महाकुंभ मेळ्यात स्नान केल्यानंतर देव आणि पितरांना कोणत्या दिशेला अर्घ्य द्यावं? जाणून घ्या
महाकुंभ मेळा दर 12 वर्षांनी चार ठिकाणी भरतो. प्रयागराजमध्ये आता 12 वर्षांनी हा योग जुळून आला आहे. कुंभ मेळ्यात स्नान करण्याचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. इतकंच काय तर स्नान केल्यानंतर पितरं, देव देवतांना अर्घ्य देण्याचं महत्वही अधोरेखित केलं गेलं आहे.

महाकुंभ मेळ्यात दोन शाही स्नान पार पडले आहेत. पौर्णिमा आणि मकर संक्रांतीला शाहीस्नान झालं. आता मौनी अमावस्येला दुसरं अमृत स्नान होणार आहे. कारण मकर संक्रांती, मौनी अमावस्या आणि वसंत पंचमी अमृतस्नानासाठी महत्त्वाचं मानलं गेलं आहे. कुंभ मेळ्यात स्नान केल्यानंतर आध्यात्मिक शुद्धीकरण होतं. तसेच पापांचं प्रायश्चित होतं अशी मान्यता आहे. तसेच पुण्य कर्माची फळं मिळतात. कुंभ मेळ्याला प्राचीन परंपरा आहे. मौनी अमावस्येला पितरांचा पृथ्वीवर वास असतो असं मानलं जातं. त्यामुळे कुंभमेळ्यात स्नान करताना पितरांच्या शांतीसाठी अर्घ्य दिल्यास आपल्याला गती मिळेल. आयुष्यातील अनेक अडचणी दूर होतील. पण अर्घ्य देण्याचे काही नियम आहेत. कसंही कुठेही अर्घ्य देऊन चालत नाही. यासाठी दिशेचं भान ठेवणं गरजेचं आहे. शास्त्रानुसार, पितरांसाठी दक्षिण दिशा समर्पित केली आहे. ही यमाची दिशा मानली जाते. याच कारणास्तवर महाकुंभ स्नान केल्यानंतर दक्षिण दिशेला तोंड करून अर्घ्य द्यावं. यामुळे पितरं शांत होतात. पितरांचं स्मरण करून त्यांना अर्घ्य द्यावं.
देवी देवतांना अर्घ्य देण्याचाही नियम आहे. त्यांची दिशा आहे. शास्त्रानुसार, ईशान्य दिशा ही देवी देवतांसाठी मानली गेली आहे. या दिशेला तोंड करून अर्घ्य देऊ शकता. ईशान दिशा म्हणजेच पूर्व आणि उत्तर दिशेतील कोन… असं केल्यानंतर देवीदेवतांचा आशीर्वाद आपल्याला लाभतो आणि आपली कामंही मार्गस्थ लागतात. त्यामुळे या दिशेला तोंड करून देवीदेवतांचं स्मरण करून अर्घ्य द्यावं.
सूर्य देवांना अर्घ्य देण्याचा नियम आहे. सकाळी स्नान केल्यानंतर सूर्याला अर्घ्य हा पूर्ण दिशेला दिला पाहीजे. पण संध्याकाळ झाली असेल तर सूर्य अस्त होत असलेल्या ठिकाणी म्हणजेच पश्चिमेला अर्घ्य द्यावं.
शिवलिंगावर जल अर्पण करताना काही नियम पाळले पाहीजेत. शिवलिंगासमोर बसल्यानंतर उत्तर दिशेकडून जल अर्पण करावं. तसेच शिवलिंगाची अर्धचंद्राकार प्रदक्षिणा करावी. कोणत्याही स्थितीत शिवलिंगावर वाहिलेल्या पाण्यावरून ओलांडून जाऊन नये. यासाठी अर्धचंद्रकार प्रदक्षिणा घालावी.