AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बाबा वेंगा आणि नास्त्रेदमस यांची 2025 साठी धडकी भरवणारी भविष्यवाणी, नेमकं काय घडणार?

बाबा वेंगा आणि नास्त्रेदमस यांच्या 2025 च्या भविष्यवाण्यांनी जगभर खळबळ उडाली आहे. यूरोपात रक्तरंजित युद्ध, महामारी आणि राजकीय उलथापालथ यांचा त्यांनी उल्लेख केला आहे. पुतिन यांच्या नेतृत्वाखाली रशियाचा उदय आणि एलियन संपर्क हीही भविष्यवाणी आहे. ज्वालामुखीचा स्फोट आणि नैसर्गिक आपत्तींचाही समावेश आहे. या भविष्यवाणी किती खऱ्या ठरतील हे पाहणे महत्त्वाचे आहे.

बाबा वेंगा आणि नास्त्रेदमस यांची 2025 साठी धडकी भरवणारी भविष्यवाणी, नेमकं काय घडणार?
| Edited By: | Updated on: Jan 02, 2025 | 4:42 PM
Share

बाबा वेंगा आणि नास्त्रेदमस हे आजवरचे सर्वात महान भविष्यवेत्ता आहेत. त्यांनी वर्तवलेले अनेक भविष्य खरे ठरले आहेत. नास्त्रेदमस यांनी 500 वर्षापूर्वी काही भविष्य वर्तवले होते. ते आजही खरे ठरताना दिसत आहेत. बाबा वेंगा आणि नास्त्रेदमस यांनी 2025 साठी अत्यंत धक्कादायक भविष्यवाणी वर्तवली आहे. या भविष्यवाणींमुळे संपूर्ण जगाचं लक्ष वेधलं गेलं आहे. यूरोपात होणारं रक्तरंजित युद्ध, घातक महामारी आणि राजकीय उलाढालीवर त्यांनी भविष्यवाणी वर्तवली आहे. बाबा वेंगा यांनी चेर्नोबिल प्रकरण आणि 9/11च्या हल्ल्याची भविष्यवाणी वर्तवली होती. ती खरीही ठरली. तर नास्त्रेदमस यांनी हिटलरचा उदय आणि लंडनमधील आगीची भविष्यवाणी वर्तवली होती, तीही खरी ठरली आहे.

बाबा वेंगा आणि नास्त्रेदमस यांनी 2025च्या यूरोपातील विनाशकारी युद्धाची भविष्यवाणी वर्तवली आहे. बाबा वेंगा यांनी तर तिसऱ्या महायुद्धाचा इशाराच दिला आहे. या युद्धामुळे मानवजातीचं मोठं नुकसान होणार असून असंख्य नागरिकांना पलायन करावं लागणार असल्याचं म्हटलं आहे. नास्त्रेदमस यांनीही यूरोपात क्रूर युद्ध होणार असल्याची भविष्यवाणी करून जगाला सतर्कतेचा इशारा दिला आहे. रशिया आणि युक्रेनच्या दरम्यानच्या युद्धाची भविष्यवाणी तर खतरनाक आहे.

रशियाबाबतची मोठी भविष्यवाणी

युद्धाच्या शिवाय बाबा वेंगा यांनी 2025मध्ये होणाऱ्या एलियनच्या संपर्काची आणि मानसिक यशाची भविष्यवाणी वर्तवली आहे. एलियनचा शोध लागणार असल्याने त्याचा मानवजातीला फायदा होणार की नुकसान हे पाहावं लागणार आहे. राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांच्याबाबतचीही त्यांनी मोठी भविष्यवाणी वर्तवली आहे. लेखक वॅलेन्टिन सिदोरोव यांच्या माहिती प्रमाणे, पुतिन यांच्या नेतृत्वात रशिया एक प्रमुख शक्ती बनेल. टाइम्स ऑफ इस्रायलच्या रिपोर्टनुसार, त्यांनी म्हटलं होतं की, रशियाचा महिमा वाढेल. व्लादिमीर पुतिन जगभर लोकप्रिय होतील.

ज्वालामुखीच्या स्फोटाची भविष्यवाणी

बाबा वेंगा आणि नास्त्रेदमस यांच्या भविष्यवाणीत एक समान सूत्र आहे. दोघांनीही 2025साठी ज्या भविष्यवाणी केल्या आहेत. त्या एक समान आहेत. त्यामुळे या भविष्यवाणी खऱ्या ठरल्या तर काय होईल? असा सवाल केला जात आहे. दोघांनीही यूरोपातील युद्ध आणि त्यामुळे होणाऱ्या जीवितहानीवर भाष्य केलं आहे. एकप्रकारे ही तिसऱ्या महायुद्धाचीच भविष्यवाणी आहे. दक्षिण अमेरिकेतील ज्वालामुखीचा स्फोट आणि ब्राझिलमधील महापूर आदी नैसर्गिक आपत्तींचाही या दोघांनी उल्लेख केला आहे. रशिया आणि युक्रेनमधील संघर्षविरामावरही त्यांनी भाष्य केलं आहे. दोन्ही देशाचं सैन्य थकल्यानंतर युद्ध थांबेल असं कारणही त्यांनी दिलं आहे. मात्र, दोन्ही देशात शांतता राहणार नाही, असा इशाराही दोघांनी दिला आहे.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.