AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रखडलेली कामे पूर्ण होत नाहीयेत? विड्याच्या पानांचा ‘हा’ उपाय बदलू शकतो परिस्थिती

विड्याच्या पानांशी संबंधित अनेक धार्मिक आणि वास्तुशास्त्रीय उपाय आजही प्रचलित आहेत. असे मानले जाते की हे उपाय रखडलेली कामे मार्गी लावण्यासाठी, व्यवसायात प्रगती साधण्यासाठी आणि आर्थिक समृद्धी मिळवण्यासाठी मदत करू शकतात. तथापि यश मिळवण्यासाठी प्रयत्न आणि योग्य नियोजनाची आवश्यकता असते. चला तर मग आजच्या लेखात आपण विड्यांच्या पानांचा उपाय जाणून घेऊयात.

रखडलेली कामे पूर्ण होत नाहीयेत? विड्याच्या पानांचा 'हा' उपाय बदलू शकतो परिस्थिती
| Edited By: | Updated on: Jun 13, 2026 | 3:57 PM
Share

आपल्यापैकी अनेकजण त्यांच्या जीवनात खूप मेहनत करतात, पण काही केलं तरी त्यांची कामं पुर्ण होत नाही किंवा रखडली जातात. व्यवसायात अपेक्षित प्रगती होत नाही किंवा घरातील वातावरण सतत तणावपूर्ण राहते. अशा परिस्थितीत लोकं धार्मिक आणि ज्योतिषीय उपायांचा आधार घेतात. हिंदू धर्मात आणि ज्योतिषशास्त्रात विड्याच्या पानाला खूप महत्त्व आहे. भारतीय परंपरेत विड्याचे पान हे केवळ एक सामान्य पान नसून, ते शुभता, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानले जाते. ज्योतिष आणि वास्तुशास्त्रामध्येही विड्याच्या पानाला विशेष महत्त्व दिले जाते.

असे मानले जाते की याचा संबंध बुध आणि शुक्र या ग्रहांशी आहे, जे बुद्धिमत्ता, संवाद कौशल्य, सुखसोयी आणि आर्थिक समृद्धीचे घटक मानले जातात. यामुळेच विड्याच्या पानांचा समावेश असलेले काही सोपे उपाय लोकांमध्ये फार पूर्वीपासून लोकप्रिय आहेत. धार्मिक श्रद्धेनुसार हे उपाय जीवनात सकारात्मक बदल घडवून आणतात, प्रलंबित कामे पूर्ण करण्यास मदत करतात आणि आर्थिक परिस्थिती मजबूत करतात. चला तर मग आजच्या लेखात आपण तुमची महत्वाची कामे पुर्ण करण्यासाठी विड्याच्या पानांचा उपाय कसा केला जातो ते जाणून घेऊयात.

रखडलेली कामे जलद करण्यासाठी पारंपरिक उपाय:

आयुष्यात अनेकदा असे प्रसंग येतात जेव्हा महत्त्वाची कामे वारंवार रखडतात. मग ते नोकरीसंबंधीचे काम असो, एखादा महत्त्वाचा दस्तऐवज असो किंवा कौटुंबिक निर्णय असो, वारंवार प्रयत्न करूनही अनेकदा यश मिळत नाही. धार्मिक मान्यतेनुसार अशा परिस्थितीत शुक्रवारी किंवा रविवारी विड्याच्या पानाला थोडा पांढरा चुना लावून ते घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ नजरेआड ठेवले जाते. या उपायामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होऊन सकारात्मक वातावरण निर्माण होण्यास मदत होते असा विश्वास आहे. अनेक लोकं एखादे नवीन काम सुरू करण्यापूर्वीही हा उपाय करतात.

व्यवसायाच्या वाढीसाठी विड्याच्या पानांची माळ उत्तम उपाय

जेव्हा व्यवसायात सतत मंदी येते, ग्राहक कमी होऊ लागतात किंवा कामात अडथळे वाढतात, तेव्हा काही लोक विड्याच्या पानांची माळीचा उपायाचा अवलंब करतात. एका आख्यायिकेनुसार प्रत्येक शनिवारी पाच ताजी विड्याची पाने एका धाग्यात ओवून त्यांची माळ बनवली जाते. ही माळ नंतर दुकान कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या पूर्वेकडील बाजूस टांगली जाते. पाने सुकल्यावर, ती आदराने वाहत्या पाण्यात विसर्जित केली जातात आणि गरज पडल्यास नवीन माळ लावली जाते. धार्मिक श्रद्धा असणाऱ्यांचा असा विश्वास आहे की यामुळे व्यवसायात सकारात्मकता वाढते आणि कामाच्या ठिकाणी नवीन संधी निर्माण होतात.

संपत्ती आणि आर्थिक स्थिरतेसाठी उपाय

प्रत्येक कुटुंबासाठी आर्थिक स्थिरता ही एक प्राथमिकता असते. याच कारणास्तव, आर्थिक लाभाशी संबंधित उपायांमध्ये विड्याच्या पानांचा उल्लेख अनेकदा केला जातो. अनेक ठिकाणी शुक्रवारी लक्ष्मी मातेला विड्याच्या पानाला गुलकंद लावून तो पानाचा विडा अर्पण करण्याची परंपरा पाळली जाते. त्यानंतर, दुसऱ्या विड्याच्या पानाच्या गुळगुळीत बाजूला थोडे कुंकू लावून ते तिजोरी, लॉकर किंवा जिथे पैसे ठेवले जातात अशा इतर ठिकाणी ठेवले जाते. धार्मिक श्रद्धेनुसार, हा उपाय आर्थिक समृद्धी आणि लक्ष्मी देवीच्या आशीर्वादाचे प्रतीक मानला जातो.

(डिस्क्लेमर: वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद!
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद! फडणवीसांसमोर मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी...
Manoj Jarange | मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी प्राणाची आहुती देण्याची तयारी
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना...
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना भरावे लागणार शुल्क, व्हिडिओ बघाच
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?