भाग आहे. हिंदू धर्मात स्वयंपाकघरात अन्नपूर्णा देवी वास करत असते असे मानले जाते. स्वयंपाकघरात आपण अनेक प्रकारचे चविष्‍ट पदार्थ बनवले जातात. तर हे अन्न आपल्याला शरीरासोबतच आपल्या आत्म्याचेही पोषण करते, म्हणून वास्तूशास्त्र स्वयंपाकघराची दिशा काही गोष्टींचे स्थान तसेच तेथील स्वच्छतेचे विशेष भर देण्यात येते. अशातच वास्तुशास्त्रानुसार आज आम्ही तुम्हाला काही गोष्टींबद्दल सांगणार आहोत ज्या तुमच्या स्वयंपाकघरात ठेवू नयेत. कारण त्यामुळे नकारात्मक ऊर्जा येते आणि घरात गरिबी राहते. तसेच स्वयंपाकघरात या गोष्टी ठेवल्याने तुम्हाला वास्तुदोषाचा सामना करावा लागू शकतो. अशा वेळेस तुम्ही घरातून या गोष्टी ताबडतोब काढून टाकाव्यात.

अशी भांडी ताबडतोब फेकून द्या

तुटलेली किंवा चिर गेलेली भांडी कधीही स्वयंपाकघरात ठेवू नयेत, कारण वास्तुशास्त्रानुसार तुटलेल्या भांड्यांमध्ये अन्न खाल्ल्याने घरात गरिबी येते. अशा वेळेस अशी भांडी ताबडतोब घरातून बाहेर फेकून द्यावीत.

अशा गोष्टी काढून टाका

वास्तुशास्त्रात असे मानले जाते की तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरात खराब झालेले मिक्सर, ओव्हन व इतर कोणतेही इलेक्ट्रिक वस्तू ठेवू नयेत. यामुळे नकारात्मक ऊर्जा निर्माण होते, ज्यामुळे अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागते. अशा वेळेस ही उपकरणे दुरुस्त करावीत किंवा घराबाहेर काढून टाकावीत.

अडचणी वाढू शकतात

अनेकांना शिळे अन्न स्वयंपाकघरात किंवा रेफ्रिजरेटरमध्ये ठेवण्याची सवय असते. परंतु वास्तुशास्त्रात असे करणे पूर्णपणे चुकीचे मानले जाते. यामुळे तुम्हाला आजार आणि तणाव इत्यादी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते.

या गोष्टी ठेवू नका

वास्तुशास्त्रानुसार तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरात कधीही आरसा ठेवू नये, कारण त्यामुळे वास्तुदोष निर्माण होऊ शकतो. यासोबतच स्वयंपाकघरात वापरलेले झाडू किंवा कपडे देखील स्वयंपाकघरात ठेवू नयेत. यामुळे तुम्हाला नकारात्मक परिणाम देखील मिळू शकतात. झाडू नेहमी अशा प्रकारे ठेवा की कोणाचीही नजर त्यावर पडणार नाही. तसेच स्वयंपाकघरात वापरलेले कपडे स्वच्छ ठेवा.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार