AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Akshaya Tritiya 2021 : अक्षय्य तृतीयेला ‘या’ शुभ गोष्टी खरेदी करा, देवी लक्ष्मी प्रसन्न होईल

हिंदू पंचांगानुसार, अक्षय्य तृतीया (Akshaya Tritiya 2021) दरवर्षी वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दिवशी साजरी केली जाते. या दिवशी देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूची पूजा केल्यास शुभ फळ मिळते.

Akshaya Tritiya 2021 : अक्षय्य तृतीयेला 'या' शुभ गोष्टी खरेदी करा, देवी  लक्ष्मी प्रसन्न होईल
Goddess Laxmi
| Updated on: May 14, 2021 | 8:47 AM
Share

मुंबई : हिंदू पंचांगानुसार, अक्षय्य तृतीया (Akshaya Tritiya 2021) दरवर्षी वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दिवशी साजरी केली जाते. या दिवशी देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूची पूजा केल्यास शुभ फळ मिळते. धन लाभसाठी हा दिवस खूप शुभ मानला जातो. विशेषकरुन अक्षय्य तृतीयेला सोन्या-चांदीची खरेदी केली जाते (Buy These Things On Akshaya Tritiya 2021 Tithi To Please Goddess Lakshmi).

मान्यता आहे की, अक्षय्य तृतीयेच्या दिवशी देवी लक्ष्मी पृथ्वीवर भ्रमण करण्यासाठी येतात. कोरोना काळात जर तुम्ही सोने-चांदी विकत घेऊ शकत नसल्यास या दिवशी काही खास वस्तू खरेदी करुन आपण देवी लक्ष्मीला प्रसन्न करु शकता. जाणून घ्या की या दिवशी सोन्याव्यतिरीक्त कोणती वस्तू खरेदी केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते –

कौडी खरेदी करा –

ज्योतिषशास्त्रानुसार अक्षय्य तृतीयेच्या दिवशी दक्षिणेकडे देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. म्हणून दक्षिणेकडील दिशेला शुभ मानले जाते. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोन्याऐवजी कौडी खरेदी करणे शुभ मानले जाते. कौडी खरेदी केल्याने घरात धन आणि समृद्धी येते. या कौडींना देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. या दिवशी या कौडी लाल कपड्यात बांधून ठेवा आणि दुसर्‍या दिवशी पूजा केल्यावर घरच्या तिजोरीत ठेवा.

नारळ खरेदी करा –

ज्योतिषशास्त्रानुसार देवी लक्ष्मीला नारळ खूप प्रिय आहे. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी नारळ खरेदी करणे घरासाठी फायदेशीर असते. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी देवी लक्ष्मीच्या पूजेमध्ये नारळ वापरा. असे केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होईल. घरात धन-धान्याची कमतरता भासणार नाही.

बासरी खरेदी करा –

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी बासरी विकत घेणे खूप शुभ मानले जाते. या दिवशी बासरीची पूदजा करण्याचं विशेष महत्त्व आहे. पूजेमध्ये पिवळ्या घंटेचा देखील वापर करा.

शंख खरेदी करा –

भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीच्या पूजेमध्ये शंख वापरणे खूप शुभ मानले जाते. शंख हे देवी लक्ष्मीचे प्रतीक आहे. अक्षय्य तृतीयेला देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी मोती शंख ठेवा. याशिवाय घरात आर्थिक समस्या दूर करण्यासाठी समृध्दी श्री यंत्र ठेवा.

Buy These Things On Akshaya Tritiya 2021 Tithi To Please Goddess Lakshmi

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

May Festival 2021 | ‘या’ आठवड्यात अक्षय तृतीया, ईदसह अनेक सण, जाणून घ्या कधी कुठला सण येणार…

Akshaya Tritiya 2021 | अक्षय तृतीयेच्या दिवशी चुकूनही ही कामं करु नये, जाणून घ्या या दिवसाचं महत्व

CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.