Chanakya Niti : चाणक्य म्हणतात कोणतंही काम सुरू करण्यापूर्वी या तीन गोष्टी लक्षात ठेवा, यश तुमचंच
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांचे विचार आजही अनेकांना प्रेरणा देतात. कोणतंही काम करण्यापूर्वी काही प्रश्न स्वत:लाच विचारणं गरजेचं असतं, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनिती तज्ज्ञ होते. आर्य चाणक्य यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, चाणक्य यांनी या ग्रंथामध्ये जे काही विचार सांगितले आहेत, ते आजही अनेकांना प्रेरित करतात. थोडक्यात सांगायचं झालं तर आर्य चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती या ग्रंथामध्ये आयुष्य कशा पद्धतीने जगायचं? आयुष्यात काय करावं? काय करू नये? याच सार चाणक्य यांनी आपल्या या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये सांगितलं आहे. चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती ग्रंथामध्ये अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळातही महत्त्वाच्या वाटतात.
आर्य चाणक्य म्हणतात तुम्ही कोणतही काम सुरू करणार असाल तर त्यापूर्वी काही असे प्रश्न असतात जे तुम्ही स्वत:लाच विचारले पाहिजेत, जर तुम्हाला त्या प्रश्नांची योग्य उत्तरं मिळाली तर तुम्ही जे काम करणार असाल त्यात तुम्हाला यश नक्की मिळणार. जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे ते.
चाणक्य म्हणतात जेव्हा तुम्हाला एखादं काम नव्याने सुरू करायचं असेल तर तुमच्या मनाला सर्वात आधी हा प्रश्न विचारा की हे काम मी का करत आहे? हे काम सुरू करण्यामागचा माझा उद्देश काय आहे? सर्वात आधी तुम्ही तुमचा उद्देश अर्थात गोल सेट करा आणि त्या उद्देश पूर्तीच्या दिशेनं मार्गक्रमण करा यश तुमचचं आहे, असं आर्य चाणक्य यांनी म्हटलं आहे.
तुमची मर्यादा आणि ताकद लक्षात घ्या – आर्य चाणक्य म्हणतात कोणताही पुढचा -मागचा विचार न करता सुरू केलेल्या कामात तुम्हाला कधीच यश मिळू शकत नाही. त्यासाठी तुमची ताकद काय आहे? आणि मर्यादा काय आहेत ते तुम्हाला सर्वात आधी लक्षात घ्यावं लागेल, तुम्हाला तुमच्या मर्यादा ओळखाव्या लागतील, त्यानुसार तुम्हाला तुमचं नियोजन करावं लागेल, असं आर्य चाणक्य यांनी म्हटलं आहे.
आर्य चाणक्य यांनी तिसरी गोष्ट सांगितली आहे, ती म्हणजे यातून मला काय मिळणार? मी काय साध्य करणार? हे पण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे असं आर्य चाणक्य यांनी म्हटलं आहे. या तीन गोष्टी लक्षात घेतल्यास यश तुम्हाला नक्की मिळणार आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही