मुंबई : दिवसभराच्या धकाधकीनंतर प्रत्येक व्यक्तीला वाटते की, रात्री बेडवर पडल्यावर शांत झोप लागावी. ही इच्छा पूर्ण करण्यासाठी लोक सहसा आपली बेडरूम चांगली बनवण्याचा प्रयत्न करतात, पण तुम्हाला माहित आहे का की शांत झोपेसाठी फक्त चांगला बेडच नाही तर वास्तुनुसार तुमची बेडरूम देखील खूप महत्त्वाची आहे. जर तुमच्या बेडरूममध्ये वास्तुदोष असेल तर त्यातून निर्माण होणारी नकारात्मक ऊर्जा तुमच्या शांत झोपेवरच नाही तर वैवाहिक जीवनावरही परिणाम करते.