Holi 2022 | जाणून घ्या होळीच्या दिवशी कोणत्या देवतेला कोणता रंग लावावा?

Holi 2022 | जाणून घ्या होळीच्या दिवशी कोणत्या देवतेला कोणता रंग लावावा?
numbrology

फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला (Pornima) होलिका दहन केले जाते आणि त्यानंतर जर त्या दिवशी लोक हा सण (Festival) मोठ्या उत्साहात साजरा करतात.

मृणाल पाटील

|

Mar 18, 2022 | 12:12 PM

मुंबई : फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला (Pornima) होलिका दहन केले जाते आणि त्यानंतर जर त्या दिवशी लोक हा सण (Festival) मोठ्या उत्साहात साजरा करतात. होळीचे हे रंग जीवनातील वेगळ्या उत्साहाचे आणि नव्या उत्साहाचे प्रतीकही मानले जातात . तसे, रंगांचा सण होळीच्या पूजेलाही खूप महत्त्व आहे. धर्मग्रंथात असे म्हटले आहे की हिंदू धर्मात देवांना रंग लावणे खूप चांगले मानले जाते . होळी (Holi) खेळण्यापूर्वी देवतांना रंग वाहिले जातात आणि त्यानंतर रंगांनी होळी खेळावी, अशी प्राचीन काळापासूनची परंपरा आहे.आज होळीच्या उत्साहात रंगाची उधळण होते. प्रत्येक देवी किंवा देवतेला एक रंग अतिशय प्रिय आहे, असे शास्त्रात नमूद केले आहे. असे म्हणतात की असे केल्याने जीवनात सुख-समृद्धी येते, तसेच अनेक आर्थिक समस्यांवरही मात करता येते.

लाल रंग
पुराणात असे मानले जाते की देवी लक्ष्मीला लाल रंग खूप प्रिय आहे. देवी लक्ष्मीला लाल रंग अर्पण केल्याने ती आपल्या भक्तांवर प्रसन्न होते असे शास्त्रात सांगण्यात आले आहे. तसेच त्यांची कृपा भक्तांवर राहते. तुमची इच्छा असेल तर तुम्ही होळी खेळण्यापूर्वी देवी लक्ष्मीला लाल रंगाचे कपडे अर्पण करू शकता. असेही मानले जाते की लाल रंग हा हनुमानाला खूप प्रिय आहे. त्यांनी लाल रंगाच्या बनवलेल्या वस्तूही अर्पण कराव्यात. असे केल्यास तुमच्यावर आर्थिक संकट येणार नाही.

पिवळा रंग
भगवान राम आणि श्रीकृष्ण, ज्यांना विष्णूचे अवतार म्हटले जाते, त्यांना पिवळा रंग खूप आवडतो. जर तुम्ही श्रीकृष्णाला पिवळ्या रंगाचा गुलाल आणि कपडे अर्पण केले तर याने ते खूप प्रसन्न होऊ शकतात. विष्णूच्या या रूपांना पिवळ्या रंगाचा गुलाल लावल्याने जीवनातील अनेक समस्या दूर होतात.

निळा रंग
होळीच्या दिवशी भगवान शंकराला भस्म अर्पण केले जाते. जर तुम्हाला शक्य असेल तर या दिवशी भगवान शंकराला निळ्या रंग अर्पण करा. त्याच प्रमाण भगवान शंकराला निळ्या रंगाच्या वस्तू अर्पण करणे खूप शुभ मानले जाते.

सिंदूर
गणपतीसाठी लाल रंगाचा सिंदूर वापरावा. होळीच्या दिवशी गणपतीला लाल रंगाच्या सिंदूराने सजवावे, असे सांगितले जाते. होळीच्या दिवशी उत्सव साजरा करण्यापूर्वी गणेशजींना लाल रंगाचा सिंदूर अर्पण करणे खूप शुभ आहे. शक्य असल्यास आज लाला रंगाचे कपडे आणि याच रंगाच्या वस्तू दान करा.

(येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांचे हित लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)

संबंधीत बातम्या :

Holi | सिग्‍नल शाळेच्‍या मुलांसोबत कलावंतांनी साजरी केली होळी

Holi | गदर्भस्वारीसाठी जावई सापडला, तुळजापूरच्या जावयाची गाढवावर मिरवणूक

Chanakya Niti : या चार सवयींपासून दूर राहणाऱ्या विद्यार्थ्यासाठी आयुष्यात अशक्य असं काहीच नाही


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें