AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Astrology : व्यवसाय, प्रॉपर्टीमध्ये करताय गुंतवणूक, पण कोणत्या दिवशी केल्याने होईल बक्कळ फायदा? जाणून घ्या महत्त्वाचं कारण

Best Day For Investment : गुंतवणूक करायची आहे पण कोणत्या दिवशी.. असे विचार तुमच्या मनात देखील कायम सतावत असतील. पण गुंतवणूक करण्यासाठी देखील काही खास दिवस ठरलेले आहे. याचं मोठं ज्योतिषी कारण देखील आहे. तर व्यवसाय, प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करताना कोणत्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे जाणून घ्या...

Astrology : व्यवसाय, प्रॉपर्टीमध्ये करताय गुंतवणूक, पण कोणत्या दिवशी केल्याने होईल बक्कळ फायदा? जाणून घ्या महत्त्वाचं कारण
Best Day For Investment
| Updated on: Jul 22, 2026 | 9:00 AM
Share

Best Day For Investment : हिंदू परंपरा आणि ज्योतिष शास्त्रमध्ये वेळ आणि दिवसाचं फार मोठं महत्त्व सांगितलं आहे. कोणत्याही नव्या कामाची सुरुवात किंवा मोठी गुंतवणूक सुरु करण्याच्या पूर्वी आपण योग्य वेळ आणि दिवसाची प्रतिक्षा करत असतो. तुम्ही तुमच्या वरिष्ठांना देखील बोलताना ऐकलं असेल की, कोणत्या व्यवसायाची सुरवात करायची असेल तर, बुधवार निवडायचा आणि जमीन – घर खरेदी करायचा असेल तर, प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करायची असेल तर, गुरुवार निवडावा… पण यामागच्या ज्योतिषशास्त्रीय कारणाबद्दल तुम्ही कधी विचार केला आहे का? व्यवसायासाठी बुधवार आणि प्रॉपर्टीमध्ये गुंतवणुकीसाठी गुरुवार हा सर्वोत्तम दिवस का मानला जातो, यामागचं कारण आपण सविस्तर जाणून घेऊ…

बुधवार व्यवसायासाठी का आहे शुभ?

ज्योतिषशास्त्रानुसार, बुधवार हा दिवस बुध ग्रहाशी संबंधित मानला जातो. बुध हा बुद्धिमत्ता, तर्कशक्ती, संवाद, गणिती कौशल्य, व्यापार आणि व्यवसाय यांचा अधिपती म्हणजे सर्वात महत्त्वाचा ग्रह मानला जातो. म्हणूनच, व्यावसायिक गुंतवणुकीसाठी बुधवार हा एक महत्त्वपूर्ण दिवस मानला जातो. व्यवसायातील यश हे प्रामुख्याने योग्य निर्णय घेण्याची क्षमता, संवाद कौशल्य, गणिती कामांमधील चातुर्य आणि ग्राहकांशी चांगले संबंध राखणे या गोष्टींवर अवलंबून असतं. ज्योतिषशास्त्रीय मान्यतेनुसार, बुध ग्रहाचा या सर्व बाबींवर प्रभाव असतो.

गुरुवार प्रॉपर्टी गुंतवणुकीसाठी का आहे शुभ?

ज्योतिषशास्त्रानुसार, गुरुवार हा दिवस भगवान बृहस्पतींना समर्पित मानला जातो. गुरु ग्रहाला ज्ञान, समृद्धी, संपत्ती, विस्तार आणि शुभतेचा कारक मानलं जातं. याच कारणामुळे, विविध महत्त्वाची आणि शुभ कामं सुरू करण्यासाठी गुरुवार हा एक उत्तम दिवस मानला जातो. मालमत्ता किंवा जमिनीतील गुंतवणूक हा एक दीर्घकालीन निर्णय मानला जातो; ज्योतिषीय मान्यतेनुसार, गुरु ग्रहाची अनुकूल स्थिती अशा गुंतवणुकीसाठी फायदेशीर ठरू शकते. म्हणूनच, जमीन, घरे किंवा इतर स्थावर मालमत्ता खरेदी करण्यासाठी गुरुवार हा शुभ दिवस मानला जातो.

गुरु ग्रहचा प्रॉपर्टीशी काय आहे संबंध?

