महाकुंभाला जाणार असाल तर तिथून ‘या’ वस्तू नक्की घरी आणा, घराची भरभराट होईल
कुंभमेळ्याला १३ जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. यावेळी प्रयागराजमध्ये महाकुंभाचे आयोजन करण्यात आले आहे.

आपल्या सनातन धर्मात विशिष्ट तिथीला पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने तुमच्या जीवनासाठी शुभ मानले जाते. महाकुंभमेळा दर १२ वर्षांनी भरतो. प्रयागराजच्या संगमनगरीत १३ जानेवारी २०२५ पासून कुंभमेळ्याला सुरुवात होणार आहे. हिंदू धर्मात या महाकुंभाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. धार्मिक मान्यतेनुसार जो कोणी महाकुंभमेळ्यात स्नान करतो त्याला सर्व पापांपासून मुक्ती मिळते आणि अनेक पटीने अधिक पुण्यफळ मिळते. त्यामुळे जर तुम्ही महाकुंभाला जाणार असाल तर तेथून या वस्तू नक्की तुमच्या घरी आणा. असे केल्याने घरात सुख, समृद्धी आणि एक सकारात्मक ऊर्जा येते, असे म्हटले जाते. यासोबत नशिबाची साथ मिळते.
माती
प्रयागराज हे गंगा, यमुना आणि सरस्वती या तीन पवित्र नद्यांचा संगम आहे, म्हणून या शहराला संगम नगरी असेही म्हणतात. संगमाच्या काठावर होणाऱ्या महाकुंभमेळ्यालाही अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे महाकुंभमेळ्याला जात असाल तर इथून संगमाची माती नक्की घरी आणा. कारण पौराणिक कथेनुसार, जेव्हा देव व दानवांमध्ये समुद्रमंथन झाले तेव्हा प्रयागराजमधील अमृत कलशातून अमृताचे काही थेंब पडले. यासाठी, प्रयागराजची माती अत्यंत शुभ मानली जाते. महाकुंभ मेळ्यातून आणलेली संगमाची माती पूजेच्या ठिकाणी किंवा मुख्य दरवाजावर ठेवल्यास घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो.
शिवलिंग
महाकुंभमेळ्यातून तुम्ही शिवलिंग घरी आणणेही अत्यंत शुभ आणि फलदायी मानले जाते. याशिवाय हवं असेल तर पारस पाषाण देखील घरी आणू शकता. ते हे पारस पाषाण तुम्ही देवघरात ठेवल्याने घरात सुख-समृद्धी येते.
गंगेचे पवित्र जल गंगाजल
तुमच्या घरातील सदस्य महाकुंभामेळ्यात जात असतील तर तेथून गंगेचं पाणी आणायला विसरू नका. कारण गंगेचं पाणी घरी आणून देवघरात किंवा कोणत्याही स्वच्छ ठिकाणी ठेवावे. यामुळे घरात सुख-शांती आणि समृद्धी येते. त्याचबरोबर कुटुंबात सकारात्मक वातावरण निर्माण होते.
तुळस
महाकुंभमेळ्यातून ही तुम्ही तुळशीचे रोप घरी आणू शकता. तुळस घरात ठेवल्याने दारिद्र्य दूर होऊन आर्थिक स्थिती मजबूत होते. त्याचबरोबर लक्षात ठेवा की संध्याकाळी नियमितपणे तुळशीजवळ दिवा लावा आणि सकाळी पाणी अर्पण करा. तुळशीची पूजा केल्याने घरात सुख, शांती आणि समृद्धी येते. त्याचबरोबर धनलाभात ही आशीर्वाद मिळतो.
