AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Adhikmass Vinayak Chaturthi 2023 : अधिकमासातील विनायक चतुर्थीला आहे विशेष महत्त्व, अशा प्रकारे पूजा केल्याने होतील सर्व मनोकामना पुर्ण

आज अधिकमासातील विनायक चतुर्थी आहे. या चतुर्थीला विशेष असे महत्त्व आहे. आज काही धार्मिक उपाय केल्याने भक्तांना बाप्पाचा आशिर्वाद प्राप्त होतो.

Adhikmass Vinayak Chaturthi 2023 : अधिकमासातील विनायक चतुर्थीला आहे विशेष महत्त्व, अशा प्रकारे पूजा केल्याने होतील सर्व मनोकामना पुर्ण
गणपती बाप्पाImage Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Jul 21, 2023 | 11:54 AM
Share

मुंबई : हिंदू दिनदर्शीकेनुसार, चतुर्थी व्रत प्रत्येक महिन्याच्या कृष्ण आणि शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला पाळले जाते. कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्ट चतुर्थी आणि शुक्ल पक्षातील चतुर्थीला विनायक चतुर्थी (Adhikmass Vinayak Chaturthi 2023) म्हणतात. या दिवशी गणपतीच्या पुजनाला विशेष महत्त्व आहे. शुक्रवार, 21 जुलै रोजी श्रावण महिन्याची विनायक चतुर्थी साजरी होणार आहे. श्रावण महिन्यातील पहिली विनायक चतुर्थी ही विशेष मानली जाते. त्याचे महत्त्व आणि पूजेची पद्धत जाणून घेऊया.

विनायक चतुर्थी मुहूर्त

अधिक श्रावण महिन्यातील पहिली विनायक चतुर्थी 21 जुलै रोजी आहे. या दिवशी श्रावण आणि अधिक माससोबत रवियोग देखील तयार होत आहे. शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी 21 जुलै रोजी सकाळी 06:58 वाजता सुरू होईल आणि 22 जुलै रोजी सकाळी 09:26 वाजता समाप्त होईल. पूजेचा मुहूर्त 21 जुलै रोजी सकाळी 11:05 ते दुपारी 01:50 पर्यंत आहे. याशिवाय अमृत सर्वोत्तम मुहूर्त दुपारी 12:27 ते 02:10 पर्यंत आहे. या मुहूर्तावर गणपतीची उपासना केल्याने खूप शुभ फळ मिळते.

पूजा कशी करावी?

श्रावण चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून व्रताचा संकल्प घ्यावा. यानंतर लाकडी चौरंगावर लाल रंगाचे कापड टाकून गणपतीची मूर्ती किंवा फोटो स्थापित करा. त्यानंतर पंचोपचार पद्धतीने गणपतीची पूजा करावी. गणपतीला शेंदूर, कुंकू, रोळी, अक्षत, पान, दुर्वा आणि मोदक अर्पण करा. यानंतर गणेश चालिसा आणि गणेश चतुर्थी व्रत कथा पठण करा. शेवटी विधिवत आरती करावी.

चतुर्थीच्या दिवशी अवश्य करा हे उपाय

  • चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाचा अभिषेक करणे अत्यंत शुभ मानले जाते. चतुर्थीच्या दिवशी गणेशाला अभिषेक केल्यास त्याचे आशीर्वाद लवकर प्राप्त होतात. गणेशाचा अभिषेक झाल्यावर गणपती अथर्वशीर्षाचा पाठ अवश्य करावा.
  • शास्त्रात गणेश यंत्राचे वर्णन अतिशय चमत्कारिक साधन म्हणून केले आहे. चतुर्थीच्या दिवशी त्याची स्थापना विशेष फलदायी असते. घरामध्ये या यंत्राची स्थापना आणि पूजा केल्याने कोणतीही वाईट शक्ती घरात प्रवेश करत नाही.
  • जर तुम्ही बर्याच काळापासून एखाद्या समस्येने त्रस्त असाल तर गणेश चतुर्थीच्या दिवशी हत्तीला हिरवा चारा खाऊ घाला. गणपतीच्या मंदिरात जाऊन त्याची प्रार्थना करा. हत्तीला हिरवा चारा दिल्यास या समस्या लवकर संपतात.
  • पैशाशी संबंधित समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी गणेश चतुर्थीच्या दिवशी स्नानानंतर श्रीगणेशाला गूळ आणि शुद्ध तूप अर्पण करा. यानंतर हा नैवेद्य गायीला खाऊ घाला. या उपायाने पैशाशी संबंधित समस्या दूर होतात.
  • कोणतीही इच्छा पूर्ण करण्यासाठी चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाच्या मंदिरात जा आणि 21 गुळाचे मोदक तयार करा आणि दुर्वासोबत अर्पण करा. असे केल्याने कोणतीही इच्छा लवकर पूर्ण होते.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत