Baba Vanga : घोस्ट मार्च… मृत्यूनंतर दफन करणंही मुश्किल; बाबा वेंगाच्या AI वाल्या खतरनाक भविष्यवाण्या काय आहेत?
Baba Vanga Predictions 2025: बाबा वेंगा या त्यांच्या भाकितांसाठी अतिशय प्रसिद्ध आहेत.आता, चॅट जीपीटीच्या मदतीने, त्यांच्या भाकितांवर आधारित पुढील 100 वर्षांसाठी भाकिते करण्यात आली आणि आश्चर्यकारक उत्तरं मिळाली.

Baba Vanga Predictions : बल्गेरियतील अंध भविष्यवेक्ता बाबा वेंगा यांच्या अनेक भविष्यावाण्या प्रसिद्ध आहेत. 1996साली त्यांचा मृत्यू झाला, मात्र त्यापूर्वी, त्यांनी 5079 सालापर्यंत भाकिते केली होती. त्यांच्या भविष्यवाण्यांमध्ये जागतिक युद्धांपासून ते नैसर्गिक आपत्ती आणि येणाऱ्या भविष्यात होणाऱ्या आश्चर्यकारक तांत्रिक विकासापर्यंत अनेक बाबींचा समावेश आहेत. बाबा वेंगाच्या भविष्यवाण्यांमध्ये एआय तंत्रज्ञानाच्या विकासाचाही समावेश होता.
चॅट जीपीटीने भाकितांची केली कल्पना
Artificial Intelligence च्या जलद विकासामुळे, एक प्रश्न उद्भवतो की जर बाबा वेंगा आज जिवंत असत्या तर त्यांनी पुढील 100 वर्षांसाठी कोणते भाकित केले असते? हे जाणून घेण्यासाठी, चॅट जीपीटीला पुढील १०० वर्षांसाठी बाबा वांगा कोणत्या भाकिते करू शकतात याची कल्पना करण्यास सांगितले होते. त्यानंतर एआयने जी उत्तर दिली ती मनोरंजक तर आहेतच पण भयानकही आहे.
2025 ते 2035 पर्यंत भाकितं ?
2025 मध्ये, तंत्रज्ञानाच्या विकासाचा वेग वाढेल. सर्वत्र कॅमेरे, कृत्रिम बुद्धिमत्तेशी जोडलेली उपकरणे आणि बायोमेट्रिक स्कॅनर असतील. तंत्रज्ञान इतके विकसित होईल की ते आपल्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवेल.
सर्व देशांच्या सरकारांना दहशतवाद आणि गुन्हेगारी रोखण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर करता येईल.
घोस्ट मार्च नावाची एक गुप्त जागतिक चळवळ वेगाने उदयास येईल.
2035 ते 2045 पर्यंत भविष्यवाणी
2035 पर्यंत, जगातील बहुतेक काम यंत्रांद्वारे केले जाईल. कृत्रिम बुद्धिमत्ता एक पाऊल पुढे जाईल. बाबा वेंगा यांच्या मते, जेव्हा यंत्र स्वप्न पाहते तेव्हा ते त्यावर नियंत्रण ठेवण्याचे स्वप्न देखील पाहते.
2045 ते 2060 पर्यंतची भाकितं
2045 साली, जेव्हा हवामान बदल, नैसर्गिक आपत्ती आणि राजकीय अस्थिरतेमुळे सर्वत्र अशांतता असेल, तेव्हा सर्वात श्रीमंत लोक मंगळ ग्रहाकडे स्थलांतर करण्यास सुरुवात करतील. जग नव्याने वसवण्याचे काम मंगळावर केले जाईल. हे पाऊल एक सुटका म्हणून देखील पाहिले जाईल.
2057 पर्यंत, मंगळावर एक कायमस्वरूपी वसाहत स्थापन केली जाईल, जी पूर्णपणे अब्जाधीश आणि तंत्रज्ञानाच्या लोकांच्या नियंत्रणाखाली असेल.
जेनेटिक इंजिनिअरिंग तेथील रहिवाशांना मंगळावर राहण्यासाठी अनुकूल वातावरण प्रदान करेल.
तर पृथ्वीवरील विनाशकारी उष्णतेची लाट, तीव्र पाण्याची कमतरता आणि हवामान बदलामुळे, मोठ्या संख्येने लोक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करतील.
2060 ते 2080 पर्यंतचे भाकित
2060 ते 70 च्या दशकापर्यंत जैविक मृत्यू दिसून येईल. लोकांचे विचार आणि आठवणी डिजिटल स्पेसमध्ये साठवल्या जातील, जिथे ते कायमचे जगू शकतील.
हे डिजिटल आत्मे आजार आणि वृद्धापकाळाशिवाय जगू शकतील, पण स्वातंत्र्याशिवायही जगावं लागेल.
मृत्यूनंतर दफनविधी दुर्मिळ होतील आणि त्यांची जागा सोल सर्व्हर्स घेतील.
2085 ते 2095 पर्यंतची भाकितं
तर 2080 सालं उजाडेपर्यंत लोकांना आभासी जग आवडू लागेल, वास्तविक जगातील शहरे ओसाड होतील. जंगल पुन्हा अस्तित्वात येईल. प्राणी अशा ठिकाणी राहू लागतील जिथे मानव पूर्वी राहत होते.
2095 ते 2125 पर्यंतचे भाकित
2095 सालानंतर, पृथ्वीवर एक विचित्र खगोलीय घटना दिसून येईल. 22 व्या शतकाच्या सुरुवातीला, 33 रात्री आकाशात एक विचित्र सर्पिल दिसेल. हा धूमकेतू किंवा अंतराळयान नसेल.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