वैदिक ज्योतिषमध्ये बृहस्पतींना सर्वात शुभ ग्रहांपैकी एक मानलं जातं… यामुळे ज्ञान, धन, सुख – समृद्धीशी होते. प्रॉरर्टीतील गुंतवणूक ही भविष्यातील स्थिरता आणि आर्थिक सुरक्षिततेशीही निगडीत असते. त्यामुळे, ज्योतिषशास्त्रीय मान्यतेनुसार, गुरू ग्रहाशी संबंधित दिवशी मालमत्ता खरेदी करणं किंवा गुंतवणूक करणं शुभ मानलं जातं. याच कारणामुळे, काही लोक जमीन खरेदी करण्यासाठी, घराची नोंदणी करण्यासाठी किंवा मालमत्तेशी संबंधित व्यवहार निश्चित करण्यासाठी गुरुवारची निवड करतात.

प्रत्येक बुधवार व्यवसायासाठी शुभ आहे का?

व्यवसाय सुरु करण्यासाठी प्रत्येक बुधवार प्रत्येक व्यक्तीसाठी शुभ असेलच असं काहीही नाही. ज्योतिषानुसार, कोणत्याही शुभ कामासाठी दिवसासोबतच तिथी, नक्षत्र, योग आणि मुहूर्तांचा देखील विचार करायचा असते. याशिवाय, व्यक्तीच्या जन्म कुंडलीतील बुधग्रहाची स्थिती देखील पाहिली जाते. जर बुध मजबूत स्थितीमध्ये असेल तर, व्यवसायाशी संबंधित सर्व कामे योग्य रित्या पार पडतात आणि यश देखील उत्तम मिळतं… पण बुध कमजोर असेल तर, शास्त्रानुसार उपाय करण्याचा देखील सल्ला दिली जातो.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
Jitendra Singh | राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय, गृहमंत्र्यांसोबत...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून अरविंद केजरीवाल यांचं खळबळजनक वक्तव्य
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेचं दादरमध्ये आंदोलन, थेट शर्मिला ठाकरे सहभागी
प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
Prakash Ambedkar | विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल,
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल, दिल्लीत नेमकं काय घडतंय?
शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
Abhijeet Dipke | शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या...
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या भेटीला
दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
मारो... मारो! दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
Rahul Gandhi : ..म्हणून राहुल गांधी थेट पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलनला बसले, स्वत:च केला खुलासा.

Rahul Gandhi : ..म्हणून राहुल गांधी थेट पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलनला बसले, स्वत:च केला खुलासा

Sunetra Pawar post for Ajit Pawar : तुम्ही माझी सर्वात मोठी ताकद, आज हे सगळं हरवून गेलंय.. अजित पवारांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवारांची भावनिक पोस्ट.

Sunetra Pawar post for Ajit Pawar : तुम्ही माझी सर्वात मोठी ताकद, आज हे सगळं हरवून गेलंय.. अजित पवारांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवारांची भावनिक पोस्ट

Ram Mandir Case : अयोध्या राम मंदिर दान चोरी प्रकरण, SIT तपासाबद्दल महत्वाची अपडेट.

Ram Mandir Case : अयोध्या राम मंदिर दान चोरी प्रकरण, SIT तपासाबद्दल महत्वाची अपडेट

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात धो धो पाऊस, अतिमुसळधार पावसाचा इशारा, पुढील 24 तासात थेट...

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात धो धो पाऊस, अतिमुसळधार पावसाचा इशारा, पुढील 24 तासात थेट..

‘धर्माच्या नावावर फक्त…’, विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून लाठीचार्ज, भडलेली उर्फी जावेद म्हणते, ‘असं राजकारण्यांचं धोरण…’.

‘धर्माच्या नावावर फक्त…’, विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून लाठीचार्ज, भडलेली उर्फी जावेद म्हणते, ‘असं राजकारण्यांचं धोरण…’

महायुतीला नडले, गोकुळ गिते अडचणीत? मतदारांना पैसे वाटपाची तक्रार, निवडणूक आयोग ॲक्शन मोडवर, नाशिक जिल्हाधिकाऱ्यांना ते थेट आदेश.

महायुतीला नडले, गोकुळ गिते अडचणीत? मतदारांना पैसे वाटपाची तक्रार, निवडणूक आयोग ॲक्शन मोडवर, नाशिक जिल्हाधिकाऱ्यांना ते थेट आदेश