astrology: 15 डिसेंबरपासून महिनाभर करता येणार नाही कोणतेच शुभकार्य, धनुर्मासाला होणार प्रारंभ

15 डिसेंबरपासून धनुर्मास प्रारंभ होत आहे. या महिन्यात शुभ कार्य करण्यास मनाई करण्यात आली आहे. यामागे काय कारण आहे जाणून घेऊया

astrology: 15 डिसेंबरपासून महिनाभर करता येणार नाही कोणतेच शुभकार्य, धनुर्मासाला होणार प्रारंभ
Follow us
| Updated on: Dec 08, 2022 | 7:43 PM

मुंबई, सूर्य धनु राशित प्रवेश करतो तेथून सुर्य मकर राशीत प्रवेश करतो तोपर्यंतचा काळ हा धनुर्मास (Dhanurmas 2023) म्हणून ओळखला जातो. यास धुंधुरमास असेही म्हणतात. याला धुंधुरमासा बरोबर झुंझुरमास अथवा शून्यमास असेही म्हणतात. असे म्हणतात की दक्षिणायनाचे सहा महिने देवतांची रात्र असते व उत्तराणायचे सहा महिने देवतांचा दिवस असतो आणि हा धुंधुरमास देवतांचा ब्रह्ममुहूर्त म्हणजेच त्यांची पहाट असते.

या मासात लग्नकार्ये, प्रॉपर्टी खरेदी इत्यादी शुभकार्ये करत नाहीत. हा संपूर्ण महिना आपल्या देव देवतांचे प्रती अर्पण असतो.

धार्मिक मान्यतेनुसार यावेळी धर्म, तपस्या आणि उपासनेनुसार मनुष्याची परीक्षा होते. धनुसंक्रांतीच्या प्रदक्षिणा कालावधीत, भक्त सनातन धर्माचे पालन करतात आणि भागवताचा अखंड जप करतात आणि त्यांची आध्यात्मिक साधना तसेच उपासना करतात. याद्वारे भक्तांना आदित्यलोकाची प्राप्ती होते असे मानले जाते.

हे सुद्धा वाचा

कधी सुरु होतोय धनुर्मास?

15 डिसेंबर धनुर्मास प्रारंभ होतोय. महिनाभर म्हणजेच 14 जानेवारी पर्यंत धनुर्मास कायम राहील. त्यानंतर सूर्य मकर राशीत प्रवेश करेल. याला मकर संक्रांत म्हणतात.

धनुर्मासाचे महत्त्व

हिंदू धर्मात पौष महिन्यात  सूर्य उपासनेचे विशेष महत्त्व आहे. या महिन्यात स्नान करून सूर्योदयाच्या वेळी सूर्यदेवाला अर्घ्य दिल्याने प्रत्येक मनोकामना पूर्ण होते अशी धार्मिक मान्यता आहे. शरीर निरोगी होते. शौर्य आणि कुशाग्रता विकसित होते. धनुसंक्रांती पौष महिन्यात येते. म्हणूनच पौष महिन्यात सूर्याच्या उपासनेला विशेष महत्त्व दिले गेले आहे.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Non Stop LIVE Update
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.