Bhalchandra Sankashti Chaturthi 2021 | भालचंद्र संकष्टी चतुर्थी आज, जाणून घ्या काय करावे आणि काय करु नये…

मान्यता आहे की संकष्टी चतुर्थीच्या दिवशी भगवान श्रीगणेशाची विधीवत पूजा केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात (Bhalchandra Sankashti Chaturthi 2021 Today Shubh Muhurat And Puja Vidhi).

Bhalchandra Sankashti Chaturthi 2021 | भालचंद्र संकष्टी चतुर्थी आज, जाणून घ्या काय करावे आणि काय करु नये...
Lord-Ganesha
Nupur Chilkulwar

|

Mar 31, 2021 | 9:13 AM

Bhalchandra Sankashti Chaturthi 2021 | हिंदू पंचागानुसार दर महिन्यात दोन वेळा संकष्टी चतुर्थी येते. पहिली चतुर्थी शुक्ल पक्षात येते तर दुसरी चतुर्थी कृष्ण पक्षात येते. संकष्टी चतुर्थीला गणेश भगवान यांची पूजा-अर्चना केली जाते. यावेळी संकष्टी चतुर्थी आज बुधवारी (31 मार्च) आली आहे. आज भालचंद्र संकष्टी चतुर्थी (Bhalchandra Sankashti Chaturthi) आहे. मान्यता आहे की संकष्टी चतुर्थीच्या दिवशी भगवान श्रीगणेशाची विधीवत पूजा केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात (Bhalchandra Sankashti Chaturthi 2021 Today Shubh Muhurat And Puja Vidhi).

श्रीगणेशाचे भक्त यादिवशी देवाची कृपा व्हावी यासाठी उपवास ठेवतात. संकष्टी चतुर्थी उपवास सर्व इच्छा पूर्ण करणारा मानला जातो. पौराणिक मान्यतेनुसार, हा उपवास केल्याने विघ्नहर्ता गणेश भगवान भाविकांच्या सर्व समस्या आणि संकट दूर करतात. चला जाणून घेऊ या उपवासाचा शुभ मुहूर्त आणि पूजा विधी आणि महत्त्व…

भालचंद्र संकष्टी चतुर्थी शुभ मुहूर्त –

भालचंद्र संकष्टी चतुर्थी बुधवार, 31 मार्च, 2021 चन्द्रोदय – रात्री 9 वाजून 39 मिनिटं

चतुर्थी तिथी प्रारम्भ – 31 मार्च , 2021, गुरुवारला दुपारी 2 वाजून 6 मिनिटं

भालचंद्र संकष्टी चतुर्थी उपवास पूजा विधी :

भालचंद्र संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी उठून नित्यक्रम आणि स्नान करा. स्वच्छ वस्त्र परिधाण करा. यादिवशी लाल रंगाचे कपडे घालावे. पूजा घराची साफ सफाई करा आणि व्रतसंकल्प करा. पूजा करताना तुमचं मुख पुर्व किंवा उत्तर दिशेला असेल असं बसा. त्यानंतर गणेश भगवानची पूजा-अर्चना करा. पूजा करताना “ऊं गणेशय नम: और ऊं गणपते नम:” या मंत्राचा जप करा. त्यांना तीळ, गुळ, लाडू, दुर्वा, चंदन आणि मोदक अर्पित करा. गणेशाची आरती करा. भगवान गणेशाच्या मंत्राचा जप करा. पूर्ण दिवस उपवास ठेवा. चंद्र निघण्यापूर्वी गणेश देवाची पूजा करा आणि चंद्रमा अर्घ्य द्या.

भालचन्द्र संकष्टी चतुर्थी व्रताचं महत्त्व :

हिंदू धर्म मान्यतेनुसार, भालचंद्र संकष्टी चतुर्थी व्रताला सर्व व्रतांमध्ये श्रेष्ठ मानलं जातं. धर्म शास्त्रानुसार गणेशाला प्रथम देव मानण्यात आलं आहे. त्यामुळे प्रत्येक शुभ कार्यापूर्वी त्यांची पूजा-अर्चना केली जाते आणि त्यांचा उपवास ठेवला जातात. गणेश देवाला विघ्नहर्ताही म्हटलं जातं. हा उपवास करणाऱ्या भाविकांच्या आयुष्यातील सर्व कष्ट आणि समस्या गणेश भगवान दूर करतात.

धार्मिक मान्यतेनुासर भगवान गणेशाची पूजा अर्चना केल्याने यश, धन, वैभव आणि उत्तम आरोग्याची प्राप्ती होते. सोबतच सर्व प्रकारच्या संकट आणि दु:खाचं निवारणही होतं. या दिवशी लोक उपवास ठेवतात आणि चंद्राच्या दर्शनानंतर उपवास पूर्ण मानला जातो.

काय करु नये –

गणेशाची पूजा करताना त्यामध्ये तुळशीचा वापर करु नये.

आजच्या दिवशी मांस, मद्याचं सेवन करु नये.

घरातील वडिलधाऱ्यांना वाईट बोलू नये, अन्यथा हा उपवास ठेवण्याचा काहीही लाभ होत नाही.

Bhalchandra Sankashti Chaturthi 2021 Today Shubh Muhurat And Puja Vidhi

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Vinayak Chaturthi 2021 | विनायक चतुर्थी, पूजेचा शुभ मुहूर्त आणि पूजा विधी जाणून घ्या…

Bhalchandra Sankashti Chaturthi 2021 | भालचंद्र संकष्टी चतुर्थी कधी?, जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि महत्त्व

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें